सार्वजनिक बांधकाम विभागात दौंडच्या विकासाच्या भ्रष्ट कारभाराची पाळेमुळे?




विशेष वृत्त : विजय चव्हाण – आवाज लोकशाहीचा

दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) विभागाच्या कारभारावर गंभीर संशय उपस्थित झाला आहे. करोडो रुपयांच्या बांधकाम आणि रस्त्यांचा कारभार करणाऱ्या या विभागात मोठा भ्रष्टाचार असून दौंडकरांच्या विकासाची खरी भ्रष्ट कारभाराची पाळेमुळे या विभागाच्या कारभारात रुतलेली आहेत ?

निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची बिले पूर्ण रकमेने करण्यात आल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर येत आहेत. या प्रकरणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, विभागीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील रस्ते, गटारी, सरकारी इमारती, शाळांच्या दुरुस्ती आणि अन्य बांधकामांवर गेल्या पंधरा आर्थिक वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी प्रत्यक्षात अनेक कामे निकृष्ट दर्जाची केली असून अनेक रस्ते मूळ अंदाजपत्रकाच्या नुसार केलेली नसून नागरिकांना, दिशाभूल करणारी केली आहेत असे नागरिकांचे तक्रारी सूर आहेत.

तर काही ठिकाणी सुरूही झालेली नाहीत. तरीसुद्धा संबंधित ठेकेदारांना संपूर्ण देयके अदा झाल्याचे दस्तऐवज आवाज लोकशाहीचा च्या हाती लागले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार काही रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्याच्या आधीच उखडले आहे. काही ठिकाणी रस्त्याचा पायथा न बसवता थेट डांबर टाकण्यात आले. परिणामी, लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे अधिकारी ‘कामे गुणवत्तापूर्ण झाली’ असा दावा करतात, तर दुसरीकडे गावकऱ्यांच्या नजरेसमोर दररोज उघडणारे खड्डे वेगळीच कथा सांगतात.

“तालुक्याचा विकास म्हणजे भ्रष्टाचाराचे नवे साधन झाले आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांची चलती आहे,” अशी टीका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

याबाबत पीडब्ल्यूडी विभागाकडून अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, जिल्हास्तरीय चौकशी झाली, तर अनेक मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे.

या विभागाचा अधिकारी राजकीय आशीर्वादाने मस्तवेल झालेला असून मोजक्याच ठेकदारा आणि मर्जीतील पत्रकारांनशिवाय कोणालाच जुमानत नाही त्याच्या या विभागात नेमणूक झाल्यापासून आज पर्यंत झालेल्या सेवेत आर्थिक आणि मालमत्ता याची तपासणी प्रामाणिक पणाने केल्यास दौंडच्या विकासाची भ्रष्ट कारभाराची आणि बेबनाव विकासाच्या जाहिरातीची पाळेमुळे इथेच खोलवर रुजलेली आहेत अशी माहिती खात्रीशीर उघडी झाल्या शिवाय राहणार नाही अशी ठाम माहिती त्याने दुखावलेले ठेकेदार देऊ लागले आहेत.