आवाज लोकशाहीचा
भिगवण:प्रतिनिधी :- तुषार हागारे
येणारे दिवस हे बदलत असतात त्यामुळे कष्ट करा मेहनत करा मोकांना सहकार्य करून विदयार्थ्यांनी मनामध्ये न्यूनगंड न बाळगता मेहनत करावी घरातील आपले आई वडील हेच देवी देवता असून त्यांचा सन्मान करावा असे प्रतिपादन क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडीयम स्कुलच्या 15 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात भरणे बोलत होते. यावेळी भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी संजय खळदकर,सरपंच दीपिका क्षीरसागर, संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात, तुकाराम बंडगर, अँड महेश देवकाते,अजिंक्य माडगे, महेश शेंडगे,निखिल बोगावत, राजू हगारे,प्राचार्य वंदना थोरात आदी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेतील यशस्वी विदयार्थ्यांना क्रिडामंत्री भरणे यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदमसिंह भोसले यांनी केले तर आभार कावेरी नायब यांनी मानले.



