दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी होणारा असून लवकरच दलाल,स्टॅम्प विक्रेता आणि दौंड शहरातील आणि तालुक्यातही यांचा आश्रय दाता आका यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेले माहिती अशी की दौंड मधील पुनर्वसन जमिनी बाबत मोठा घोटाळा झालेला आहे अशी माहिती आवाज लोकशाहीच्या माध्यमातून प्रसारित झालेली होती जवळपास एक महिना या विषयाचे लेखन सतत प्रकाशित केल्याने शासनाच्या पुनर्वसन विभाग आणि पुणे जिल्हास्तरीय महसूल विभागात याचे पडसाद उमटले आहेत.
याच विषयासाठी उच्च न्यायालयाने सुद्धा पुनर्वसन जमिनी आणि खातेदार यांच्या बाबत माहिती मागितलेली आहे.जिल्हा अधिकारी साहेब जितेंद्र डूडी यांनी या बाबत गंभीर स्वरूपाने लक्ष घातलेले आहे.
दौंड च्या महसूल विभागाने या साठी जिल्हा स्तरावर दोन वेळा मीटिंग घेऊन पुनर्वसन जमिनी बाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.दौंड तालुक्यात सरकार जमा करून घेतलेल्या जमिनी सुद्धा दलाल यांच्या कडून विक्री केलेल्या आहे.खातेदार खोटा दाखवून विक्री करण्याचा त्यांचा हातखंडा झालेला आहे.
पुण्यातील दलालांनी दापोडी यवत गोपाळवाडी केडगाव पारगाव, नानगाव ,कानगाव, दौंड च्या पूर्वपट्ट्यात अशा दलालांनी धुमाकूळ घातलेला आहे.दलालांच्या हाताला धरून वरवंड, कानगाव नानगाव पारगाव पिंपळगाव यवत या ठिकाणी राजकीय गाव पुढाऱ्यांनी सुद्धा हात धुवून घेतलेले आहेत.त्यांनी सुद्धा दलाली करून काही गोरगरिबांच्या जमिनी कब्जात घेतलेले आहेत.यामध्ये अग्रभगी वरवंड आणि नानगाव येथील स्वतःला नेते समजणारे दोन महाभाग असले तरी सर्वाधिक जमिनीची उलाढाल करणारे कानगाव हे गाव सर्व चर्चेचा विषय बनलेले आहे.
पुनर्वसनच्या नावाखाली त्यांच्याच काही भामट्यांनी राजकीय आश्रय घेऊन अनेक गोर गरिबांच्या जमिनीत नावे लावून अनेक ठिकाणी दुबार वाटप करून त्या जमिनी सुद्धा विक्री केलेल्या आहेत .
हवेली तालुक्यात सुद्धा या दलालांनी आपल्याला आशीर्वाद असणाऱ्या नेतृत्वाला एकच वेगळ्याच व्यक्तीच्या नावाने जमिनी घेऊन दिल्याची मोठी चर्चा आहे.याबाबत संबंधित हवेली तालुक्यातील नागरिक लढा देतात अशी माहिती सुद्धा हाती आलेली आहे.
या सर्व प्रकारचे लेखन आवाज लोकशाहीचाने सातत्याने महिनाभर अधिक सुरू ठेवल्याने याचा आता चांगला परिणाम झाला असून शासन स्तरावर याची पडसाद मोठ्या प्रमाणात उमटलेले आहेत आणि याची सखोल चौकशी आता सुरू झालेली आहे.
लवकरच या संदर्भामध्ये सर्व माहिती वरिष्ठ कार्यालयामध्ये जमा करून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत निर्माण झालेले आहेत पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खऱ्या अर्थाने पुनर्वसन मध्ये भामट्या आणि चमचेगिरी करणाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी असली तरी मराठी माणसाच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये त्यांच्यासाठी ही एक चुकीच्या कामकाज केल्याची आघाऊ सूचनाच म्हणावि लागेल.
लवकरच या घटनेमुळे तालुक्यातील पुनर्वसन जमिनीच्या बोगस लाभार्थ्यांना दलालांना त्यांच्या आशीर्वादासाठी कामकाज करणाऱ्या राजकीय आक्कांना तसेच या सर्वांना मदत करणाऱ्या शासनातील काही भामट्यांना सरकारकडून पटलावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत आणि यातून जे दोषी निघतील त्यांच्यासाठी सरकारी इतमाने वेळ पडल्यास कारागृहात आराम करण्याची संधी सुद्धा मिळवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
विशेष वाचा
गोपाळवाडी मध्ये पुनर्वसन जमिनींच्या घोटाळ्यात अडकलेल्या एका दलालाने मी आजारी आहे.हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे.अशा बहन्याने तोंड लपवण्यास सुरुवात केली असून त्याला गोर गरिबाच्या जमिनी लुटल्याने प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे.या पुनर्वसन जमिनीतून मिळवलेली बक्कळ माया घेऊन त्याने कर्जत तालुक्यामध्ये मोठी बागायत जमीन घेतलेली आहे.
दौंड परिसरात काही ठिकाणी त्याची अजूनही जमीन शिल्लक असून त्यामध्ये त्यांनी प्लॉटिंग करून विक्री करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.स्टॅम्प विक्रेता त्यात मागे नसून त्याने दलाली मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या नावाचे प्लॉटिंग विकण्याचा बहाणा केला असला तरी प्रत्यक्षात त्याचा सहभाग आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
या दोघांनी आणि त्यांना आशीर्वाद असलेल्या पुण्याचा भामटा दौड मधील आका आणि त्यांच्या टोळीने मोठा धुडगूस घालून अनेक गोर गरिबांच्या कुटुंबांना आर्थिक मानसिक त्रास दिलेला आहे.



