पुनर्वसन जमिनी विक्री साठी धुमाकूळ घालणारे दलाला आणि त्यांना आशीर्वाद देणारे मोकाट!

दौंड:आवाज लोकशाहीचा

पुनर्वसन दलालांनी राजकीय आणि शासकीय आशीर्वादाने   धुमाकूळ घातलेला असून एकाच कुटुंबाला दोन दोन ठिकाणी जमिनी मिळवून देण्यासाठी उलट सुलट धंदे करायचे आणि त्या कुटुंबाकडून कवडीमोल किमतीने त्यांच्याच जमिनी घेऊन विक्री करण्याचा मोठा धंदा गेली अनेक वर्षं दौंड तालुक्यात सुरळीत केला आहे.

सन-२०१३ मधे पुरंदर दौंड प्रांत यांनी काही संशयित जमिनीची पडताळणी केली आणि यामध्ये मोठा घोटाळाच समोर आला आहे 

हा जवळपास ७०० एकर अधिक जमीन ही बोगस वाटपाने करून घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्या सरकार जमा करून घेतल्या असल्या तरी या पाठीमागच्या सूत्रांनी त्यांनी क्लीन चिट कशी दिली हा प्रश्न शंका उपस्थित करणारा आहे

या मध्ये हाती आलेल्या माहिती नुसार दौंड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये देऊळगाव राजे हे गाव आहे.या गावांमध्ये १४ लोकांनी बोगस जमिनी मिळवल्या होत्या या सर्व सरकार जमा आहेत.यामध्ये दाखू रत्न दबडे व सखुबाई राणी अन्य या लोकांसाठी जमीन गट नंबर २९०/१ मधे २ हेक्टर २आर जमीन मिळालेली होती.ती १५ सप्टेंबर २०१४ मधे सरकार जमा केलेली आहे.

गणूबाई मारोतराव मोरे व शिवाजी मोरे यांनी जमीन गट नंबर २०९/१ मधेच २ हेक्टर जमीन मिळवलेली होती ती सुधा ३१ ऑक्टोबर २०१४ मधे सरकार जमा केलेली आहे.

याच गटात लक्ष्मण बाळाची पासलकर यांनी २ हेक्टर २ आर जमीन मिळवलेली होती.

सीताबाई सखाराम कोळेकर यांना २ हेक्टर २ आर जमीन मिळालेली होती.

सोनू ज्ञानू जाधव यांना १ हेक्टर २० आर राघू रामजी शेडगे यांना १ हेक्टर २० आर जमीन मिळालेली होती.

फक्त यामध्ये एक दोन तीन असे हिस्से दाखवण्यात आलेले आहेत ही जमीन सरकार जमा ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सरकार जमा केली आहे.

असेच खातदार बोगस करून मिळवलेल्या मधे त्याचं गटात रामजी बाबू दबडे यांचे सुधा नाव आहे.

सोनू दाजी शेडगे यांना १ हेक्टर ६० आर जमीन मिळालेली होती ती सुधा सरकार जमा केलेली होती.

सोनू दाजी शेडगे यांनी ८० आर क्षेत्र जमीन गट नंबर २४८/१ मधे मिळवलेली होती ती सुधा यांच्याच बरोबर सरकार जमा केलेली आहे.

धोंडीबा भागू मरगळे यांनी १ हेक्टर ६१ आर जमीन गट नंबर २४७/९ मधे मिळवलेली होती ती सुधा याच बरोबर सरकार जमा झालेली आहे.

भगवान वाहू पवार यांनी गट नंबर २४७/९ मधे १ हेक्टर ६१ आर जमीन मिळवलेली होती ती २४ ऑगस्ट २०१५ मधे सरकार जमा झालेली आहे.

रामचंद्र तुकाराम शेडगे यांनी जमीन गट नंबर २९०(२/१/)४ मधे २हेक्टर १ आर जमीन मिळवलेली होती ती सुधा १८ एप्रिल २०१६ मधे सरकार जमा झालेली आहे.

या १४ लोकांना जमीन मिळवून देणारे सर्व दलाला होते अशी सद्या ओरड असून दलाला ला सद्या पुनर्वसन चे मान्यवर म्हणून सुधा ओळखले जात आहेत अशी मोठी चर्चा सुरू आहे तर दौंड तालुक्यात या जमिनी बोगस वाटप कसे झाले कोणी करून घेतले हा प्रश्न कोण सोडविणार हे मोठे कोडे आहे

शासनाची या निमित्ताने फसवनुक झालेली उघडपणे दिसत असताना सुद्धा या सर्वांना कुठल्याही स्वरूपाची शिक्षा न करता सरकारने असेच वाऱ्यावर कसे सोडले हा प्रश्न खऱ्या अर्थाने पुनर्वसन जमिनीच्या अर्थकारणाचा कळीचा मुद्दा म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.

शासनाच्या कामात अडथळा केला म्हणून शासकीय अधिकारी अनेक मान्यवरांना धमकी देत असतात भीती दाखवत असतात मात्र जवळपास ७०० एकर जमिनीची दुबार वाटप करून घेणाऱ्या या सर्व शेतकऱ्यांना पुनर्वसित नागरिकांना आणि त्यांना जमीन मिळून दिलेल्या दलालांना कोण? शोधणार कोण कारवाई करणार ? हा आता खऱ्या अर्थाने ऐरणीवरचा विषय झालेला आहे.

दौंड तालुक्यात पुनर्वसन जमिनीचा महाघोटाळा यानिमित्ताने उघड होऊ लागला असून प्रामाणिक अधिकाऱ्याने अतिशय मनापासून याची चौकशी केल्यास महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक मोठा घोटाळा म्हणून पुनर्वसन घोटाळ्याचे नाव झाल्या शिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची चर्चा दौंड शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.

| विशेष वाचा

पुणे जिल्ह्यामध्ये पुनर्वसन विभागाने  दौंड तालुक्यामध्ये ७०० एकर अधिक जमीन जर परत घेतल्या असतील तर या जमिनीचा घोटाळा करणारे नक्की कोण? याची जबाबदारी कोणावर आहे हे सुद्धा नागरिकांना समजणे काळाची गरज असून या याकडे गंभीर पणाने लक्ष दिले पाहिजे होते ,

सर्व घोटाळेबाज कारभारात जे दलाल निर्माण झालेले आहे ते दलाल आणि त्यांचा आका आता सर्वसामान्य नागरिकांना समजला पाहिजे अशी सुद्धा अपेक्षा आता होऊ लागलेली आहे..