कासुर्डी गावात  अतिक्रमण कारवाईची कमाल गरिबांच्या घरांना केले जमीन दोस्त,..धनदांडग्यांना दिले अभय…..अतिक्रमण कारवाईतील भेदभाव का?

आवाज लोकशाहीचा ………,
विशेष प्रतिनिधी विजय चव्हाण


राजकीय द्वेषातून कासुर्डी ग्रामपंचायतीने जाती जमातींच्या कुटुंबाची घरे अतिक्रमण कारवाई म्हणून पोलिस बंदोबस्तात जेसीबी मशीन लावून पडली असून अगदी खेटून असलेल्या  सवर्ण नागरिकांच्या अतिक्रमणाला अभय दिले आहे .अशा स्वरूपाची चर्चा गावातून तालुका भर झाली आहे .
गावातील अतिक्रमण कारवाई राजकीय खुन्नस ने करायची नसून असलेल्या सर्व अतिक्रमण धारकांना योग्य त्या कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे करावी आणि त्या बाबत कोणतीही तक्रार कार्यालयाकडे येणार नाही याचीं दक्षता घ्यावी असे गटविकास अधिकारी दौंड पंचायत समिती जा.क्रं.७/१०१५/२०२४ दिनांक ९/१२/२०१४  चे लेखी पत्र  असताना ग्रामपंचायतीने पत्राला केराची टोपली दाखवून कारवाई केलेली आहे .?असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे .
सदर प्रकरणाने ग्रामपंचायत गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला जुमानत नाही असे चित्र दिसून आले असून अतिक्रमण पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त कसा आला हा विषय शोध मोहिमेचा भाग बनला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की कासुर्डी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला  खेटून  सोमनाथ मोहन गुंजाळ, विजय बाबुराव भंडलकर , मोनिका भाऊसाहेब माने, सकलेन असलम पिंजारी, इम्तियाज मोहम्मद   सतीश  मोहन जाधव ,यांची घरे पडलेली आहेत हे सर्व जाती जमाती मधील रहिवाशी असून यांच्या पडलेल्या अतिक्रमण लगत माजी सरपंच यांची बहीण यांचे अतिक्रमण मध्ये घर आहे शेजारी अशीच अनेक घरे असून ही सर्व घरे पडलेल्या घरांच्या लगत आहेत .सर्व सवर्ण असून यांना शेत जमिनी सुद्धा आहे मात्र त्यांना अभय दिलेले आहे  अशी तक्रार ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांनी केली आहे
ग्रामपंचायतीच्या शेजारीच असलेल्या या पाडलेल्या घरांना उभारणी काळात ग्रामपंचायतींनी कारवाई करणे अपेक्षित होते मात्र ती केली का नाही .त्याच वेळेला त्यांच्यावर पोलिसात तक्रार  दाखल का? केली नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे . भंडलकर यांच्या घराची वास्तुशांती  आठवड्यात होणार होती त्या आधीच ग्रामपंचायत यांनी जमीन दोस्त केले आहे .

कष्ट करून घाम गाळून मुलाबाळांसाठी केलेला हा निवारा ग्रामपंचायत ने वाढल्याने हा परिवार सध्या उघड्यावर आलेला आहे मात्र या परिवाराच्या लगतच असलेल्या घरांना ग्रामपंचायतीने हात सुद्धा लावला नाही ही बाब मोठी गंभीर म्हणावी लागेल
  राजकीय आकाशापोटी गावातील गटातटाच्या राजकारणाने या गरिबांवर ती अन्याय अत्याचार झाला की काय अशी शंका या निमित्ताने उपस्थित होणे सहाजिकच आहे.
गावच्या सरपंच धनश्री विशाल टेकवडे या महिला.आहेत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्यांची भेट होऊ शकली नाही . त्या बाहेरगावी गेलेल्या आहेत अशा स्वरूपाची माहिती मिळाली असून त्यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही
गावचे ग्रामसवेक मागील दहा दिवसापूर्वी नव्याने रुजू झालेले  आहेत .अशी माहिती मिळाली असून त्याची सुद्धा भेट होऊ शकलेली नाही .
अतिक्रमण पाडल्याचा  विषय दौंड न्यायालयात गेला असल्याने न्यायालय कोणता निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .
……….पोलिस बंदोबस्त कसा?……….
अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आलेला होता मात्र पाच ते सहा अतिक्रमण काढण्यासाठीं बंदोबस्त कसा मिळाला आणि त्या साठी ग्रामपंचायतीने पोलिसांकडे कोणती कागदपत्रे दिलेली होती हे समजू शकले नाही .मात्र यवत पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्याशी समक्ष चर्चा केली असता गेली एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यासाठी अर्ज केलेला होता .शालेय परीक्षेचा काळ संपल्यावर देऊ असे त्यांना सांगितलेलं होते म्हणून.परीक्षा काळ संपल्यावर बंदोबस्त दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे .या वेळी दौंड गटविकास अधिकारी यांचे पत्र त्यांना दाखवले असता त्यांनी आम्हाला बाकी काही सांगता येणार नाही ग्रामपंचायतीने बंदोबस्त मागितलेला होता आम्ही एक महिना उशिरा दिला आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे .
अतिक्रमण कारवाई साठी दिलेल्या बंदोबस्ताची मागणी ग्रामपंचायतीने केलेली असताना त्यांनी कोणती कागदपत्रे पोलिस विभागाला दिली आहेत याची खरी चौकशी झाली पाहिजे अशी ओरड  गावातील काही नागरिक करू लागले असून गटविकास अधिकाऱ्याच्या पत्राला अंधारात ठेऊन जशी त्यांची दिशाभूल केली तश्याच स्वरूपाची दिशाभूल अतिक्रमण पाडण्यासाठी .पोलिसांना केलेल्या कागदपत्रात केली असावी अशी शंका या निमित्ताने व्यक्त करू होऊ लागलेली असताना गावात गरिबांवर अतिर्कमनावर  अन्याय आणि सवर्णांच्या  अतिक्रमण ला अभय दिले गेले आहे की काय? याची चर्चा गावातून तालुक्यापर्यंत होऊ लागली आहे.

अतिक्रमण नावाखाली या परिवारांना कासुर्डी गावाने केले बेघर