आवाज लोकशाहीचा – दौंड मध्ये विधानसभेला हेराफेरी झाल्याची चर्चा वाढतेय,!



विशेष प्रतिनिधी – विजय चव्हाण

राज्यात मत चोरण्याच्या आरोपांच्या सावल्याखाली राजकारण धुमाकुळ घालत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप आणि देशभरातील पडसाद यामुळे मतदार आणि राजकीय विश्लेषकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. ही चर्चा आता दौंड तालुक्यातही रंगत आणत आहे.

दौंड तालुक्यातील  विधान सभेची निवडणूक होऊन साधारण वर्ष झाले आहे .निवडणुकीत उमेदवार राहुल कुल आणि  रमेश थोरात यांच्यातील टक्कर राज्यभर लक्ष वेधणारी ठरली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय अभ्यासक थोरात यांच्या विजयाची शक्यता दर्शवत होते, तरी मतदानाच्या शेवटच्या क्षणी बदललेले मत परिणामाने कुल यांच्या विजयाचे साक्षी बनले.

मतमोजणीदरम्यान थोरात यांच्या पराभवाने मतांचे लाखो आकडे गाठले, परंतु विजय फक्त तेरा हजारांपर्यंतच सीमित राहिला. सलग ३० वर्षे सत्ता घरात असलेल्या कुल यांना विजयी होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. त्याचा परिणाम तालुक्यात स्पष्ट दिसून आला: विजयी उमेदवार कुल यांना जाहीर सत्कार मिळालेला नाही,  की त्यांना घ्यावा वाटला नाही ही बाब अभ्यासाची आहे परिणामी गावागावांत विजय मिरवणूक झाली नाही.एके वेळी हत्तीवरून विजयाचे कौतूक केलेल्या मतदारांनी गाव सत्कार सुद्धा केलेला नाही .

पराभूत झालेले थोरात मात्र खचलेले दिसत नाहीत. ते म्हणतात, “लोकांनी मला दिलेली लाखोंची मते हा माझा खरा विजय आहे,काहीही गोंधळ झाला तरी लोकांच्या मतांचा तोटाच झाला नाही.”

तालुक्यातील नागरिक सध्या मतमोजणीतील गडबड, बोगस मतदान आणि प्रशासकीय हस्तक्षेप यावर चर्चा करत आहेत. सोशल मीडियावर हे प्रश्न व्हायरल झाले आहेत, तर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याद्वारे घडलेल्या प्रक्रियेवरही लक्ष ठेवले जात आहे.

दौंडमध्ये विजयी कुल यांचा सत्कार आणि विजयाची मिरवणूक पारंपारिक उत्साहाने पार पडली नसल्याने, तालुक्यात राजकीय वातावरण गोंधळलेले आणि शंका-व्यग्र राहिलेले आहे.

राजकारणाच्या या वादळात एक गोष्ट स्पष्ट आहे – लोकशाहीत मताचा अर्थ आणि मतदारांचा विश्वास हा नेहमीच सर्वोच्च आहे.
मतदाना करणाऱ्यांना हा निकाल मान्य नसल्याने त्यांच्या नाराजीने कुल यांच्या विजयाकडे दुर्लक्ष केले आहे असा कयास  चर्चेत होताना दिसत आहे .
तालुक्यात दिल्लीतील मत चोरीच्या उठलेल्या वादळाच्या चर्चेचे सावट या निमित्ताने गडद होत असताना विजयी उमेदवारा पेक्षा पराभूत झालेल्या उमेदवाराची चर्चा होताना दिसत आहे .