पुनर्वसन दलाल बिरबलाच्या भूमिकेत लबाडी उघडी होऊ नये म्हणून प्लॉटिंग मधून कमवतात पैसे

दौंड:आवाज लोकशाहीचा
| विशेष (भाग ५ )प्रतिनिधी-विजय चव्हाण


दौंड पुनर्वसन जमिनी लुबाडणाऱ्या टोळ्यातील काही बहाद्दर स्वतःला मोठे बिरबल समजत आपली चोरी उघड होऊ नये म्हणून काही डावपेच करून आपला जमीन विक्री व्यवसाय जोरात करत आहेत.

सुरवाती काळात पुनर्वसन जमीन शोधायची ती ओळखीच्या गरीब खातेदाराला मिळवून द्यायची त्याच्या कडून बिंनताबा साठेखत करून तिची विक्री परवानगी आण्याची आणि परवानगी आली की खातेदाराला फसवून खरेदी खत करून घ्यायचे ती खातेदाराच्या परस्पर विकून टाकायची आलेल्या पैश्यात त्याचा परिसरात पुनर्वसन नसलेली एखाद्याची जमीन विकत घेऊन त्यावर प्लॉटिंग करून गुंठ्याने विकायची हा बिरबली धंदा करीत आहेत.

लिंगाळी,सोनवडी,गोपाळवाडी आणि दौंड शहराच्या अवती-भवती हा धंदा जोरावलेला आहे.यात स्टॅम्प विक्रेता एक मुरब्बी राजकारणी त्याच्या पोरगा तसेच दलाल यांची टोळी आहे.

सोनवडीत अश्याच स्वरूपाचे प्लॉटिंग करून विकलेले आहे विशेष यात दलितांच्या नावाखाली दौंड पंचायत समितीच्या माध्यमातून काँक्रिट रस्ता केल्याची मोठी चर्चा आहे.प्रेमाचे नगर म्हणून त्याची ख्याती झालेल्या आहे यात भागीदार अनेक असून विक्रीची जबदारी कोणी एकट्याने घेतलेली होती त्याने पूर्ण सुद्धा केलेली आहे अशी सुद्धा ओरड आहे.

लिंगाळी परिसरात अश्याच स्वरूपाचा धंदा सुरू आहे भामटे गिरीतून पैसा कमावण्याचा हा गोरख धंदा मात्र असणाऱ्या दलाला पैकी काहींचा तेजीत असून शहरातील टोळी यात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

दौंड पाटस रोडवरील मूळ पुनर्वसन खातेदाराला अंधारात ठेऊन शहरातील एका प्रतिष्ठित समजणाऱ्या महिलेला उभी करून जमीन विक्री केली आहे.जमिनी सद्या अकृषिक करण्यासाठी शासनाच्या दरबारी दाखल करण्यात आलेली आहे अशी माहिती हाती आली असून या जमिनीच्या बाबत मोठा घोटाळा असून विकणारे पैकी एका ठग पाटस येथील जमीन प्रकरणात संशयित आरोपी म्हणून गुन्ह्यात नाव आहे.

हा धंदा तेजीत करणाऱ्यांनी पुनर्वसन खातेदारांची खोटी कागदपत्रे देऊन जमिनी मिळवल्या आहेत या मध्ये काही गावांमध्ये सुद्धा बोगस कागदपत्रांद्वारे जमिनी मिळावल्याची यादी तयार करण्यात आली आहे.

दौंड शहराच्या पूर्व भागात विठू बाळू शेडगे रेणुका चंद्रकांत साठे कुसा मपा न्हावी शेवंताबाई बाप्पू दरेकर गोजाबाई राघू पासलकर अनंता कांता रावजी मोरे सोमा गेनू दोन्हे,तुकाराम रामभाऊ पासलकर दगडू गेणू दोन्हे बाळकू बिरू मरगळे रामभाऊ भागू मरगळे सहदेव महादेव न्हावी, काळूराम नामदेव ओव्हाळ विलास नारायण मोरे लक्ष्मण सखाराम शेडगे भागू मारुती नाक्ती,फुलाबाई लक्ष्मण पासलकर अनु दगडू शेडगे दामोदर नारायण मोरे हौसाबाई नथू पासलकर भरत रामचंद्र शेडगे राजू किसन कडू कोंडीबा धोंडू घाडगे अनुसया रावजी काळे, मैत्री गेनू दोन्हे, चंद्रकांत दिनकर हळदे सचिन विनायक दोन्हे , रामचंद्र पांडू राघू शेडगे गिरीश लक्ष्मण मारणे कैलास ज्ञानोबा हळदे पांडू खंडू शेडगे सखाराम राजाराम पांडू शेडगे सकाराम राजाराम पांडू शेडगे श्याम लक्ष्मण शेडगे किसन नामदेव मोरे कोंडीबा विठू मरगळे गणू महादू दबडे अलका सुदाम मोरे या लोकांना जमिनी कशा मिळालेल्या आहे.

त्यांच्या जमिनी बोगस कशा आहेत याबाबत अहवाल दौंडच्या तहसील कचेरीने पाठीमागच्या काळात करून ठेवून त्याची पुस्तिका तयार केलेली आहे अशा खातेदारांच्या जमिनीवरती दलाल आणि त्यांची टोळी लक्ष ठेवून असते.आधीच बोगस मिळालेली जमीन मूळ मालकाला माहित असल्याकारणाने या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी त्यांच्या कुठल्याही स्वरूपात ही शंका उपस्थित होत नाही.याचा पुरेपूर फायदा दलाल आणि त्यांची टोळी घेते परिणामी अशा जमिनी ते घेऊन विकतात त्यातून पैसा कमावतात त्या पैशातून परत स्थानिक लोकांच्या पुनर्वसन नसलेल्या जमिनी विकत घेतात आणि त्या जमिनीवरती प्लॉटिंग करून आपला व्यवसाय जोरदार करीत पैसे कमवत असतात हा सर्व प्रकार गेले अनेक वर्षापासून दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुकवलेला असला तरी यापैकी काही दलाल पुणे शहरात राहून दौंड तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व या व्यवसायात निर्माण करून बसलेले आहे.

वरवंड गावात अशा स्वरूपाचे प्रकार घडलेले असून दौंड शहरात केडगाव पट्ट्यात पिंपळगाव येवत आणि कानगाव ही गाव या संदर्भामध्ये अग्रभागी आहेत या सर्व भानगडींच्या सखोल चौकशीनंतर डझनभर दलाल आणि त्यांची टोळी जेलची हवा खायला जाईल अशा स्वरूपाची जोरदार चर्चा दौंड तालुका आणि परिसरामध्ये होऊ लागलेली आहे.

दौंड शहराच्या परिसरामध्ये स्टॅम्प विक्रेता या सर्व प्लॉटिंग गुंठ्यावरील विकण्याच्या जमिनीमधील महत्त्वाचा दुवा असून विकलेल्या जमिनीवरती बांधकाम व्यवसायासाठी लागलेल्या परवानगी सध्या सेवानिवृत्त असणाऱ्या एका दौंड नगर परिषदेमधील भामट्याने दिलेले आहेत बदल्यात त्याने शहराच्या परिसरात मोठ्या स्वरूपाने स्थावर मालमत्ता कमावले असून ती विक्री करून पैसे कमवलेले आहेत या सर्व घटनेची चौकशी करावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेली आहे.