अंबिका लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबाराच्या घटनेनंतर ‘लाभार्थी पत्रकारांच्या गटावर’ वादळी चर्चा;

आवाज लोकशाहीचा

केडगाव प्रतिनिधी…

घुंगराचा आवाज थांबवणाऱ्या गोळीबारानंतर पत्रकारांच्या लाभार्थी गटावर वादळी चर्चा!

अंबिका लोकनाट्य कला केंद्रात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडवली असताना, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता पत्रकारितेच्या अंगणातही तीव्र वादळी चर्चा रंगू लागल्या आहेत.

पिस्तुलच्या आवाजाने थकलेल्या घुंगराच्या कार्यक्रमाबाबत प्रसारमाध्यमांनी तात्काळ बातमी प्रकाशित केली. मात्र या माध्यमांमधील काही प्रतिनिधी हेच या कला केंद्राचे लाभार्थी असल्याचा आरोप सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

कलेला सुरक्षा मिळावी यासाठी काही पत्रकारांनी प्रयत्न केले हे निश्चित. पण त्याच वेळी काही पत्रकार हे कलावंतांच्या जवळीक साधून त्यांच्या खर्चावर सहली, खानपानाचा लाभ घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

गोवा व अन्य ठिकाणी विमान प्रवासासह सहली,आणि केंद्रात बियर बार सुरू करण्यासाठी मध्यस्थी, पोलिस अधिकाऱ्यांसोबत पार्ट्या – हे सर्व आरोप आता उघडपणे चर्चेत येत आहेत.

व्यवस्थापकाचा फोन, आर्थिक व्यवहाराची शंका

गोळीबाराच्या प्रसंगानंतर व्यवस्थापकाने सर्वप्रथम एका विशिष्ट पत्रकाराला संपर्क केला होता, असे सांगण्यात येते. हा प्रकार बाहेर येऊ नये यासाठी काही आर्थिक व्यवहारही झाल्याचा आरोप आता समोर येत आहे.

विझलेली वीज’ आणि ‘दाबलेली बातमी’

या केंद्राशी संबंधित वीजप्रकरणही एका पत्रकाराने व्यवस्थापकाकडून आर्थिक लाभ घेऊन दाबल्याचा आरोप केला जात आहे. कला केंद्राच्या घटनांवर सावली टाकणाऱ्या या आर्थिक व हितसंबंधांच्या विळख्यात कला केंद्राचा खरा हेतू हरवतो की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

मित्रपरिवाराची भेट” – व्यवस्थापनाची सफाई

याबाबत विचारणा केल्यावर अशोक जाधव यांनी कोणालाही केंद्राच्या वतीने विमानसेवेने सहलीला नेले नसल्याचे स्पष्ट केले. “मित्रपरिवार म्हणून काहीजण येत असतात,” असे त्यांनी सांगितले


लोककलेचा विकास, सुरक्षितता आणि सन्मान राखण्यासाठी पत्रकार, पोलीस आणि प्रशासनाने पारदर्शकतेची भूमिका घ्यायला हवी. मात्र याच माध्यमातून लाभार्थी बनून कलाकारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही बाब समाजासाठी खेदजनक आहे.