उच्च न्यायालयाच्या कारभाराने पुनर्वसन घोटाळेबाजांवर येणार संकट मुहूर्त बाकी!

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- विजय चव्हाण

उच्च न्यायालयानेच पुनर्वसन जमिनी घोटाळ्याबाबत चिंता व्यक्त करून बोगस लाभार्थी शोध मोहीमेसाठी समिती नेमण्याचा सल्ला दिला असल्याने दलाल आणि त्यांच्या आकाने तालुक्यात लूट केलेल्या जमिनी बाबत सत्य समोर आल्या शिवाय राहणारा नाही. सध्या मुहूर्त बाकी आहे.

दौंड तालुक्यात दलाल आणि त्यांच्या टोळीने मोठा धुडगूस घातला आहे.काहींनी तालुक्यात घेऊन सुद्धा हवेली तालुक्यातील उरुळी गावात जमिनी घेतल्या त्या राजकीय आशीर्वाद असलेल्या भाईंना विकल्या त्यांनी गुंठे विक्री केली अशा अनेक भानगडी या जमिनी बाबत झालेल्या आहेत.तीच अवस्था दौंड तालुक्यात आहे.

अजूनही पुनर्वसन जमिनी घोटाळा थांबत नाही.या प्रकरणी शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी आणि राजकीय अका ची मदत असल्याने अनेक गरीब लाभार्थ्यांना त्रास दिला आहे.उरुळी कांचन मध्ये ज्या लाभार्थीने जमीन मिळवली त्यांची धरण क्षेत्रात जमीन किती गेली आणि त्याने किती मिळवली याचा प्रामाणिक पणे तपास केल्यास सहजपूर,नांदूर,कानगाव, या ठिकाणी सुद्धा त्याने जमिनी मिळवल्याचे रेकॉर्ड उघड होईल.

एक हेक्टर २ आर जमीन बाधित झालेल्या हा व्यक्ती स्वतःच्या बायकोच्या मुलांच्या बहिणीच्या आणि सुनांचा नावाने जामीन मिळवल्याचा प्रकार उघड होतो आहे.याला सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केल्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे.पुनर्वसन विभाग शासनाच्या जमिनी बोगस लाभार्थींना देऊन बसला आहे या साठी त्यांनी दलाल मध्यस्थी केलेले आहेत.

दौंड शहरात स्टॅम्प विक्रेता त्यात मोडतो ते सरळ हात घालत नाही मात्र पुण्याहून येणाऱ्या एका दलालाचा हस्तक बनून मोठा घोटाळ केला आहे.त्याने अनेक ठिकाणी जमिनी घेऊन गुंठा विक्री केली असून काही ठिकाणी करीत आहे.

दौंड शहरातील राजकारणी त्याच्या मदतीला आहे.त्यांनी आपल्या पदाची ताकद जमिनीतून पैसे कमावण्यासाठी खर्ची केलेली आहे.काही भामटे पत्रकार यात घुसून ठेकदारा बनले आहेत जमिनी मिळवण्यासाठी नेते मंडळींची हुजरेगिरी करीत पत्रकारितेला राजकीय व्यक्तीच्या दावणीला बांधून कामकाज करीत आहेत.

पत्रकार कमी आणि कार्यकर्ते जास्त अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे.अर्थात सर्वच यात मोडतात असे नसले तरी काही सीमा ओलांडून कामकाज सुरू केले आहे सरकारी अधिकाऱ्यांना पत्रकार कमी आणि कार्यकर्ते म्हणून ढोस देत असतात काही अधिकारी यांच्या इशाऱ्यावर नाचताना दिसत आहेत.हा सर्व प्रकार पुनर्वसन जमिनी विक्री खरेदी विक्री कारभाराने वाढलेला असल्याने या सर्वांच्या मागे पुनर्वसन घोटाळा म्हणता येईल यालाच न्यायालयाने गंभीर पने घेतलेले आहे.

पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी याच विषयावर पुनर्वसन विभागासह दौंड शिरूर इंदापूर तहसील विभागाला सूचना करून अशा जमिनीची माहिती मागवलेली आहे.हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच दलाल आणि त्यांच्या टीम सह आशीर्वाद देणाऱ्या अका हतबल झाल्या शिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

………………..     हे वाचा ……………….

तालुक्यातील पुनर्वसन घोटाळा राजकीय आश्रयाने दाबण्यात येईल असा समज दलाल भामटे आणि टोळीचा असल्याने काही  होणार नाही अशी चर्चा आपापसात करून दिलास देण्याचे काम करू लागले होते.

न्यायालयाने दलालांच्या बाबत चिंता व्यक्त केल्याने त्यांच्या चर्चेचे रूपांतर कारवाई होणार म्हणून आपापसात तर्क वितर्क मध्ये  बदललेले आहे