आवाज लोकशाहीचा
पडवी प्रतिनिधी
बारामती शहरातील अलीकडील अपघाताचीच जणू पुनरावृत्ती आज दौंड तालुक्यातील पडवी पाटी येथे पहावयास मिळाली. सकाळी १० ते ११ च्या सुमारास खड्डीने भरलेला ओव्हरलोड डम्पर (हायवा) एम एच ४२ टी ११२८ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गबाजी भिमाजी कोळपे (वय ५५, रा. सोमजाई नगर, वाई, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेल्या अलका गबाजी कोळपे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
एम एच ११सी टी ५७०९ वरून प्रवास करीत होते
घटनास्थळी पाटस पोलिसांनी तातडीने हजेरी लावली, मात्र महसूल विभागाचे अधिकारी पुन्हा एकदा उशिरा पोहोचले. खड्डी वाहतूक करणारा डम्पर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महसूल कर्मचारी घटनास्थळी आले. यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या ढिलाईवर संताप व्यक्त केला.आहे
घटनाघडलेल्या परिसरातून राजरोस रात्रदिवस ऐवद्यरित्या ओव्हरलोड मुरूम तस्करी तसेच खडी वाहतूक गेल्या अनेक वर्षापासून आरटीओ यांच्या आशीर्वादाने महसूल विभागाच्या कृपादृष्टीने सुरू आहे या वाहनांना नंबर प्लेट सुद्धा कधी नसतात चुकून एखाद्या गाडीला नंबर प्लेट असते महिन्याकाठी कार्ड या नावावरती मोठ्या प्रमाणात आरटीओ अधिकारी बारामती यांना हप्ता पुरवला जातो अशी मोठी चर्चा सुरू आहे.
हाच प्रकार तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या साठी आहे,
बारामतीतील अपघात आणि पडवी येथील अपघातात साम्य दिसते. दोन्ही ठिकाणी खड्डी वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड डम्परनेच नागरिकांचे बळी घेतले. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि बेजबाबदार महसूल विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,
“ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पडवी आणि परिसरात राजकीय वरदहस्ताने मुरूम उपसा चालतो आहे. देऊळगाव गाडा परिसरात असलेल्या खडी मशीनवर कोणाचे नियंत्रण आहे? महसूल विभाग का कारवाई करत नाही? हा प्रश्न मोठा आहे. महसूल विभागाचे कामकाज संशयास्पद झाले आहे.”
पडवी परिसरातील नागरिकांनी आता प्रशासनाकडे ठाम प्रश्न उपस्थित केले आहेत. अवैध मुरूम उपसा, ओव्हरलोड वाहतूक आणि बेजबाबदार महसूल विभागाच्या कारभारामुळे निष्पाप लोकांचे जीव जात असतील तर हा प्रश्न फक्त एका अपघातापुरता मर्यादित न राहता संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करतो आहे.



