आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण ….
दौंड मधील पुनर्वसन जमिनींचा घोटाळा करणाऱ्या टोळीची उघड चर्चा नागरिक करीत नसले तरी दबक्या आवाजातील कुजबुज शहरापासून ग्रामीण पर्यंत पोहचलेली आहे .
या जमिनी लाटणाऱ्यांची दहशत मोठ्या प्रमाणात असून त्यांना राजकीय आशीर्वाद तसेच आर्थिक बळ मोठे असल्याकारणाने त्यांच्याशी पंगा घेणे येथील नागरिकांना अवघड आहे मात्र यातला पर्याय म्हणून एकमेकांच्या कानात आणि हळूहळू जात या विषयावर मोठी खलबत्ते सुरू झालेली आहे.
पुनर्वसन जमिनी खोट्या कागदपत्राच्या आधारे मिळवून द्यायच्या त्या विकायच्या त्यातून मोठी माया कमवायची आणि कमवलेल्या मायातून काही बगलबच्चे फुकट खाणारे आणि मोकाट फिरणारे तरुण आपल्या अवतीभवती उभे करायचे संध्याकाळी खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिवसभर त्यांना खबरीलाल म्हणून वापरून घेण्याची पद्धत त्याची असल्याकारणाने नाहक यांच्याशी पंगा नको म्हणून यांच्या अनेक भानगडीं बाबत नागरिक राजरोसपणे बोलत नाही पुनर्वसन जमिनीचा महाघोटाळा खऱ्या अर्थाने राज्याला दाखवायचा असल्यास आणि त्याचे पुरावे शासनाला प्रामाणिकपणाने हवे असल्यास त्यांनी त्या स्वर्गीय मंडल ,तलाठी अधिकारी यांची तालुक्यात राजकीय आशीर्वादाने २५ वर्ष अधिक सेवा झाली या कडे.लक्ष देणे गरजेचे आहे .
त्यांच्या सेवा काळात अनेक जमिनीवरील कागदपत्रे दस्तऐवज उलट सुलट नोंदविण्यात आले सर्वाधिक भानगडी पुनर्वसन जमिनीसाठी केलेल्या आहेत .
यांची कोणाला शंका असल्यास त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या दप्तराचा प्रामाणिक पणाने तपास केलाच पाहिजे अशी शंका व्यक्त करीत आहेत
सासवड येथे नेमणूक असताना त्याने दौंड मध्ये काम केले विशेष म्हणजे दौंड शहराचा भागच सांभाळला होता . शहराच्या आसपासच्या पुनर्वसन जमिनींचा खरा घोटाळा त्यांच्याच हुशारीने झालेला असून त्याचा फायदा कोणी घेतला याची जाहीर माहिती करण्याची गरज नाही ती शहरातील सर्व सुजाण नागरिकांना माहीत आहे .फक्त बोलणे त्यांच्या साठी अवघड आहे अशी टीका टिप्पणी या निमित्ताने ते करीत आहेत
एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात त्याने अनेक जमिनींच्या नोंदी केल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात करणारे त्याच्या साठी या व्यापाऱ्याने बंगल्या लगतच त्याचे व्यक्तिगत कार्यालय उभारलेले होते अशी माहिती एक दुसऱ्याला देत आहेत
पुरंदरला नेमणूक असणारा हा मंडल अधिकारी दौंड मध्ये कामकाज करीत होता ही बाब मोठी गंभीर होती आणि तिला राजकीय आशिर्वादा बरोबर सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा पाठबळ दिलेले होते
शासनाच्या वरिष्ठ कार्यालयाने याच्या नेमणुकीची आणि करण्याची काळजीच घेतली नसल्याने याने आपल्या कामकाजात प्रामाणिक पणाची सेवा आशीर्वाद देणाऱ्यांसाठी खर्ची केलेली आहे असा.आरोप या निमित्ताने करताना दिसत आहेत .
शहराच्या लगतचे पुनर्वसन आणि भोगवटा वर्ग दोनच्या गोरगरिबांच्या जमिनी त्यांच्या पदरात टाकण्या साठी त्याचे मोठे योगदान होते अशी चर्चा करणाऱ्यांनी
परिणामी एकाच दिवशी खरेदीखत आणि त्याच दिवशी नोंद धरून ७/१२ बनवण्याच्या प्रताप करण्याचे धाडस त्याने केलेले आहे अशी माहिती खात्री लायक देत आहेत
यावर कोणाचा विश्वास बसणार विषय नक्की नाहीं मात्र तो बनण्यासाठी त्यांनी केलेल्या कामकाजाचा प्रामाणिक पणाने दप्तर तपासणीचा कार्यक्रम करावा लागणार आहे असे त्यांचे मत आहे .
शहरात जमिनी मिळवण्यासाठी कोण बुवा कोण बाबा असे ना ना रंग असणारी टोळी काम करीत आहे .त्यांनी शहराच्या परिसरात आपले जाळे तयार करून चेले चपाटे कामाला लावलेले आहेत.
यात काही शासनाचे पगारी कारभारी स्टँप विक्रेता नगरपालिकेतील कर्मचारी काही अधिकारी आणि मिसळ पाव आणि बिर्याणीवर काम करणारी खबरीला कामाला लावलेली आहेत .
यांच्या कामकाजाने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झालेले असून त्यांना शहा कसा देणार हा प्रश्न मोठा बिकट आहे .गरिबांच्या जमिनी हेराफेरी करून विकत घ्यायच्या त्यांची फसवणूक करायची त्या विक्री करायच्या त्यातून मोठी माय कमवायची त्यातील काही वापर कडेने फिरणाऱ्या खबरीलाल चेले चपाटे आणि दलाल यांच्यावर खर्च केले की सर्व काही सुजलाम सुफलाम चालते त्यात कोण आडवा आला विरोध केला की त्यांच्यावर खाण्यापिण्यावरी पोसलेले सोडायचे भांडण तंटे करायचे राजकीय वजन वापरून पोलिसात त्यांना अभय द्यायचं असा प्रकार सातत्याने होत असल्याने विरोध करणे अवघड झाले आहे अशी भीती व्यक्त करीत असून विरोध करणे अवघड आहे असा सुरू त्यांच्या चर्चेतून निघतो आहे
या सर्व प्रकारचे मूळ जमीन आणि भ्रष्ट कारभार आहे .हे नाकारून चालणार नाही .
गेली वीस पंचवीस वर्ष पुनर्वसन जमिनींनी त्यांना अभय दिले आहे या सर्व जमिनींची खरेदी विक्री आणि लाभार्थी यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत .
यात कोणाला शक असल्यास त्यांनी दौंड शहरातील त्या स्वर्गीय मंडल अधिकारी ,तलाठी याच्या काळातील दप्तर तपासण्याची हिंमत दाखवली पाहिजे .अशी मागणी त्यांच्या कडून उघड नाही मात्र दबक्या आवाजामध्ये जोरदारपणाने होताना दिसत आहे.
……………महत्वाचे वाचा…………
खाण्यापिण्यावर आपली ताकद वापरणारा तरुणांना या दलाला आणि टोळीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाले असे काही केले पाहिजे तारुण्य आहे तो पर्यंत यांचा त्यांच्या कडून वापर करून घ्यायचा हे बाबा चुकीचे आहे त्यांना स्वतःच्या हितासाठी उद्योग व्यवसाय उभारून दिले पाहिजेत उगाच खाण्या पिण्यावर त्यांचा वापर करू नये अशी प्रामाणिक धारणा सुद्धा दौंडकर करू लागले आहेत



