आवाज लोकशाहीचा ..
केडगाव प्रतिनिधी ……….पावसाच्या पाण्यात रासायनिक द्रव मिसळल्याने पाण्याला फेस आला आहे .फेसळलेले पाणी ओढ्याच्या पात्रातून प्रवास करू लागल्याने पाहणाऱ्यांना हा विषय कुतूहलाचा झाला आहे .
फेस आलेलेला पाण्याचा प्रवाह पाहाण्यासाठी वेगळा असला तरी पाण्याचा उपद्रव जनावरांसह मानवा साठी धोकादायक झालेला.आहे याची पुरेशी माहिती नाही .
या बाबत सविस्तर माहिती अशी ओढ्याच्या पात्रात गावची गटारे सोडलेली आहेत गटारीच्या माध्यमातून शौचालयाच्या पाण्याला सुद्धा त्याच मध्ये सोडण्यात येते. परिणामी गटारीचे पाणी आणि शौचालयातल्या पाण्यामुळे काही घातक वायूंची निर्मिती होण्याची शक्यता असते .
गटारीचे आणि शौचालयाचे मिश्रित असलेले पाणी ओढ्यातून बारमाही वाहून जात नाही . हे पाणी जागोजागी पडलेल्या खड्ड्यात साचून राहते आणि पावसाचा कालखंडात वाहणाऱ्या पाण्यात मिक्स होऊन गटारी शौचालय मिश्रित पाण्याने वाहू लागतो वाहत असताना या पाण्याचा प्रवाह अनेक ठिकाणी आदळ आपटत जात असल्याकारणाने त्याचा फेस निर्माण होतो अशी परिस्थिती असून सध्या हेच चित्र केडगाव वाखारी बोरीपारधी दापोडी या गावातून जाणाऱ्या ओढ्यात निर्माण झालेले आहे.
दापोडी बोरीपारधी गावाला जोडणाऱ्या याच ओढ्यावरील पुलाच्या पूर्व बाजूला फेस झालेल्या पाण्याचा मोठा प्रवाह दिसत आहे .
या फेस युक्त पाण्यात सध्या गुऱ्हाळाचे दूषित पाणी आणि मळी सोडलेली आहे त्याचा सुधा या पाण्यावर मोठा परिणाम होतो आहे .
……..दापोडी गावाला याचा मोठा धोका……..
दापोडी स्मशान भूमी जवळ याच ओढ्याला खोली करून पाणी अडवण्यासाठी छोटा बंधारा बांधण्यात आला आहे .पाणी साठवणूक झाल्याने परिसरातील विहिरी बोअरवेल याला पाणी वाढेल अशी माफक कल्पना या निमित्ताने होती तसेच शेजारीच असलेल्या स्मशान भूमीत लावलेली झाडाना पाणी मिळून त्यांचे संगोपन होईल अशी आशा होती .सध्या मिसळलेल्या पाण्यामध्ये रासायनिक स्वरूपाची प्रक्रिया झाल्याकारणाने हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने घातक असतानाच प्राणीमात्र आणि मानवी जीवन या दोघांनाही भविष्यात धोकादायकच ठरू शकतो.



