जात-धर्माच्या वादात माणुसकीचा आक्रोश ,यवत प्रकरणाने सामाजिक सलोख्या वर उठलेले प्रश्न!


आवाज लोकशाहीचा ,.विजय चव्हाण |

, यवत,

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर यवत गावात उसळलेल्या संतापाचा उद्रेक जातीय तेढ, सामाजिक फुटी आणि मानवतेच्या प्रश्नावर  निर्माण झाला आहे.

या एका व्यक्तीच्या अघटित कृत्यामुळे उडालेल्या वणव्यात, संपूर्ण गावातील सामाजिक समांतरता कोसळली. “तो त्या धर्माचा”, “हे त्या जातीचे”, असे फासे टाकत, गावात कधीच न पाहिलेले विभाजन दिसून आले. निवडणुकीत एकत्र प्रचार करणारे, उत्सवात सहभागी होणारे मित्र आज एकमेकांकडे संशयाने पाहतात.

घटने नंतरच्या दिवसांत गाव सलग पाच दिवस बंद राहिला. व्यवहार ठप्प, शाळा बंद, आर्थिक उलाढाल थांबली. संतप्त जमावाने काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान देखील केले
संतापाची जागा असावी तेथे सूज्ञ प्रतिक्रिया नव्हती. घोषणांनी गावाच्या शांततेचा ताबा घेतला. ‘धर्माचे रक्षण’ या घोषणा देण्यात आल्या पण ‘मानवतेचे रक्षण’ या संकल्पनेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.

शत्रू धर्म नाही, जात नाही आणि माणूसही नाही. शत्रू आहे तो आपल्या मनाचा ताबा घेणारा संकुचित विचार, जो माणसामाणसात दुही पेरतो.

गावाच्या सामाजिक रचनेत जाती, धर्म, पंथ असतातच. पण जेव्हा हेच घटक एकमेकांविरोधात उभे राहतात, तेव्हा गावगाडा विस्कळीत होतो. ‘या जातीचं गाव’, ‘त्या धर्माची वस्ती’ अशा रेषा जर मनात आखल्या गेल्या, तर पाण्यापासून अन्नधान्यापर्यंत सगळ्या गोष्टींवर जात-धर्म लावण्याची वेळ येईल का?असा प्रश्न सुद्धा विचारत घ्यावा लागेल आणि तो सोडविणारा समाज धर्म तयार आहे का ?हा प्रश्न केवळ यवतचा नाही, तर देशभरातील प्रत्येक गावाचा आहे – आपण माणूस म्हणून जगणार की धार्मिक ओळखीत अडकणार

घडलेल्या घटनेने सामाजिक आरशात डोकावून बघण्याची वेळ आली आहे. धर्म, जात, पंथ यांचं अस्तित्व नाकारता येणार नाही, पण त्यावर माणुसकीचं छत्र कायम ठेवणं हीच खरी प्रगती आहे.

अविचारी पणाने केलेल्या कृत्यात जाळली ती बेकरी कोणाची

अनेकजण लेखनातील अर्थ अनर्थ शोधतील सुद्धा यात शंका नाही मात्र अखेर उरतो तो माणूस प्रश्न त्या नंतरचा विषय आहे आणि म्हणून माणूस समजला की प्रश्न समजतील आणि उत्तर अवघड नसेल म्हणून प्रथम माणूस बनलाच पाहिजे हे चुकीचे ठरवू शकणारे म्हणजे समज विघातक विचार असणार यात शंका नाही

अविचारी विचाराची शिकता झाली अबोल दुचाकी जाळली पण विरोध नाही