दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण
दौंड तालुक्यात पुनर्वसन झालेल्या नागरिकांची एकूण संख्या किती आहे.आजुन किती जन पुनर्वसन होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.याचा मेळ नसल्याने जमिनी खिरापती सारख्या वाटल्या गेल्या आहेत.जिल्हा पुनर्वसन विभागाची ही जबाबदारी असून सध्या ही कार्यालय तोंडाला चिकट पट्टी लावून गप्प बसले आहे चिरीमिरी पाई मागेल त्याला जमीन देण्याचा यांनी घाट घातल्याने एकाचा कुटुंबाने अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत.
पुनर्वसन जमीन मिळवायची आणि विकून टाकायची हा प्रकारच या कार्यालयाचे मेहर बानीने झाला असून अनेक दलाल आणि त्यांच्या टोळ्या सक्रीय झालेल्या आहेत.इंदापूर, दौंड,शिरूर हवेली या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या असून एकाचा परिवाराने तीन तालुक्यातून काहींनी दोन तालुक्यात आणि कित्येकांनी एका तालुक्यातील अनेक गावातून जमिनी बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या आहेत.
जवळपास दौंड तालुक्यात बोगस लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणांत असून अन्य तालुक्यातून सुद्धा अशा भामट्यांनी केलेल्या बोगस कारभाराची शक्यता नाकारता येणार नाही.
पुनर्वसन विभाग हा अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणाने आणि आर्थिक लाभ मिळवणाऱ्या वृत्तीने दलाल आणि भामट्यांसाठी लाभाचे कुरण बनल्याने बोगस व्यवहारासाठी सोयीस्कर झाले आहे.
गेली तीस वर्ष अधिक या विभागातून जमिनी वाटपाचा कार्यक्रम अखंडीत पने सुरू असून अद्याप वाटप संपलेले नाही .आणि लाभार्थीही संपत नाही अशी वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे.अशा सर्व विषयांचा विचार केल्यास किती धरण क्षेत्रात गावे गेली त्यात किती कुटुंबे बाधित झाली कोणाची किती जमीन आणि राहत्या घराचे भूखंड गेले आहेत.त्या पैकी किती जणांना लाभ मिळाला याची माहिती जाहिर होणे काळाची गरज आहे.अन्यथा बोगस लाभार्थी बोगस वाटप आणि सरकारची लूट सुरू राहणारच आहे यात शंका नाही.
दौंड तालुका आणि हवेली मध्ये बोगस लाभार्थी आहेतच ते इंदापूर शिरूर मध्ये सुद्धा असू शकतात या साठी पुनर्वसन गावांची माहिती शासनाने संकेत स्थळावर जाहीर केली पाहिजे माहिती मागेल त्याला दिली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.अशा स्वरूपाचा ठोस कार्यक्रम राबवल्यास काही भामटे जेलचा प्रवास केल्या शिवाय राहणार नाहीत.
*विशेष महत्वाचे वाचा*
दौंड शहरात सर्वाधिक बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनी लाटण्यासाठी कामकाज झालेले आहेत.आणि त्यासाठी तालुक्यातील राजकारणी त्यांचा अका तसेच शासनाचे अधिकारी स्टँप विक्रेता नगरपालिकेचा इंजिनियर (सध्या सेवा निवृत्त आहे ) यांची टोळी कामकाज करीत होती आणि करीत आहे अशी बोंबाबोंब तालुक्यातील सर्वदूर नागरिकांच्या कानावर गेलेली आहे.



