दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण
देऊळगाव गाडा ग्रामपंचायत कारभाराच्या प्रकरणात मोठा गोंधळ झाल्याने गावात एकदम शांतता झालेली आहे.प्रत्येक जण एकमेकाला शंकेने पाहू लागला असून कोणी कोणाशी बोलण्याच तयार नाही चुकून दोघे बोलले की त्यांना जे पाहतात त्यांच्या बाबत शंका उपस्थित करू लागल्याने गावात सध्या भीषण शांतता झालेली आहे.
दौंड तालुक्यातील ४ हजार अधिक लोकसंख्येचे असलेले हे देऊळगाव गाडा गाव २०१६ ते २०२१ च्या दरम्यान ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये मोठा गोंधळ उघड झाला आहे.
गावच्या ग्रामपंचायतीचे दप्तरच या ५ वर्षात गायब झाले होते या दरम्यानच्या काळामध्ये २०१९ मध्ये जानेवारी महिन्यात घेतलेल्या ग्रामसभेमध्ये एकाच वेळेस अनेक स्टोन केशर दगड खान डांबर प्लांट यांना मुक्त असते ना हरकती देण्याचे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत.
या ठरावाच्या अनुषंगाने तत्कालीन सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य मंडळी यांनी खिरापत वाटल्या सारखे नाहरकत दाखले दिले आहेत अशी तक्रार ग्रामस्थांची होती.
दप्तर गायब असलेला प्रकार उघड झाल्यानंतर दौंड गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांच्याकडे तक्रार करून ते दप्तर ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात आले होते मात्र दप्तरांमध्ये प्रचंड स्वरूपाची शंका येणारी कारणे होती अशी गावकऱ्यांकडून मिळते या दाप्तरांमध्ये अनेक ठिकाणी चुकीचे मजकूर लिहिलेले आहेत काही ठिकाणी वेगळीच पान चिकटवली की काय असती शंका निर्माण होते.
तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि ग्रामसेवक हे याचे जबाबदार आहेत असा ठाम विश्वास सध्या असणाऱ्या ग्रामपंचायत मधील काही सदस्य आणि गावकऱ्यांना आहे याची सखोल चौकशी करावी असं मत यानिमित्ताने सर्वांनी व्यक्त केलेला आहे या काळामध्ये या छोट्याशा गावामध्ये दिवस-रात्र दगडाचा भुगा करणारी यंत्रणा आणि त्या भोग्याला केडगाव आणि परिसरातील बांधकामासाठी विक्रीला घेऊन जाणाऱ्या हायवा गाडी मधील होणारा त्रास नागरिकांसाठी असह्य झालेला आहे या सर्व बाबींसाठी आता गावामध्ये आवाज लोकशाहीच्या माध्यमातून माहिती निर्माण झाली आणि परिणामी गावामध्ये गाव पुढार्यांमध्ये कमालीची शांतता पसरलेली आहे.
सध्या या गावाचा आणि चौफुला परिसराचा ५ ते ६ किलोमीटर एवढा अंतराचा टप्पा असल्याने सर्व गाव पुढारी चौफुला या ठिकाणी सकाळी जमतात आवाज लोकशाहीचा मधील आलेल्या बातम्यांमुळे आता ते दिशाहीन झालेले आहेत कोणी कोणाशी या विषयावर बोलू शकत नाही आणि बोलले तर तिसरा व्यक्ती त्यांच्याकडे शंखने बघतो.
सध्या गावात एकच विषय आहे हे प्रकरण वाढवलं कोणी त्याची माहिती दिली कोणी आणि खरंच हे केलं कुणी या सर्वांची सखोल माहिती आता गावकऱ्यांना हवी आहे आणि त्यासाठी गावातून आता वादळी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये होताना दिसत असताना गाव पुढारी मात्र कामारीचे तोंडाला चिकटपट्टी लावून शांत झाल्याचे चित्र आहे.
देऊळगाव ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये मोठा अस्त्यवस्थापना असताना सुद्धा काही खोडील गावकरी चुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी कोणाचा वापर करत आहे अशी माहिती सुद्धा हाती आलेली असून हे गाव म्हणजे चित्रपटातील एक गाव बारा भानगडी अशा स्वरूपाचे आहे की काय अशी शंका यानिमित्ताने वाटणे साहजिकच आहे.
सध्या तालुक्याच्या पटलावर या गावातील विठ्ठलवाडी येथील शाळा मोठ्या प्रमाणात गाजली आहे गावामध्ये जिलेटीन या स्फोटक साठे ठेवण्याची व्यवस्था आहे येथेच रात्रंदिवस चोरट्या मुरमाची तस्करी करणारे बहाद्दर या गावात रात्रीचे चोर आणि सकाळी साव म्हणून फिरतात. तालुक्याच्या राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची धडपड करणारी तरुण पिढी ही झेंड्या दांड्या पाही गटातटात विभागलेली आहेत.
परिणामी गावात गटा तटाचे राजकारण होऊन नात्यागोत्यांमध्ये वितंड वाद सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे.राजकारणात गटातटाच मोठे सावट असल्याने या छोट्या गावांमध्ये तीन-चार परमिट रूम बियर बार सुद्धा आहेत ४ हजार लोकसंख्येच्या गावामध्ये सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्रीची व्यवस्था सरकार यांच्या आदेशाने होणे ही बाब मोठी गंभीर असून येथील तरुणाईच्या दृष्टीने या भागात शैक्षणिक सुबत्ता निर्माण होण्याची गरज असताना येथे व्यसनासाठी निर्मिती करण्यात आलेली आहे हा सर्व प्रकार या गावकऱ्यांच्या केवळ राजकीय अठासापोटी निर्माण झाला आहे..
याचा सर्व विचार करता हे गाव सध्या दगड खान डांबर प्लांट याच्या ना हरकत दाखल्याने कमालीचे शांत झाले असून गाव पुढारी मात्र सैरावैरा झाल्याचे दिसून येत आहे.



