देऊळगाव गाडा गावात मुरूम तस्करांचा धुडगूस?

दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:विजय चव्हाण

देऊळगाव गाडा गावात मुरूम चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातलेला असून गावच्या परिसरातील टेकड्या आणि टेकड्या लगतच्या जमिनींना याची मोठी झळ पोहचली आहे.गावच्या साधारण लोकसंख्येचा विचार केल्यास मुरूम वाहतूक आणि खोदाई करणारी यंत्र सामुग्री मोठ्या प्रमाणात आहे.महसूल विभागाला त्यांच्या चिरीमिरीत दिसत असून यात आंधळे पना आलेला असून कारवाई अद्याप म्हणावी एवढी भक्कम झालेली नाही परिणामी गेली दहा पंधरा वर्ष अधिक या गावच्या परिसरात मुरूम तस्करी मोठ्या दिमाखाता सुरू आहे.

दौंड तालुक्यात या गावात सर्वाधिक दहा चाकी अवजड वाहने असून यात एखादा अपवाद सोडल्यास या वाहनांना नंबर नाहीत.आर टी ओ विभागाला महिन्याला वाहन मालक पाकीट देत असल्याने त्यांच्या वाहनाकडे हा विभाग जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आलेला आहे आणि आज करीत आहे.

चौफुला,केडगाव,वाखारी,दापोडी, खापोडी,पारगाव,या टप्प्यातील नवीन बांधकामे रस्त्यांची कामे यासाठी लागणारा मुरूम याच भागाशिवाय मिळत नाही.महसूल विभागातील एका अधिकाऱ्याला मुरूम चोरी बाबत माहीत विचारले असता गावात मी मुरूम चोरी करणारी वाहने पकडली होती.कारवाई करण्यासाठी प्रयत्न करताना आमच्या गावच्या विकासाला तुम्ही आडवे येऊ नका अशा स्वरूपाची धमकी मालक देतात शिवाय राजकीय भिती दाखवतात तुम्ही काही केले तरी आम्हाला राजकीय आशीर्वाद आहे पुढे काहीच होऊ शकत नाही अशी भाषा वापरतात.

मुरूम चोरट्यांना खरच राजकीय आशीर्वाद आहे का?आणि कोणाचा आहे !

गावच्या लोकवस्तीचा आकडा पाहिल्यास आणि गावात राजकीय गट तट पाहता गावात राजकारणात येथील नागरिकांना मोठा रस आहे.नेत्याच्या नावाने गावात राजकारण माणुसकी सोडून केले जाते.कुरघोडी करणाऱ्यांची गांवात कमी नाही.

परिणामी कोर्ट कचेरी प्रकरणे कमी नाहीत हा सगळा प्रकार प्रामाणिक पणाने पाहिल्यास राजकारणाचा भाग म्हणून दिसून येईल अशा गावात कार्यकर्ते सांभाळण्यासाठी नेते मंडळींना लक्ष द्यावे लागते कोण कार्यकर्त्याला जवळ घेऊन बोलावे लागते गावातला गाव पुढारी म्हणून उगाच किंमत द्यावी लागते असा राजकारण्यांचा कारभार सर्वत्र दिसून येतो हे गाव त्याला अपवाद नाही.

मात्र गावात राजकीय आशीर्वादाचा गैर अर्थ काढून माती मुरूम चोरण्यासाठी करतात का? आणि त्यांना खरच राजकीय मान्यवर आशीर्वाद देत असतात का ? आणि देत असतील ते नक्की कोणत्या पदावर आहेत हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.

गावात मुरूम तस्करांनी टोळी निर्माण झालेली आहे विशेषतः हे तस्कर शनिवार रविवार सरकारी सुट्टीचा नियोजन बघून तस्करी करत असतात आणि रोज संध्याकाळी साडेपाच नंतर सरकारी ऑफि बंद झाले की यांचा व्यवहार आणि व्यवसाय सुरू होतो
परिणामी या मुरूम तस्करांवरती ठोस कारवाई करणारी यंत्रणा या तालुक्यात आहे का? असाच प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.