आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी….तुंबलेल्या गटारीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांना त्या घाणीच्या पाण्यात बसून आंदोलन करावे लागल्यावर प्रश्न त्याचा दिवशी प्रशासनाने युद्ध पातळीवर सोडवल्याने सर्वच नागरिक अचंबित झाले आहेत .
शहरातील बिकट झालेला दुसरा महत्वाच्या कचऱ्याचा प्रश्न कचरा असून त्यात सुधा बसल्याशिवाय सोडवाचा नाही का?असा प्रश्न आता त्यांना भेडसावू लागलेला आहे
पालिका प्रशासन खरच इतकी बेजबाबदार पणाने कामकाज करीत ?की दौंडच्या जनतेशी कोणी बेईमान झालेले आहे असा वितर्क या निमित्ताने चर्चेचा विषय झाला आहे.
नुकताच स्मशानाकडे जाणाऱ्या आणि मंडई भरणाऱ्या महत्वाच्या भागात गटारी तुंबून तिच्या चेंबरमधून रस्त्यावर गटारगंगेचा प्रवाह सुरू झालेला होता .हा रस्ता स्मशान भूमी दशक्रिया घाट आणि मंडई भरणाऱ्या महत्वाच्या परिसरातील असल्याने वर्दळीचा होता .
शहराचा विस्तार मोठा झाल्याने नागरीवसहात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ,परिणामी कोणत्या ना कोणत्या भागात मृत्यूची अघटीत घटना घडत असते .रोज नसेल कदाचित मात्र आठवड्याला तीन चार प्रेत यात्रा आणि दोन तीन दशक्रिया विधीसाठी नागरिकांना जाणे येणे होते.
मंडई मध्ये भाजीपाल्यासाठी वयवृद्ध, महिला, वर्ग आणि अन्य नागरिकांची वर्दळ नित्याचा विषय असल्याने या सर्वांना या गटारगंगेतूनं मागील काही दिवस वेदनादायक त्रास होत असे.
सर्वसामान्य व्यक्ती प्रशासनाला राजकारण्यांना लाखोली देऊन मुकाट्याने त्रास सहन करीत होते मात्र प्रेतयात्रेतील मृत व्यक्ती त्याच्या भावना कशा व्यक्त करणार , त्याला स्मशानात पोहचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या हितचिंतकांना मात्र याची मोठी ठेच लागत होती दुःखी मनावर या प्रकाराने मीठ चोळल्यासाखा प्रकार त्यांनी मुकाट्याने सोसला होता.
………..मनसेने से चे आंदोलन दिलसे……..
सचिन कुलथे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिलेदाराने या सर्व दुखित पीडित आणि त्रासदायक नागरिकांच्या साठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटारगंगेत बैठक मारली आणि अनोखे आंदोलन छेडले ते काम मनसेने केले दिलसे म्हणाल्यास चुकीचे नाही त्याला.साथ देण्यासाठी अपंग संघटनेच कार्यकर्ते रामेश्वर मंत्री शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष जगताप आणि काही दलित चळवळीतील महिलांनी साथ दिली शहराच्या मलमूत्र आणि उग्रदर्प असलेल्या सांडपाण्याच्या गटारगंगेतून बसून प्रशासनाला.हाक दिल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला काही तासातच जाग आली आणि चमत्कात झाल्यासारखं प्रश्न युद्ध पातळीवर हाथी घेऊन गटारगंगेचा बंदोबस्त केला .
या प्रकरणासाठी सुरवातीला कुलथे यांनी.प्रशासनाचा बराच पाठपुरावा केलेला असताना सुद्धा त्यांना अखेर गटारीच्या पाण्यात बसावे लागल्या नंतर त्याचा दिवशी काही तासात हे काम केले हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा दरिद्रीपणा म्हणावा लागेल
सध्या शहरात कचऱ्याचा प्रश्न अनेक महिन्या पासून वाढत आहे . शहराचा अनेक भाग साचलेल्या कचऱ्याने घाणीचे साम्राज्य निर्माण करीत आहे. प्रशासनाने या कडे लक्ष दिलेले नाही परिणामी नागरी जीवनावर तसेच शहरातील मोकाट जनावरांवर याचा विपरीत परिणाम होतो आहे .
जनावरे या ठिकाणी कळपाने जमत आहेत कचऱ्या मधील घाण असलेले पदार्थ खाऊन त्यांना आरोग्याचा त्रास होताना दिसत आहे शहराच्या अनेक भागात त्यांनी केलेली विष्ठा पातळ होऊन दुचाकी चार चाकी ट्रायल लागून सर्वत्र रस्त्यावरून पसरलेली.दिसते आहे हा त्याचा दाखला आहे याचा परिणाम प्रवाश्यांना होतो आहे कचऱ्याच्या दुर्गंधीचा उग्र वास सुरू झाल्याने शेजारून जाणाऱ्या येणाऱ्या नाक दाबून प्रवास करावा लागतो आहे

प्रश्न प्रशासनाने तत्काळ सोडवला पाहिजे मात्र गेलीं काही महिन्यापासून तो सोडवला गेला नाही अनेकांनी याबाबत प्रशासनाला तक्रारी केलेल्या आहेत ,
याचा कचऱ्याचा ठेका मिळावा आणि आपला आर्थिक लाभ व्हावा या साठी एकाच राजकीय गटातील दोन जनाची चढाओढ लागल्याची चर्चा आहे .यांना नागरिकांच्या प्रश्न पेक्षा आर्थिक लाभासाठी मोठा प्रयत्न सूर केल्याने ठेका काढण्यास प्रशासनाला यांच्या राजकीय दबावाचा सामना करणे अवघड झाले आहे परिणामै ठेका काढण्यासाठी अडचण होत आहे आशि दबक्या आवाजात चर्चा शहरभर पसरलेली आहे
अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत तरी ही झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाकडून सुटेना प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी गटारीच्या आंदोलनाला डोळ्या समोर ठेवून आता कचऱ्याच्या घाणीत नागरिकाना बसावे लागणार आहे का ? असा सूर चर्चेतून सुरू झालेला आहे. इतरवेळी एखाद्या सामाजिक कामाच्या प्रचार प्रसाराचा ढोल वाजवण्यात प्रामाणिक पना दाखवणारे आता सोयीसविधांच्या झालेल्या गोंधळा बाबत आवाज उठवताना दिसत नाहीत ते भूमिगत झाले काय काय असे म्हणण्याची वेळ आली आहे .
शहरात स्वाभिमानी कार्यकर्ते आगामी निवडणुकीत आपल्या नेत्याच्या विजयाचे धनुष्य पेलण्यासाठी हुजरेगिरीच्या कामाला लागल्याची दबंग चर्चा सुरू झालेली आहे
शहरात खरच प्रशासन नागरी सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही का? असा विचार अनेकांना भेडसावत असून या पाठीमागे अजून कोणी अतृप्त शक्ती समाजसेवक म्हणून दिसणारा आणि समाजाला वेठीस धरणार कोणी कारभारी आहे अशी शंका सुद्धा काही जण व्यक्त करू लागले आहेत,




