दौंड नगरपालिकेत भाजपची शरणागती?पक्ष निवडणूक लढणारा नाही शहरात मोठी चर्चा!

आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण
दौंड नगरपालिकेत भाजपाचा ‘रिमोट कंट्रोल’ राजकारण? – पक्षाच्या प्रतिष्ठेला लागलेले गालबोट!
दौंड शहरात एक सरळ-सोट नागरी चर्चा जोर धरतेय — “भाजपला इथे स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची देखील ताकद नाही का?” अशी चर्चा एखादी अफवा नाही; तर गेल्या तीन दिवसांत एकाही इच्छुकाने भाजपच्या चिन्हावर अर्ज दाखल न केल्यामुळे निर्माण झालेली वस्तुस्थिती आहे.
भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या राजकीय ताकदीवर आधीच टीका -टिप्पणीचे सावट होते; आता मात्र परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शहरात थेट सवाल केला जातोय — “दौंड तालुक्यात भाजप कोणाच्या रिमोटने चालते?असा.सवाल शहरात भाजपाचा साठी उठला.आहे
शहराच्या सत्तेत अनेक वर्षे ‘वादळ’ बनून राजकारण करणारे प्रेमसुख कटारिया हे नाव राजकारणातील सर्वात प्रभावी आणि विवादित मानले जाते. नागरिकांचे स्पष्ट मत — “शहरात भाजपाचा आनंद कटारिया यांच्या इच्छेवरच अवलंबून असतो.”
भाजपाचे कार्यकर्तेही कटारिया यांच्या आशीर्वादा शिवाय पालिका जिंकण्याची कल्पनादेखील करत नाहीत, अशी धारणा अधिक ठळक होत आहे.
एकीकडे आमदार कुल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटत्वाचा गवगवा करतात… परंतु दुसरीकडे स्वतःच्या शहरात भाजपाला पालिका निवडणुकीत उतरवण्या इतकंही अस्तित्व उभारू शकत नाहीत.
ही परिस्थिती आमदार कुलांसाठी केवळ लाजिरवाणीच नव्हे, तर पक्षासाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेला सर्वात मोठा पक्ष, दौंडसारख्या तालुक्यात दुसऱ्याच उंबरठ्यावर बसून राजकारण करत असल्याची केविलवाणी छबी शहरात तयार होत आहे.
निवडणूक दारात येऊन ठेपली, नऊ वर्षांनी शहराच्या राजकारणात परिवर्तनाची संधी हाक देत उभी आहे… पण भाजपकडून एकही अर्ज नाही. नागरी प्रश्न अगदी थेट — “कमळ चिन्हावर उभे राहण्याची भीती का?”
विरोधकांची नजर एकाच मुद्द्यावर — भाजप चिन्हावर लढणार का? जर भाजपने चिन्ह टाळले, तर विरोधक नगरपालिकेच्या राजकारणात टिंगल- टवाळीचे  महाभंडार उघडायला सज्ज आहेत
आमदार कुलांनी आता वेळ न दवडता भाजपाचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणे आवश्यक आहे. दौंडमध्ये कमळ ताठ मानेने फुलवणे ही त्यांची प्रतिष्ठेचीच लढाई आहे. अन्यथा शहरातील सामान्य नागरिकही म्हणू लागलेत— “राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता… पण दौंडमध्ये मात्र भाजप दुसऱ्याच दरवाज्यावर उभं राहतंय!”
नगरपालिकेची निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची नुसती नसून कुल यांच्या राजकीय अस्तित्वाला गालबोट लागणारी सुद्धा आल्याने त्यांना शहरात कमळावर निवडणूक लढवलीच पाहिजे असा प्रकाराची लोक चर्चा जोर धरू लागलेली आहे