आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…..
पुनर्वसन घोटाळ्यात दौंडच्या ग्रामीण भागातून मोठा बोगस कारभार झालेला असला तरी दौंड शहर आणि परिसर मागे नाही .याची सत्यता पडताळण्याची कोणाला हौस असल्यास त्यांनी स्वर्गीय तलाठी मंडल अधिकारी खोमणे यांच्या काळापासून काल पर्यंतचे दप्तर प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून तपासले पाहिजे .यातून मोठा बोगस कारभाराचा भूकंप होऊन अनेकांच्या बुडाला हादरे बसून त्यांचा हुशारी पना उलथल्या शिवाय राहणार नाही .
खोमणे यांनी तालुक्यात जवळपास वीस वर्ष अधिक सेवा केली होती तलाठी आणि मंडल अधिकारी पदावर काहीं काळ बाहेरील तालुक्यातील सोडल्यास त्यांनी दौंड मध्ये ताम्रपट घेऊन आल्यासारखी सेवा केलेली आहे.
एकाच दिवसात खरेदी आणि७/१२ तयार करण्याचा विश्व विक्रम सुद्धा त्यांच्याच नावावर आहे अशा पद्धतीचा बोलबाला आहे .
हा प्रकार कोण एका मंत्री बांधकाम व्यावसायिकांच्या बाबत घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे .मंत्री कोण हे मात्र उघड होत नाही .ते शहरातले की बाहेरचे आणि नाव आहे की आडनाव याचा बोध होत नाही .याची कारण मिमांसा काय ? याचा बारकाईने तपास केल्यास या पाठीमागे राजकीय शक्ती असल्याने कोणी नाव घेण्याची हिंमत करीत नाही अशी माहिती मिळत आहे तसेच शक्ती कोण याचा मात्र उलगडा होणे अवघड आहे.
तालुक्याच्या ठिकाणी या जमिनींची मोठी हेराफेरी झालेली आहे .काहीं भामट्यांनी कमिशन या नावाखाली गाडी बंगला आणि शौक पूर्ण करीत हजा मजा करीत दिवस काढले आहेत .यासर्व कारभाराला पुनर्वसन जमिनीचा बोगस कारभार कारणीभूत आहे.
सध्या महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरात मोठा गोलमाल.सुरू आहे सेवानिवृत एका संघटनेचा पदाधिकारी या जमिनीवरती डोळा ठेवून बसला आहे दिमतीला त्याला काही स्वतःला समाजसेवक समजणारे राजकीय मान्यवर सुद्धा आहेत .
एकंदरीत जमिनीचा मामला आणि हळूहळू बोंबला अशी अवस्था या भूखंडाबाबत झालेली आहे .
नगरपालिकेतील एका सेवनिवृत अधिकाऱ्याने यांच्याचं कारभाराचा पुरेपूर फायदा घेतला आहे सेवेत असताना बांधकाम परवानगी नावाखाली मलिदा खाऊन बसला आहे .शहरात त्यांनी काही हितचिंतकांच्या नावाने भूखंड , बांधकाम आशा स्वरूपाची मिळकत कमवून काही विक्री काही भाड्याने देऊन पैसे कमवले आहेत .
दौंडचा नावलौकिक रेल्वे रेल्वे जंक्शन आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या नावाने राज्यभर आणि देशभर परिचय देणार असली तरी जमीन घोटाळेबाबत सुद्धा प्रामाणिकपणाने चौकशी केल्यास ते देशभरात गाजल्याशिवाय राहणार नाही अशी सध्या परिस्थिती आहे,
ग्रामीण भागाच्या पुढे एक पाऊल जमीन घोटाळे शहराच्या लिंगाळी गोपाळवाडी सोनवडी या भागातून झालेल्या असून हे सर्व घोटाळे मोजक्याच लोकांच्या हातून दलालांच्या मार्फत आणि टोळी अन्वये केले गेलेले आहेत ही सर्व कोणाला चौकशी करायची असल्यास त्यांनी स्वर्गीय तलाठी तथा मंडळ अधिकारी खोमणे यांच्या कार्यकाळातील दप्तर प्रामाणिकपणाने तपासल्यास मोठा भूकंप होऊन या जमिनीच्या घोटाळा बुडाखाली हादरा बसून त्यांचा भ्रष्ट कारभाराचा दोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे.
………….. ……..हे वाचा………………..
काही बुवा आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुनर्वसन जमिनी घेतल्या आहेत .त्यांचे नाव शहरातील मध्यवर्ती हॉटेल परिसरात जोरदार पने घेतले जात असून ही व्यक्ती नक्की कोण यावर उघडपणे बोलत नाहीत या प्रकाराने बुवा म्हणजे साधू की व्यक्ती याचा उलगडा होत नाही हे जरी खरे असले तरी त्या संदर्भातील कागदपत्रांची माहिती लवकरच आवाज लोकशाहीचा माध्यमातून उघड होईल .



