भ्रष्ट कारभार समाजाच्या मुळावर उठला आहे याला आवर कोण घालणार?

दौंड-आवाज लोकशाहीचा 
विशेषवृत्त-विजय चव्हाण

पगारापेक्षा अधिक पैसे मिळवण्याच्या मागे शासनाचे सर्वच स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची स्पर्धा लागल्याने याचा विपरीत परिणाम समाज व्यवस्थेवर होऊ लागला आहे.कोणाच्या आयुष्यात आर्थिक फटका कोणाला रस्त्यावर जीव गमवावा लागत आहे.हा प्रकार थांबवणे अवघड आहे कारण राज्यकर्तेच लुटारू झाले आहेत असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही यासाठी आवाज लोकशाहीचा मधून भ्रष्ट कारभाराबाबत मालिका सुरू होत आहे.

भाग-१
परिवाहन विभाग (आर,टी,ओ)

बारामती शहरात इंदापूर दौंड बारामती साठी (आर.टी. ओ. ) परिवाहन उपविभागीय कार्यालय म्हणून प्रशस्त दालनात कामकाज चालते.कार्यालयाची रचना पाहिल्यावर राज्यातील अन्य विभागापेक्षा ते आगळ वेगळे नक्कीच म्हणता येईल इमारत सुंदर आहे मात्र येणाऱ्या पिण्याचे पाणी मिळत नाही ही बाब खेदजनक आहे.

वरील तीन तालुक्यातून वाहनाची कायद्याच्या आधारावर नोंदणी ठेवणे या विभागाचे काम आहे.कार्यालयात यासाठी कार्यालय कामगार आणि फिरते पथक अशी व्यवस्था आहे.या दोन्ही व्यवस्थेला शासनाच्या माध्यमातून दर्जा प्रमाणे पगार मिळतो आहे.

मात्र पगारापेक्षा जास्त कमाई कशी करता येईल यावर येथील कामगार प्रामाणिक पने नाही त्याही पुढे जाऊन जीव लावून काम करताना दिसतो.
कार्यालयात नव्याने वाहन नोंदणी,वाहनचालक परवाना,वाहनाच्या फिटनेस दाखले फेर नोंदणी, वाहन परवाने या विषयांची कामे असतात.कामे करताना सर्वसामान्य माणसाला या विभागाची कार्यप्रणाली संपूर्ण माहीत नसते .याचा फायदा विभागातील प्रथम खालच्यास्त्रावरील कामगार घेतात कागद टेबलावर आला की त्याच्या पुढे पाठवण्यासाठी आढेवेढे घेतात यातून टेबल खालून काही आल्यास ती पुढे जातो अन्यथा बसा काम चालू आहे घेतो बघतो अशा टोलवाटोलवी प्रकाराने मानसिक त्रास दिला जातो.उगाच एखादी अडचण सांगून हा कागद घेऊन या तिथे खाडाखोड झालेली आहे.सही चुकीची वाटते अशा नाहक चुका सुद्धा याप्रसंगी शोधल्या जातात.ज्यांनी टेबल खालून दिले त्यांच्या अशा चौकशा केल्या जात नाहीत.
या पुढे जाऊन कागद शेवटी पर्यंत जाईपर्यंत काही अतिरिक्त रक्कम इथे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची होतेच.ही शासनाच्या भरण्या वितिरिक्त असल्याने सरकारला देणारी फी वेगळीच असते.हा कार्यालयातील अतिरिक्त कमाईचा भाग झाला असला तरी तीन तालुक्यात अवजड वाहतूक करणाऱ्या माल ट्रक आणि वाळू दगड मुरूम वाहणाऱ्या मोठ्या हायवा प्रचंड आहेत.

दौंड तालुक्यात त्यांच्या अंदाजे आकडा पाहिल्यास साधारण एक हजार पेक्षा अधिक असून ट्रान्सपोर्ट साठी शेती माल लोखंड केमिकल्स यंत्रसामुग्री यासाठी क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या गाड्या त्यांना ओहरलोड वाहतूक म्हणतात त्यांच्या संख्या काही हजारात असू शकते यांना नियमापेक्षा जास्त वाहनातून करण्यासाठी महिन्याला अधिक पाच हजार कमीत कमी तीन हजार द्यावे लागतात याला कार्ड असे गोंडस नाव आहे.

या कार्ड असणाऱ्या गाड्यांना हा विभाग सवलत देऊन बदल्यामध्ये वर कमाई करतो चित्र आहे.या गाड्यांचा कायदेशीर कुठलाही कागद तपासला जात नाही तसेच गाडीचा फिटनेस पाहिला जात नाही गाडीला नंबर प्लेट आहे नाही याची खातर जमा केली जात नाही मात्र ज्या गाड्यांचे कार्ड नाही आणि ते अशा प्रकारच्या अवजड वाहतूक की विदाऊट कार्ड करतात त्यांच्यावर खटले भरले जातात केसेस केले जातात आणि त्यांना भेटी धरला जातो अशी असंख्य उदाहरणे या विभागाचे प्रामाणिक एडिट केल्यास उघड झाल्याशिवाय राहणार नाही.

दौंड तालुक्यामध्ये देऊळगाव गाडा वरवंड यवत पारगाव राहू कासुर्डी भरतगाव ताम्हणवाडी खोर पडवी कुसेगाव पाटस कुरकुभ जिरेगाव कौठडी मळद सोनवडी देऊळगावराजे वडगाव दरेकर शिरापूर खानोटा राजेगाव आदी पट्ट्यातून मुरूम तस्करी मातीचोरी यासाठी मोठ्या वाहनांचा वापर केला जातो हे सर्व वाहने नंबर प्लेट नसलेली चुकीचा नंबर लावलेली त्यांची फिटनेस अत्यंत खराब असलेली असून याकडे हा विभाग कार्ड नावाखाली दुर्लक्ष करतो त्याचा विपरीत परिणाम या वाहनांचा चालकांचा मजूरपणा सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरतो यातून एखादा अपघात घडल्यास कोणाचा जीव गमववा लागतो कोणाला गंभीर जखमी व्हावे लागते यातून त्यांना आर्थिक मानसिक मोठा त्रास होतो कायदेशीर बाबी यांना पोलीस प्रशासन आणि हा विभाग फिर्याद देणाऱ्यापेक्षा मदत करत असतो असे आजपर्यंतचे चित्र आहे या सर्व गोष्टींना आळा कोण घालणार ही बाब अतिशय गंभीर झालेली असून या कार्डातील काही रक्कम वरच्या कार्यालयाला पाठवली जाते असा सूर कायमचाच असल्याने वरचे सुद्धा खालच्यांच्या कार्डातील रकमेने खराब झालेले आहेत म्हणून प्रशासकीय यंत्रणा पगारापेक्षा अधिक कामासाठी विविध स्वरूपाच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या पाठीमागे लागल्याने भ्रष्ट कारभाराचे आगार निर्माण झालेले आहे याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असून या सर्व प्रकरणाला आळा घालणार तरी कसा हा प्रश्न मात्र प्रशासनाच्या कार्यप्रणालीकडे पाहून गंभीर वाटणे साहजिकच आहे.

नुकतीच दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे उड्डाण पुलावर एक अपघात झाला आहे हयवा नावाचा अवजड वाहतूक करणारा ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि एकाचा जागीच मृत्यू झाला दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.रस्ता म्हणलं की अपघात होणारच मात्र अपघाताची कारणीमासा काय याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे ते घडत नाही ज्या अवजड ट्रक (हायवा ) आर टी ओ नियमाने रस्त्यावर धावत होता का? या कडे लक्ष देण्याऐवजी आपल्या यादीत याचा नंबर आहे का हे आधी पाहील जाते.

यादी कोणती

या विभागात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनाची यादी केलेली असते त्याला कार्ड नावाने सुद्धा संबोधले जाते हे कार्ड वाहन मालकाकडून काही हजारात रुपयांची मिळकत करून देते .कमीत कमी महिना तीन हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार अशी किंमत कार्डाची असते.

एकट्या दौंड तालुक्यात माती मुरूम वाहणारी अशी वाहने कमीत कमी १००० एवढी आहे या पेक्षा जास्त असणार हे निश्चित असले तरी कमीत कमी आकडा एक हजार नक्की आहे .यामधील ९००वाहने कायद्याचे पायमल्ली करून चालवली जातात.आणि हा विषय या विभागाला पगारापेक्षा अधिक रक्कम मिळवून देणारा आहे त्याला कार्ड म्हणतात आणि याची नोंद असलेला प्रकार म्हणजे यादी असते.

कार्ड गोळा करण्याची अनोखी पद्धत

कार्ड आहे जाऊदे अशी बिनधास्त भाषा ज्यांनी कार्ड घेतले आहे त्यांची असते.कार्ड घेतलेल्या वाहनात कायम प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक केली जाते याला ओव्हरलोड म्हणून प्रशासनाचे नाव आहे अशी वाहने रस्त्यावर फिरत असताना त्यांना नंबर प्लेट लावलेली नसते.त्यांची अवस्था सुधा व्यवस्थित नसते कायम घाईगडबडीत यांचा प्रवास असल्याने छोट्या वाहनानं यांची मोठी भीती असते चुकून अपघाता झाल्यास त्यांचे नुकसान कमी होऊन समोरच्याच्या वाहनाचे नुकसान होऊन जखमी जबरी जखमी आणि वेळ पडल्यास मृत्यू सुद्धा होतो आणि पुढला विषय कार्ड अनुषंगाने होत असल्याने कायदा सोडून कामकाज होते याला कार्ड म्हणतात.आणि कार्ड वरकमाई चे साधन असल्याने सरकार पगारावर काम करणारे अधिकारी अधिक पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या बहाण्यातून हा व्यवसाय करीत आहे.याला अधिकारीच जबाबदार नसून या विभागाचा शिपाई वाहन चालक कर्मचारी आणि जे जे घटक या विभागाचे आहेत हे सर्व जण आपापल्या पद्धतीने काम करीत असतात.

हा प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही महिन्याकाठी जमा झालेल्या एकूण रकमेतील काही पार्ट वरच्या विभागाला सुद्धा जातो पण याची राजरोसपणे कोणीही साक्ष देऊ शकणार नाही जे देणारे आहेत ते याच विभागातील पाकीट पोस्ट करणारे असू शकतात त्यांचे मूळचे सात बरबटलेले असल्याने ते इतरांची नावे कशी सांगते हा प्रश्न खऱ्या अर्थाने संशोधनाचाच विषय म्हणावा लागेल?

दौंड तालुक्यामध्ये रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळी भरधाव वेगात ओव्हरटेक करताना एका हायवा या वाहनाने दुचाकी स्वराला धडक दिल्याने शंकर रघुनाथ पाटोळे वय ४५ राहणार गणेश पाटील तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हा मृत्युमुखी पडलेला आहे.त्याचा सहकारी हनुमंत नारायण कोपनर राहणार राक्षेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हा गंभीर जखमी.झालेला आहे.या वाहन आणि त्याची कायदेशीर चौकशी कशी होईल का? यात कार्ड अडचण होईल हे सांगणे मात्र अवघड आहे.एकटा आर टी ओ कार्ड घेतो असा समज चुकीचा आहे याला पोलिसांचे सुद्धा कार्ड असते याची माहिती पुढील लेखांतून वाचकाला वाचायला मिळेल.