दौंडला नवीन आलेले मुख्यकार्यकारी अधिकारी १४ वे … रत्न?

आवाज लोकशाहीचा
दौंड विशेष प्रतिनिधी :- विजय चव्हाण



दौंड नगर परिषदेसाठी पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती झाल्याचा आनंद दौंडच्या नागरिकांना होणे साहजिकच आहे, मात्र नवीन आलेले हे अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वादाचा विषय झालेले आहेत.

शहराला यापूर्वी तेरा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवा देण्याची कामगिरी पत्करलेली होती. मात्र त्यांना त्यांचा सेवाकाळ पूर्ण करता आलेला नाही हा प्रश्न शोध मोहिमेचा भाग असला तरी चौदावे आलेले अधिकारी हे वादाचा विषय झालेले आहेत हे उघडपणे प्रसार माध्यमांनी सर्वश्रूत केलेले आहेत परिणामी दौंडकरांसाठी हे चौदावे रत्न म्हणावे लागेल, या रत्नाच्या कारभाराचे सामाजिक पैलू पाहण्यासाठी त्यांचा काही काळ कामकाजाचा प्रकार पाहणे काळाची गरज ठरणार आहे.

समाजाच्या हितासाठी काम करणारे अधिकारी आली आहेत की पुन्हा राजकारण्यांना खुश करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा समज गैरसमज लवकरच त्यांच्या कारभारावरून स्पष्ट होणार आहे. शहर वासीयांच्या सामाजिक प्रश्नांचा सध्या मोठा डोंगर निर्माण झालेला आहे. स्वच्छतेच्या कचऱ्याचा प्रश्न उच्च न्यायालयात केलेला आहे.

गटारीचे पाणी रस्त्यावर वाहून जिवंत माणसांच्या वेदना सर्वश्रुत होत असताना प्रेताला सुद्धा त्यातून जावे लागलेले आहे. कचऱ्याचे ढीग गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या कडेला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्यावर जमलेली मोकाट जनावरे नागरिकांसाठी अडचणीचा भाग होत आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असूनही नसल्यासारखे आहे. पूर्णवेळ पाणी गेले अनेक वर्षापासून नागरिकांना मिळालेले नाही, सामाजिक विकासाची होणारी कामे अर्धवट स्वरूपाने पडलेले आहेत बुद्ध विहाराचा प्रश्न अनेक वेळा अहिरणीवर येऊन तो आत्तापर्यंत अर्धवट स्वरूपानेच राहिलेला आहे.

इथल्या मटन मार्केटचा प्रश्न मंत्रालयापर्यंत जाऊन सुद्धा आज त्याच्यावर कुठल्याही स्वरूपाची ठोस कारवाई झाल्याचे चित्र स्पष्ट झालेले नाही मच्छी भाजी मार्केट खर्च करून बांधण्यात आले मात्र त्याचा वापर अद्यापही करण्यात आलेला नाही उघड्यावरील भाजी मंडई त्या परिसरातील दुर्गंधी हा नागरिकांच्या जीवनाचा आता अविभाज्य घटकच बनलेला आहे, अशा या शहरासाठी नगरपरिषदेतून चालणारे कामकाज अधिकाऱ्यांना अडचणीचे ठरलेले होते.

यापूर्वीच्या १३ अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळून सुद्धा त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आलेला नव्हता यामागे नक्की काय आहे हे तमाम दौंडकरांना माहीत असून सुद्धा त्यांना बोलणे अवघड झालेले आहे(या कार्यकाळात महसूल अधिकाऱ्यांना सुद्धा काही काळ काम करावे लागले आहे ).   आता पूर्ण वेळ अधिकाऱ्याला म्हणून या नागरिकांना थोडाफार आनंदाने साहजिकच असताना सुद्धा आलेले अधिकारी हे दीड लाख रुपयांच्या लाचेच्या विषयामध्ये वादग्रस्त झालेले आहेत त्यांच्या या प्रकरणाचा विषय प्रसार माध्यमातून सर्वसूत झालेला आहे आणि आता चौदावे म्हणून अधिकारी दौंडकरांना लाभलेले असून त्यांना चौदावे रत्न म्हणावे की काय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलेला असून आगामी काळामध्ये या रत्नातील असणारे कार्यप्रणालीचे पैलू  नागरिकांच्या कल्याणासाठी किती आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.