आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण.
मुख्यमंत्री सडक योजने मध्ये मोठा सावळा गोंधळ असून या निधीतील कामांच्या गुणवत्ते बाबत मोठा गलथान कारभार आहे.? कामांचे लावलेले फलक आणि त्याच ठिकाणचे रस्ते पाहिल्यावर ही शंका गडद झाल्याशिवाय राहत नाही .
तालुक्यात या योजनांच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून विभागाचे अधिकारी डोळ्याला पट्टी तोंडाला कुलूप लावून बहिरे पानाचे नाटक करताना दिसत आहेत.
या बाबतची वस्तुनिष्ठ माहिती अशी की तालुक्यात २०१७ ते २०२५ दरम्यानं या विभाने सरासरी ३कोटींच्या पुढची कामे केलेली आहेत. सध्या यांच्याच आशीर्वादाने गरुडा इन्फ्रा नावाची भागीदार ठेकेदाराचा प्रवास सुरू झालेला आहे .
दौंड तालुक्यातील दापोडी बोरीपारधी लवंगारे वस्तीकडे जाणारा मार्ग निधी खर्चासाठी वादाचा विषय ठरला आहे .

एकाच रस्त्यावर दोन वेगवेळे निधी टाकणाऱ्या प्रशासनाने जवळपास दहा कोटींन पेक्षा अधिक रुपयांचा निधी अवघा ४.२०० मीटर साठी खर्च केलेला आहे. हा विभागावर आरोप नाही त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रातून त्यांची माहिती उघड झालेली आहे.उघड झालेले माहितीवर मात्र विभागाच्या वतीने कोणत्याच अधिकाऱ्याने तोंड उघडलेले नाही आंधळा मुके आणि बहिऱ्याच्या भूमिकेत वेळ मारून नेलेली आहे हा प्रकार दौंड दौंड तालुक्याच्या जनतेच्या डोळ्यात धुळपेक करणारा आहे. यातून अधिकारी ठेकेदार आणि या दोघांना आशीर्वाद देणारा आक्का यांची मोठ्या प्रमाणात भरभराट होत असून नागरी सेवेची मात्र वाट लागली जात आहे.
अशाच स्वरूपाचा रस्ता उरुळी कांचन ते डाळिंब या ठिकाणी केलेला फलक लावण्यात आलेला आहे मात्र घटनास्थळीची परिस्थिती पाहता फलकावरील माहिती खर्चाची आकडेवारी काम करण्याच्या गाईडलाईन्स या सर्व घडामोडींचा विचार करता रस्ता मात्र प्रचंड खराब स्वरूपाचा सद्यस्थितीत दिसत आहे काम चालू असताना या विभागाचा शाखा अभियंता रस्त्याच्या देखरेखेस नेमणूक केलेला असताना रस्त्याच्या गुणवत्तेबाबत असा प्रश्न कसा उठू शकतो ही बाब या कार्यालयाकडे शंकेचे बोट दाखवणारी आहे.

रावणगाव नंदादेवी ते नांगरेवस्ती साठी ६.२४० मिटर रस्ता केलेला आहे असे भावलेले गेले आहे प्रत्यक्षात रस्ता अर्धवट आणि दर्जाहीन झालेला आहे हा रस्ता गरुडा इन्फ्रा या भागीदारी कंपनीतील एका भागीदाराच्या नावावर असून २४ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे काम सुरू करण्यात आले होते २३ जून १९१९ ला ते पूर्ण करण्याचे आदेश होते ३२५.९७लक्ष रुपयाचा हा रस्ता कामकाज संपल्यानंतर पाच वर्ष दुरुस्त करण्यासाठी सुद्धा अधिक रक्कम २१.४७लाख रुपये फलकावरच्या माहितीनुसार नमूद केले आहेत.
३२५.९७ लक्ष आणि २१. ४७ लक्ष याची बेरीज काढल्यास साधारण हा रस्ता ६.२४० किलोमीटर रस्त्यासाठी ३५० लक्ष अधिक रक्कम खर्च करून केला आहे .
सध्या रस्त्याची अवस्था पाहता यामध्ये भयानक मोठ्या स्वरूपाचा भ्रष्ट कारभार झालेला आहे असेच चित्र पाहणाऱ्यांकडून स्पष्ट होईल यात शंका नाही पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची तारीख २३ जून २०२४ रोजी मागील वर्षात संपलेली आहे पण हा रस्ता पूर्णत्वाला गेला नाही अशा स्वरूपाची ओरड त्या रस्त्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांचे आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून अशा स्वरूपाची कामे करीत त लोकांच्या सेवा सुविधांच्या रस्त्यामधील पैशांचा भ्रष्ट कारभार करण्याचा कारभार हे कार्यालय करते की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही याबाबत या अधिकाऱ्यांचा कोणत्याही स्वरूपाचा दावा असल्यास त्यांनी आवाज लोकशाहीच्या सभेत सदर रस्त्यावरती उभे राहून नागरिकांबरोबर सडेतोडपणाने चर्चा करावी असे आवाज लोकशाहीच्या वतीने आम्ही नम्र निवेदन करीत आहोत.



