पुनर्वसन जमीन घोटाळ्यासाठी शासनाचे शिक्कें बाळगणारे दौंड तालुक्यात?

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :-विजय चव्हाण

दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीसाठी बोगस कागदपत्र बनवणारी टोळी दौंड शहरात आणि काही ग्रामीण भागात कार्यरत आहे त्यांच्या कडे अधिकाऱ्यांचे शिक्के आणि आवक जावक शिक्यांचा साठा असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

पुनर्वसन जमीन घोटाळ्यासाठी त्यांनी याचा नुसता वापर केला नसून त्यांनी नोकर भरती साठी पुनर्वसन दाखले देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल असून त्यांच्या दाखल्यावर अनेक जन नोकरीत कामे करीत आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पुनर्वसन जमिनीचा मलिदा खाण्यासाठी बोगस कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेल्या आहे.याची पडताळणी तत्कालीन पुरंदर आणि दौंड प्रांत यांच्या चौकशी समिती कडून करण्यात आलेली आहे.

२०१३ते २०१६ पर्यंत ही मोहीम राबवण्यात आलेली होती.दरम्यान अनेक बोगस लाभार्थींची यादी त्यांनी केलेली आहे त्याचा अहवाल सुद्धा तयार केलेला आहे.माहिती अधिकरात त्यांची माहीत अनेकांनी मिळवल्याने जवळपास ७०० एकर अधिक जमिनी वरती सरकार म्हणून फेर नोंद  लावण्यात आलेली आहे.

सरकार जमा असणाऱ्या जमिनी सद्या शासनाकडे आहेत की नाहीत हा प्रश्न संशोधनाचा भाग असला तरी पुनर्वसन जमिनीच्या संदर्भामध्ये राज्यातील सर्वाधिक जमीन घोटाळा दौंड तालुक्यामध्ये सिंहगड होईल अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ परिस्थिती या सर्व जमिनीचा कारभार आणि प्रामाणिक पणाने चौकशी केल्यावर ती उघड झाल्याशिवाय राहणार नाही.

जमिनी लाटण्यासाठी ज्यांच्याकडे बोगसिके कागदपत्रे आहेत त्यांची तत्काळ चौकशी होणे काळाची गरज आहे आणि ती प्रामाणिक पणाने झाल्यास दौंड तालुक्यातून डझनभर अधिक दलाल एजंट आणि भामटे तुरुंगाची हवा खाण्यास जातील यात शंका नाही फक्त चौकशीसाठी प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज आहे.हाच खरा प्रश्न यक्ष असल्याकारणाने शासनाच्या जमिनीचा घोटाळा झालेला आहे तो निघणार कसा आणि बाहेर येणार कसा हा कळीचा मुद्दा आहे.

दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन जमिनीच्या घोटाळ्यांनी मोठे खळबळ झालेली असून याचा विपरीत परिणाम तालुक्याची बदनामी साठी होतेय ही बाब शरमेने मान खाली घालण्यासारखी आहे