आवाज लोकशाहीचा…
केडगाव प्रतिनिधी ….. आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने दौंड तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात नवीन पदाधिकाऱ्यांची नुकत्याच नियुक्त्या करण्यात आलेले आहेत.
रोहित दादा कांबळे यांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी नियुक्त करण्यात आली असून यामध्ये कैलास कांबळे यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी आणि सतीश गायकवाड , मयूर शिशुपाल सागर भालेराव अविनाश गायकवाड या चार जणांना उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी लागणार आहे .प्रसिद्धी प्रमुख म्हणून यशवंत कांबळे,सोशल मिडिया प्रमुख म्हणून अजय गायकवाड , सरचिटणीस गणेश साळवे कार्याध्यक्ष दशरथ मोरे उपाध्यक्ष संतोष मोरे चिटणीस म्हणून नवनाथ शिंदे कोषाध्यक्ष किरण सोनवणे संपर्क प्रमुख म्हणून सचिन पोळ कार्यकारणी सदस्य रामा भोसले दीपक शिंदे,
युवक आघाडी साठी अभिषेक कांबळे , निलेश कांबळे परिमल शिंदे हे उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत सागर कांबळे हे चिटणीस म्हणून काम पाहतील युवक संपर्कप्रमुख तसेच मातंग आघाडी युवक अध्यक्ष म्हणून अभिषेक शेंडगे यांची निवड करण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रम बोरमलथ मंदिर येथे संपन्न झाला आहे .
ग्रामीण भागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मजबूत बांधणी करण्यासाठी रोहित दादा कांबळे यांनी सुरुवात केली असून भविष्य काळामध्ये या नमित्ताने दलित चळवळीला जीवदान मिळून सामाजिक वितंटवादाला आधार मिळू शकतो लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची वेळ घेऊन एक मोठा कार्यक्रम या परिसरात घेण्याचे आश्वासन रोहित दादा यांनी उपस्थिती नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला निवडणुका लढवायच्या असून यामध्ये योग्य त्या योग्यतेनुसार उमेदवार सुद्धा उभे करणार आहोत म्हणून आपल्यापैकी पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने आणि जोमाने समाज बांधवांची एकजूट बांधण्यासाठी तयारी करायला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे ग्रामीण भागातील पश्चिम पट्ट्यातील हा पहिला सोहळा असून पूर्वपट्ट्यात सुद्धा अशाच प्रकारच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून संघटना आणि पक्ष बांधणीचा कार्यक्रम सुरू आहे अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा दौंड शहरात सुद्धा मजबुतीने काम करत असून याचा आगामी काळात प्रभाव निवडणुकीच्या रिझल्ट मध्ये दिसून येईल अशी खात्री सुद्धा त्यांनी दिल्याने नवीन पदाधिकाऱ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाबद्दल आणि आपल्याला मिळालेल्या पदाबद्दल मोठे कौतुक वाटले आहे.




