दौंड:आवाज लोकशाहीचा
पुनर्वसन जमिनी मध्ये शासनाला फसवणाऱ्या दलालानि दौंड तालुक्यात धुमाकूळ घातलेला नाही तर हवेली मध्ये सुद्धा त्यांनी मोठा धुमाकूळ घातलेला आहे एकाच व्यक्तीला अनेक ठिकाणी जमिनी मिळून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या त्यांच्या कारभारावरून संशय निर्माण होतो आहे.
दौंड तालुक्यामध्ये जमिनी दोन वेळा मिळवण्याचा प्रकार अनेक लाभार्थींच्या नावावर करण्यात आलेला आहे. मात्र हे लाभार्थी अशा स्वरूपाची बनवाबनवी करू शकत नाही या पाठीमागे दलाल नावाचा बिरबल कारनविनित असल्या कारणाने बरेच असे उद्योग झालेले आहेत.यामध्ये शासनाचे काही अधिकारी त्यांना सहकारी मित्र बनले असून दोघांनी मिळून या जमिनीच्या खिरापती खातेदारांच्या नावाने वाटायच्या आणि त्या विकून आपण पैसे कमवायचे हा गोरख धंदा १९८८ पासून सुरू केलेला आहे.
पूर्वी या धंद्यामध्ये काही मोजकेच दलाल होते आता त्यांचे काही चेले चपाटे या धंद्यात उतरले असल्याने संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याची काही अंश संख्या केडगाव नानगाव कानगाव दौंड शहर दौंड पूर्व भाग गिरीम वरवंड यवत दापोडी वाखारी पिंपळगाव या गावांमधून सराईत झाल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुनर्वसन परिसरातील दासवे गावामध्ये सखाराम बाबुराव मोरे यांची एक हेक्टर दोन आर जमीन धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेलेली होती बदल्यामध्ये १९८८ ला त्यांना पुनर्वसन विभागाचा आदेश झाला आणि दौंड तालुक्यातील कानगाव या गावी गट क्रमांक ६३ मध्ये ८४ आर क्षेत्र मिळाल्याची नोंद आहे.
धरण क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा मोबदला खातेदार असणारा ऐकदाच दिला जातो मात्र सखाराम बाबुराव मोरे यांच्या पूर्ण परिवारालाच त्याचा लाभ मिळालेला आहे यामध्ये दोन मुल आई पत्नी आणि सून बहीण यांच्या नावाने क्षेत्र मिळालेले आहे हे क्षेत्र कानगाव परिसरात काही गटांमधून मिळाल्याची माहिती असून याच परिवाराला हवेली तालुक्यातील उरळी कांचन गावामध्ये आई पत्नी बहीण आणि स्वतः त्यांच्या नावे क्षेत्र मिळाल्याची माहिती आलेली आहे.
या सर्वांची माहिती दौंड मध्ये तहसील कचेरी आणि प्रांत विभागात मागितले असता या दोन्ही विभागांकडे पुनर्वसन जमिनीच्या संदर्भात असणारे संचित पुस्तक त्यांच्याकडे नसल्याने ते देऊ शकत नाहीत आणि जिल्हा पुनर्वसन विभागामध्ये याबाबतचा मोठा सावळा गोंधळ असल्याकारणाने तेथील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग याकडे गांभीर्याने पाहत नाही मात्र सखाराम मोरे यांना कानगाव मध्ये १९८८ च्या आदेशानुसार गट क्रमांक ६३ मध्ये जमीन मिळालेली आहे तोच प्रकार उरुळी कांचन येथील १४३९ गट क्रमांक मध्ये ३ एकर जमीन मिळाल्याची माहिती हाती आलेली आहे.
४५२/ २ मध्ये उरुळी कांचन येथेच त्यांना ८० गुंठे जमीन परत मिळालेले असून दोन्ही गटातील जमीन मिळून त्यांना जवळपास ५ एकर जमीन ही उरुळी कांचन मध्ये मिळालेली आहे.अशी माहिती मिळाली आहे.
त्यांची आई ताई बाबुराव मोरे यांना ही दोन गटांमध्ये उरुळी कांचन मध्ये १२२९ गट क्रमांक आणि १२३९ गट क्रमांक मध्ये ८० गुंठे जमीन मिळालेली आहे त्यांची पत्नी यांच्या नावे १२२७ आणि १२७४ गट क्रमांक मध्ये एका गटात ३८ गुंठे तर दुसऱ्या गटामध्ये ८२ गुंठे जमीन मिळालेली आहे.
हे सर्व पुनर्विसन विभागाने कटाक्षाने चौकसी केली पाहिजे होती मात्र तसं घडलेलं नाही एका व्यक्तीची धरणात गेलेली जमीन आणि त्यांनी दोन तालुक्यात मिळवलेली जमीन पाहता ही जमीन कशी मिळवण्यात आली हा प्रश्न शंकेचा वास येणारी आहे.त्यांच्या दोन मुलांना सुद्धा आईला पत्नीला आणि सुनेला जी जमीन कानगाव दौंड तालुक्यात कशी ,आणि कोणत्या आधारे मिळालेली आहे हा प्रश्न मोठा गमतीचा असला तरी गंभीर आहे
उरुळी कांचन आणि कानगाव या दोन्ही ठिकाणच्या जमिनी या परिवाराला किती मिळाल्या याची चौकशी झाल्यास या व्यक्तींनी शासनाला फसवलं तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नसून दौंड तालुक्यात सुद्धा दौंड शहराच्या लगत एका दलालाने अशाच प्रकारच्या जमिनीचा मोठा घोटाळा केला असून या घोटाळ्या पाठीमागे स्थानिक त्याची टोळी एक आका यांचा सहभाग आहे याची मोठी चर्चा आहे .
राज्यामध्ये सर्वाधिक मोठा पुनर्वसन जमीन घोटाळा या निमित्ताने झाला आहे असे बोलल्यास चुकीचे ठरणार नाही
शासनाने दौंड तालुक्यामध्ये ७०० एकर जमीन बोगस वाटप झाली म्हणून सरकार जमा करून घेतली होती ती सुद्धा आता सरकारकडे शिल्लक नाही यावरून पुनर्वसन जमिनीचा महाघोटाळा उघड होणारच अशा स्वरूपाची शाश्वत चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.
दौंड शहरालगत जमिनीचे भाव गगनाला भेटलेले असून या ठिकाणी दलालांनी आणि त्याच्या टोळीने अनेक लोकांच्या जमिनी कवडीमोल फसवून खोटे दस्तऐवज करून नावावरती करून विक्री केलेले आहे.यातून प्रचंड माया जमवलेले आहे आणि या मायाच्या जोरावरती ते समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दौंड शहरातच असे महाठक नसून केडगाव यवत नानगाव कानगाव या पट्ट्यात सुद्धा त्यांचे अशा स्वरूपाचे दलाल भाऊबंद पुनर्वसन जमिनीसाठी कामकाज करीत आहेत.दापोडी येथील एका प्रतिष्ठ व्यक्तीचा हा धंदाच असून त्याने आत्तापर्यंत पुनर्वसन जमिनीच्या कामकाजामध्ये मोठी गोरख माया जमवलेली आहे या सर्वांची सखोल चौकशी व्हावी अशा स्वरूपाची मागणी होत आहे.
या जमीन प्रकरणांमध्ये मृत पावलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाकडून होत असून या कुटुंबाचा प्रश्न अनेक वर्षांपासून दौंड शहरात पोलीस विभागात महसूल प्रशासनात भिजत पडलेला आहे तो मार्गी लागेल की नाही ही सुद्धा शंका या सर्व दलालांच्या सरकारी कार्यालयातील संबंधामुळे उपस्थित होत आहे.
पुनर्वसन जमिनीच्या संदर्भामध्ये लवकरच महामोर्चा निघणार असून यासंदर्भामध्ये प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तालुक्यातून एक प्रतिष्ठित व्यक्ती लवकरच जिल्हा अधिकारी पुणे यांना लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन मागणी करणार आहे.
निवेदन दिल्यानंतर सदर व व्यक्ती यांचे नाव जाहीर करावे अशा स्वरूपाची माहिती संबंधितांना आवाज लोकशाहीचाला दिल्यामुळे त्यांच्या नावाचा नाम उल्लेख सध्या टाळला जात आहे.
……………………..हे वाचा ………,……
शहरातील पुनर्वसन जमिनीवरती झालेल्या सदनिका आणि व्यापारी संकुले यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली असून या मध्ये आका,बांधकाम व्यवसायिक ,नगरपालिकेच तत्कालीन एक अधिकारी,यांच्यासह दलाल आणि स्टॅम्प विक्रेता यांच्या घोटाळ्याचे बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे



