दौंडच्या राजकारणाबरोबर समाजाच्या व्यथा वाढतात काय, आणि यासाठी आपणच जबाबदार असू का?

शेती सिंचनाच्या पाण्याचा रंग हिरवा झाला

आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी …..अनेक वर्ष बारामतीच्या विचारावर चालणारे राजकारण गेली काही वर्षांपासून नागपूरच्या विचाराने सुरू झाले आहे .

राजकारण बदले तसे समाजकारण सुद्धा बदलले का? हा प्रश्न दिवसेंदिवस चिंतेचा बनतो आहे ,विकासाच्या आकडेवारीने तालुका बांधकाम ,रस्ते,या मध्ये दिवसेंदिवस चमकू लागला असला तरी तालुक्यातील स्वच्छ पाण्याचा प्रवाह बदलतो आहे .खडकवासला कालव्यातून सिंचनाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही गावांसाठीं बंद होवून पुण्याच्या गटारीच्या पाण्याचा प्रवाह शेतीपर्यंत पोहचला आहे स्वच्छ पाणी आता हिरवेगार झाले आहे .
तालुक्याच्या राजकीय रंग बदलत गेला आहे तसाच रंग पाण्याने सुद्धा बदलला असल्याने हिरव्या पाण्याची शेती हिरवीगार नक्की दिसेल मात्र त्यातून होणारे परिणाम सुद्धा  भोगावा लागेल का? अशी चिंता वाटू लागली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की
तालुक्यात बारामती करांच्या आशीर्वादाने तालुक्यात अनेक वर्ष राजकारण करण्यात आले मात्र बारामती सारखा विकास दौंडचा  झाला नाही, एक गोष्ट मात्र झाली रासायनिक औद्योगीकरण तालुक्याच्या काही गावांसाठी धोक्याचे बनून गेले आहे .परिणामी ज्या भागात या औद्योगिकरणातील कारखान्यांचा धूर आणि वास जातो त्यांना श्वसनाचे आणि आरोग्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे हा त्रास लगेच जाणवला नाही मात्र गेली जवळपास तीस वर्षे पूर्वी सुरू झालेल्या औद्योगिकी .नगरीचा सध्या त्रास जाणू लागलेला आहे.

परिणामी बारामतीच्या विचाराच्या राजकारणात सुधार होण्यापेक्षा सामाजिक हानी जास्त झालेली आहे .
सध्या नागपूर विचाराचे राजकारण सुरू आहे तालुक्यात विकास कामांचा महापूर आल्याच्या बाबतचा प्रचार प्रसार झालेला आहे सध्या तालुक्यात विकास काय असतो हे सांगणे अवघड झाले आहे त्याची परिमासा तालुक्यातील विकास कामांचा खर्च आणि विकास कामांचा जाहिरात पाहून दिसून आलेले आहे .मात्र शेती सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याबाबत तालुका कोसो दूर मागे राहिला आहे .पाण्यावर खर्च हजारो कोटी वर झाला असून प्रत्यक्षात मात्र पाणी कोणत्याच नळाला आलेले नाही ही मात्र दुर्दैवाची बाजू आहे जल जीवन असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असे योजनेतील पैशांचा खर्च ठेकेदारांच्या भल्यासाठी के अधिकाऱ्यांच्या कमाईसाठी झालेला आहे हा प्रश्न खर्चाकडे आणि  झालेल्या कामांकडे पाहून निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक गावात कुटुंबाला रोज जवळपास कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त १००रुपयांचा खर्च करावा लागतो आहे .रोज तालुक्यात लाखो रुपयांचे पाणी पिण्यासाठी विकत घ्यावे लागत आहे

शेती सिंचन मात्र पुण्याच्या नागरिकांच्या सांडपाण्यावर आणि गटारगंगेवरती येऊन ठेपला आहे राजकारणाचा जसा रंग बदलत गेला तसाच सिंचनाच्या पाण्याचा रंग बदलून तो सध्या हिरवा गार झालेला आहे आणि या हिरव्यागार पाण्याच्या माध्यमातून शेतीची पिक जरी बहारदार येणार असली तरी भविष्यात या पाण्यातील रासायनिक वायु तसेच पुणे शहराचे गटारीद्वारे येणारे मलमूत्र हे भविष्यकाळात आरोग्याला घातक ठरण्याची दाट शक्यता आहे त्याचे विपरीत परिणाम सध्या लगेच लक्षात येणार नसले तरी भविष्य काळात ही समस्या याच पाण्याची आहे हे नाकारून चालणार नाही
या विषयाचा सखोल अभ्यास केला तालुक्याच्या राजकारणात बारामती असो अथवा नागपूर विचार असो या दोन्ही विचारातून तालुक्यामध्ये प्रगती होते की अधोगती होते हाच खरा प्रश्न नागरिकांना स्वतःहून सोडवावा लागणार आहे

रासायनिक कारखानदारीचा विषारी वायू जनजीवनाला बाधक

………………….हे वाचा ……………

राजकीय विचारांनी दिशा बदललेली असताना येथील मूलभूत हक्कातील मानवी मूल्य अडचणीत येत आहे नेता निष्ठेपाई दुखत असतानाही सहन करण्याची सवय अंगी लावून घेतली जात असल्याने आजच्या व्यक्तींना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याबाबत विचार करावा लागेल आणि तो करावाच लागेल अन्यथा भविष्य त्यांच्या साठी केवळ आपल्या सहनशक्ती मुळे अडचणीत आलेले असणार यात शंका नाही

राजकारण म्हणून सर्वच घडामोडी पाहण्या पेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा काहीं गोष्टींचा विचार झाला पाहिजे .