तुमचे आणि महापुरुष यांचे नाते काय? बहुजनांचे  देव कोणते …जेष्ठ विधीतज्ञ ,,संभाजी बोरुडे

आवाज लोकशाहीचा ..यवत प्रतिनिधी ….

तुमचे आणि महापुरुषांच नाते काय आहे .तुमचा देव कोणाला म्हणायचे या साठी इतिहास आणि त्यातील महापुरुष संत महामाता यांचा अभ्यास केला पाहिजे अशा स्वरूपाचे परखड मत फुले शाहू आंबेडकर विचारवंत ज्येष्ठविधीतज्ञ संभाजीराव बोरुडे यांनी मांडले.

दौंड तालुक्यातील सहजपूर येथील माकरवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिबा फुले सावित्रीमाई फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी ते बोलत होते.

हा सोहळा फक्त  मोलमजुरी करणाऱ्या  महिलांच्या वतीने केला जातो हा राज्यातील वेगळा आदर्श म्हणावा लागेल  यंदा त्यांचे तिसरे वर्ष होते त्यांच्या या कार्यक्रमाचे विशेष अभिनंदन करून बोरुडे पुढे म्हणाले .

सध्या माणूस अंधश्रदेत गुरफटून चाललेला आहे .देव

धर्मांच्या विषयात खोलवर गेलेला आहे .ज्यांच्या अनेक पिढ्यात देव कोणी पहिलाच नाही त्यांना देव जवळचा वाटू लागला आहे कोणी पहिलाच नसलेल्या देव दगड चित्रातून तारणहार म्हणून पाहणाऱ्या समाजाला महापुरुष आणि त्यांचे आपल्या जीवनाशी असणारे नाते काय याचा विसर पडला आहे . त्याची जाणीव करून देण्यासाठीं हे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे यातून जागृती होते .

सांगून ते म्हणाले  समाजाच्या अंधाराला दूर करण्यासाठी कोणत्या देवाने पुढाकार घेतलेला नाही.म्हणून तुमच्या आमच्या बहुजनांच्या पिढ्या जातीच्या धर्माच्या नावाखाली पिळून काढल्या ,त्यांची अवस्था जनावरापेक्षा भयानक होती जनावराला पाणी मिळत असायचा त्या वेळी माणसाला देत न्हवते त्या पाखंडांचा माजोरी पना मोडीत काढण्याचे काम महापुरुषांनी केले आहे .ते देवाना करता आलेले नाही .असे सांगून त्यांनी तुमचं आणि  त्यांचा नात या मुळे वेगळं आहे .

ज्यांनी महीलांना दुय्यम स्थान दिलं देवळात जाण्याची परवानगी नाकारली त्यांना देवाने अडविले नाही तुमच्या साठी देव त्यांच्यावर रागावले नाहीत .मात्र तुमचा अन्याय दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक योगदान आहे .त्यांची माहितीच नसल्याने  मोठा घोटाळला झालेला आहे .आणि म्हणून महापुरुष समजून घेण्यासाठी मंदिरात सप्ताह जसे घेतले जातात तशीच पद्धत महामानवांच्या विचारांच्या जागर करण्यासाठी वापरावी लागेल .तेव्हाच तुमचे आणि यांचे नाते काय याचीं खरी माहिती उघड होईल आणि खात्री होईल

डॉक्टर बाबासाहेब ,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले मा जिजाऊ छत्रपती शिवाजी राजे धर्मवीर संभाजी राजे शाहू महाराज सयाजीराव गायकवाड संत गाडगेबाबा अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर यांच्यासह मानवांनी संतांनी तुमच्या आणि माझ्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले काम केलं त्याग केला. त्यांचे स्मरण झाले पाहिजे उद्याच्या भावी पिढीला याचे आकलन झाले पाहिजे त्यासाठी जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे असे.परखड मत व्यक्त करून शेवटी म्हणाले तुमच्या जीवन प्रवासात समता. बंधुता याची नाळ जोडणारी तुम्हाला न्यायाक्क आणि अधिकार देणारी आखिल मानवतेच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेली राज्यघटना समजून घ्या असे सांगून म्हणाले या सर्व बाबींची काटेकोरपणे काळजी घेतल्यास तुमचे आणि महापुरुषांच नात काय, तुमची दैवत कोण ? याची खरी माहिती मिळेल,