दौंड:आवाज लोकशाहीचा
जमिनी मिळवण्यासाठी दलाल आणि त्यांच्या टोळीने तालुक्यातील जमिनी मधील मातीत कुणाचे रक्त सांडले कोणाला आत्महत्या करावी लागली असून काहींवर जीवघेणे हल्ले करीत मारण्याचा प्रयत्न केले आहेत या सर्व विषय गांभीर्याने पाहिल्यास पुनर्वसन नावाने तालुक्यातील जमीन दलाल यांच्या कारभाराने रक्त रणजीत झालेली आहे.याची सविस्तर माहिती आवाज लोकशाहीचा मधून सुरू झाल्याने दलाल आणि त्याचा आका सह टोळीचे धाबे दणाणले आहेत.
पुनर्वसन जमिनीचा घोटाळा करणाऱ्यांनी भलतीच अक्कल लढवली असून काही जमिनीचा वारेमाप मोबदला मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत.सुरवातीला इंदापूर तालुक्यातील मदानवाडी परिसरात वडिलांनी जमीन मिळवली आणि विकली त्यातून पैसे कमवले वडिलांच्या निधनानंतर त्याचा विषयाला अनुसरून मुलाने दौंड तालुक्यातील कानगाव,यवत,सहजपूर या गावांनी मिळवून विक्री केली आणि पैसे मिळवले आहेत.
पुनर्वसन नावाने या प्रकरणात उच्च न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे.असा आरोप सुधा झाला असून न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यासाठी नव्याने या कारभार बाबत कामकाज करण्यासाठी प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की २० ऑक्टोबर १९७५ मध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या आदेशाने एका व्यक्तीने धरण क्षेत्रात जमीन गेली म्हणून इंदापूर तालुक्यात मदनावाडी भागात ६ हेक्टर ५ आर तसेच पोटखराबा ४३ आर अशी जमीन मिळवलेली होती.मिळवलेली ही जमीन १९९३ मध्ये एप्रिल महिन्यात ४ इसमाना विक्री केली त्यातून पैसे कमवले.
दरम्यानच्या काळात जमीन मिळवून विक्री करणारा इसम मयत झाला त्याच्या मृत्यू नंतर त्यांच्या वारसा असल्या मुलाने आम्हाला जमीन मिळावी म्हणून काही दलाल यांच्या मार्फत न्यायालयात गेला न्यायालयाची दिशाभूल केली हा सध्या आरोप झालेला आहे.हा प्रकार कायदेशीर बाबींचा विषय असला तरी सध्या वारस असलेल्यांनी दौंड तालुक्यात तीन गावात जमिनी मिळवल्या आहे आणि त्यांची सुधा विक्री झालेली आहे ही बाब चुकीची आहे.दिशाभूल करून जमिनी मिळवण्यात असल्याने एका तक्रार दराने उच्च न्यायालयात या सर्व बाबींना दखल सुद्धा केलेले आहे अशी माहिती हाती आली आहे.
या प्रकरणात सर्व प्रथम धरण क्षेत्रात मूळ असलेल्या व्यक्तीची जमीन किती गेली होती,त्याला बदल्यात किती जमीन इंदापूर तालुक्यातील भिगवण तक्रारवाडी मध्ये किती मिळाली ती जमीन विक्री झाल्यावर त्यांचे वारस कोणत्या आधारे जमीन नव्याने मागणी करून गेले आणि उच्च न्यायालयाने त्यांच्या बाबत कोणत्या आधारे निर्णय घेतला दौंड तालुक्यातील या परिवारात कोण कोणाच्या नावाने जमीन मिळालेली आहे.जे कोण वारस असतील त्यांना यवत,सहजपूर आणि कानगाव मध्ये मिळालेली जमीन खरच कायदेशीर मिळाली का ? या सर्व प्रश्नाचा गुंता निर्माण झाला आहे.या पाठीमागे वरील जमिनी वाटपा बाबत या सर्वांच्या विरोधात दाखल करून खटला दाखल करण्यात आलेला आहे .
जमिनीचा नुसता खटला चालू नाही या साठी एकावर कोयत्याने हल्ला केला गेल्याची माहिती मिळत आहे. ज्याच्यावर हल्ला करण्यात आला त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही असा आरोप सुधा पोलिस बांधवांवर झालेला आहे.
पुनर्वसन हा देशातील अनेक झालेल्या घोटाळ्यांपैकी सर्वाधिक जमीन प्रकरणातील मोठा घोटाळा म्हणता येईल आणि हा सर्व घोटाळा खऱ्या अर्थाने जर समाजापुढे नागरिकांपुढे आणायचा असेल तर पुनर्वसन विभागाची प्रामाणिक चौकशी करून जनतेसमोर मांडणारा प्रामाणिक अधिकारी महत्त्वाचा आहे.पुनर्वसन जमिनीच्या वाटपाचे प्रकार तसेच या विभागातून अनेक बोगस आदेश आणि चुकीचे लाभार्थी घडलेले आहेत आणि याचा अहवाल दौंड पुरंदर तत्कालीन प्रांत यांनी कायदेशीर इच्छा ७०० एकर जमीन ताब्यात घेतलेली होती सध्या त्या जमिनीचाही वाटप झालेला आहे जवळपास ५० वर्षा पासून दौंड तालुक्यामध्ये इंदापूर आणि हवेलीच्या काही भागात पुनर्वसन जमिनीच्या संदर्भामध्ये वाटपाचे काम सुरू आहे..
धरण क्षेत्रामध्ये किती जमीन गेली होती आणि किती लाभार्थींना दिली गेलेली आहे अजून किती लाभार्थी शिल्लक आहे.हाच ताळमेळ पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी विभागात नसल्याने हा अंदाज आंधळा कारभार मनमानी स्वरूपाचा जिल्ह्याच्या पुनर्वसन विभागात होतो आणि हे करण्यासाठी काही दलाल पत्रकार राजकारणी आणि पुनर्वसन विभागातील अधिकारी यांची मोठी टोळी निर्माण झालेली आहे.या टोळीचा परदा फार्स करण्यासाठी तुकाराम मुंढे सारखे अधिकारी प्रशासनातून आले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे
………………..महत्वाचे ……………
पुनर्वसन जमिनीच्यानात वाटप झालेल्या सर्व नोंदी तपासल्या पाहिजेत .कोणाची जमीन गेली आणि बदल्यात त्याला किती मिळाली याचा तपशील उघड झाला पाहिजे अजून किती लोकांना जमीन देणे बाकी आहे ,आणि जमिनी वाटपाची शिल्लक किती आहे याची माहिती प्रसार माध्यमांना दिली पाहिजे .जमिनी विक्री परवानगी दिलेल्या व्यक्तीची माहिती मिळाली.पाहिजे ही सर्व झाल्यास दलाल आणि त्यांना मदत करणारे अधिकारी उघडे पडतील शासनाचा पुनर्वसन घोटाळा बाहेर निघेल.



