आवाज लोकशाहीचा | विशेष प्रतिनिधी :
विजय चव्हाण
गावे पाण्याविना तहानलेली – कोट्यवधी रुपये खर्च, ठेकेदारांचे काम कागदावरच जास्त अधिकारी ठेकदरांचे साटेलोटे दोघांच्या आशीर्वादला राजकीय करंटे!
दौंड–शिरूर तालुक्यातील नागरिक आजही पिण्याच्या पाण्याविना आहेत. शासनाने जलजीवनगावे मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कोट्यवधी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र चार वर्ष उलटूनही या योजनेतून थेंबभर पाणी मिळालेले नाही. गावे तहानलेलीच राहिली आहेत.

शिरूर तालुक्यातील धामरी गावच्या सरपंच सीमा कैलास शेळके यांनी ३० जून २०२५ रोजी अधिकृत पत्राद्वारे जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार अधोरेखित केला. ठेकेदार व अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळाच करण्यात येत आहे.
दौंड तालुक्यातील महेश आव्हाळे या ठेकेदाराने दोन्ही तालुक्यांमध्ये अनेक गावे कामासाठी घेतली.आहेत
केवळ पाईपलाईन टाकून काम पूर्ण झाल्याचे दाखवले.कामे निकृष्ट केलेली आहेत अशी नागरिकांची तक्रार असून सरपंच शेळके यांनी त्यांच्या कामाचा दर्जा फोटो काढून उघड केला आहे . असे असताना अधिकारी मात्र त्याचे समर्थक म्हणून काम करताना दिसत आहेत
अनेक गावांना पाण्याचा स्रोत, नाही टाकी, शुद्धीकरण यंत्रणा उभारलेली नाही.मात्र पाईप पुरून झाले की
ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचे बिल पास.करणारे अधिकारी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची काळजी घेण्याचे सोडून ठेकदराला प्रामाणिक मदत करीत असल्याचे चित्र आहे
दौंड तालुक्यात सुमारे १५०० कोटी रुपयांचे काम कागदावर झाले, पण प्रत्यक्षात पाण्याचा थेंबही लोकांच्या घरी पोहोचला नाही. जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता पाथरवटकर यांच्यावर गंभीर आरोप असून, तक्रारदारांना गोड बोलून प्रकरण दडपन्याची त्यांची चलाखी श्रुत झालेली आहे
या घोटाळ्याबाबत गावोगावी नाराजी व्यक्त होत असताना लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगत आहेत. अधिकारी–ठेकेदार संगनमतामागे राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय इतका मोठा गैरव्यवहार शक्य नसल्याची चर्चा जनतेत आहे.
संत परंपरेत तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणारे एकनाथ, अस्पृश्यांना पाणी मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातच आज जनतेच्या तोंडचं पाणी अधिकारी–ठेकेदार–राजकारण्यांनी पळवलं आहे. ही बाब गंभीर म्हणावी लागेल .शब्दांचे ओरखडे यांच्या साठी कितीही ओढण्याचा प्रयत्न कोणी केला तरी यांचा निर्लज्जपणाचा कळस झाल्याकारणाने यामधून मार्ग कसा निघणार हा प्रश्न जरी महत्त्वाचा आहे , सरकारच्या पैशावरती या तिघांनी मिळून दरोडा घातला की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे?
या प्रकरणी शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांकडून होत आहे.




