गैरसमजुतीतून दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटकपूर्व जामीन!



आवाज लोकशाहीचा  …….

दापोडी प्रतिनिधी….

दापोडी येथील फसवणुकीच्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींना बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

बाळासाहेब हरिभाऊ वाघमोडे, भारत रघुनाथ घुले, लक्ष्मण उत्तम थोरात, संगीता व सुनीता भारत घुले यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा रजिस्टर क्र. ६०७/२०२५नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८,३१६,३३८,३३९व ३४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज क्र. ५८८/२०२५अंतर्गत बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र काळे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.

विशेष बाब म्हणजे फिर्यादी धनसिंग रघुनाथ घुले यांनी स्वतः त्यांच्या वकील अॅड. अमोल आटोळे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करून सदर गुन्हा हा गैरसमजुतीतून दाखल झाल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यांनी कोर्टात स्वतः हजर राहून आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले.

या प्रतिज्ञापत्राच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला.
दापोडी परिसरात या प्रकरणामुळे मोठी चर्चा रंगली होती. मात्र, सदर गुन्हा गैरसमजुतीतून घडल्याचे स्पष्ट झाल्याने आता परिसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.