भविष्यात आरोग्याच्या प्रश्नावर तालुक्यातील जनतेला द्यावे लागणार तोंड.
केडगाव:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण
धरणांचा विस्तार करताना धरण परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन जास्तीत जास्त दौंड तालुक्यात केले आहे.त्यांना येथील नागरिकांच्या जमिनी दिल्या आहेत आणि बदल्यात तालुक्यात सध्या पुणे शहरातील नदीपात्रात सोडलेल्या मैंल्या मिश्रित हिरवे काळे रंगाचे पाणी दिले जात आहे.तालुक्यातील स्वाभिमान बाळगणारी जनता या पाण्यासाठी आतुर झालेली असली तरी तालुक्याला बेबी कॅनॉलने सद्या मिळणारे पाणी म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा म्हणावी लागेल.
सध्या उन्हाच्या चढत्या पाऱ्याने उन्हतेची दाहकता वाढते आहे.पिण्याच्या पाण्याची तालुक्यात गेली अनेक वर्ष वाट लागल्याने तालुक्यात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.शेती सिंचनाचा विषय बिकट झालेला आहे.
खडकवासला कॉनॉलचे पाणी मिळवणे अवघड झाले असल्याने बेबी कॅनॉलच्या पाण्यावर शेती सिंचन भागवता येईल असा आशावाद शेतकऱ्यांचा आहे.
बेबी कॅनॉल मध्ये कोरेगाव पार्क (पुणे) येथून नदी पात्रातून पाणी फिल्टर करून सोडण्याची योजना असताना प्रत्यक्षात पाणी फिल्टर केले जात नसूनते सरळ विद्युत पंपाच्या साह्याने कॅनॉल मध्ये सोडले जात आहे.

नदी पात्रता पाणी कमी आणि पुणे शहराच्या गटारी सांडपाणी चे प्रमाण जास्त आहे.सरळ हा घन पाण्याचा मैंला दौंड तालुक्यातील गावांमधून आणि शेती प्रयत्न पोहोचलेला आहे.पाण्याचा रंग काळा आणि हिरवा असून त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते आहे.
याचा सद्या फायदा पिके जाळून जाऊ नयेत असा होताना दिसत असला तरी या पाण्यात उतरून शेतीला पाणी देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्वचा रोगाची भीती असू शकते उग्र वासाने स्वसनाचा रोग होऊ शकतो.
पाण्याचा सध्याचा प्रवाह पाहता त्याला पाणी म्हणून कोण संबोधणार असेल त्याचा खऱ्या अर्थाने सत्कार करावा लागेल.
पुणे शहराच्या पश्चिम भागात पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि दौंड तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी नवीन धरणे बांधण्यात आली आणि त्यासाठी त्या भागातील ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना पर्याय म्हणून दौंड इंदापूर आणि हवेली तालुक्यात पुनर्वसन केले आहे.त्यांना या तालुक्यातील नागरिकांच्या जमिनी देण्यात आल्या आहेत.
मात्र ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना सध्या पिण्याचे पाणी नाही आणि शेतीला सुधा त्या धरणातील पाणी मिळत नाही दिले जाते आहे ते पुण्याच्या गटारींच्या मधील घाण पाणी हे पाणी सध्या शेती ची गरज भागवणारा विषय असला तरी त्याच्यातून येणाऱ्या दुर्गंधी आणि जंतूंनी आरोग्याला बाधा पोहचणार आहे त्याची मोठी चिंता सध्या शेतकऱ्यांना नसली तरी भविष्यात याचे आरोग्यावरील त्वचा आणि श्वसनाच्या रोगाबाबत शाश्वती देता येणार नाहीत ही खऱ्या अर्थाने भविष्यकाळातील तालुक्यासाठी घातक असणारी घटना असली तरी शेतकऱ्यांना आणि येथील ग्रामस्थांना नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणावी लागेल.




