दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:विजय चव्हाण
पुणे शहरातील मूलमुत्रावर दौंडच्या शेतीची तहान भागणार का? असा प्रश्न बेबी कॅनॉल मधील पाण्याकडे पाहून निर्माण झालेला आहे.या कॅनॉलमध्ये पुणे शहरातील नदीपात्रात जमा होणारा मल-मूत्र आणि गटारीचे पाणी मुंढवा जॅकवेल मधून शुद्धीकरण करून सोडण्याऐवजी तेतसेच सोडले जात असल्याने परिणामी या पाण्यात प्रचंड घाण तसेच विषारी वायू आणि उग्रवास आहे नदी पात्रता पुणे शहरातील गटारी सोडलेली आहे नदीची त्या मुळे गटार गंगा झालेली आहे.याचा परिणाम दौंड तालुक्यातील जनतेला भोगावा लागत असल्याने या बाबत ते बोलत आहे.
सध्या तालुक्यात बेबी कॅनॉलचे पाणी शेतीसाठी आलेले आहे.पाणी नाही त्याचा रंग पाहिल्यास काळा आणि हिरवा असा आहे.सध्या कॅनॉलचे अस्थीकरण झालेला आहे पूर्वी हाच कॅनॉल असतीकरण नसल्याने या मधून हडपसर ते दौंड तालुक्यापर्यंत येणारे हे पाणी जमिनीत मुरत मुरत दौंड तालुक्यापर्यंत येताना त्यातील असलेली घाण आणि उग्र वासाची त्रिव्रता कमी होत असायची परिणामी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना त्याचा विशेष करून आज होतो एवढा त्रास होत नसायचा.
सध्या अस्तरीकरण झाल्याकारणाने सरळ तो महिला दौंड तालुक्याच्या क्षेत्रापर्यंत येतो. शेतकरी शेताला पाणी देताना त्या पाण्यात त्यांना उभे राहावे लागते परिणामी त्या घाणीच्या पाण्यात थांबल्याने त्वचा रोगाची लक्षणे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आधीच घाण पाण्यात उभे असणाऱ्या या व्यक्तीला त्यातून निघणार उग्र दर्प सहन करावा लागत आहे.
शुद्ध हवा ऐवजी त्याला उग्र दर्प वारंवार घेतल्याने श्वसनाचे आणि आरोग्याची लक्षणे होणे साहजिकच आहे.तालुक्यामध्ये सध्या हे पाणी बोरीभडक ते बोरीपारधी पर्यंत पोहोचलेला आहे.या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडल्याने हे पाणी शेतीतील पिकाला जीवदान देण्यासाठी महत्त्वाचं वाटत असले तरी त्याचे विपरीत परिणाम सुद्धा भविष्य काळामध्ये भोगावे लागतील याची त्यांना काळजी वाटत आहे.
एकंदरीत पाहता एकेकाळी दौंड तालुक्यातील शेतीमध्ये पिकणारे अन्नधान्य आणि जनावरांना दिलेल्या हिरव्या चारातून निघालेले दूध पुणे शहराला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात होते त्यासाठी खडकवासला कॅनॉलच्या पाण्यावरती शेती हिरवीगार होत असे सध्या याच शेतीला हडपसर जॅकवेल मधील नदीपात्रातला महिला उचलून दौंड कडे पाठवण्याचे पाप होत असल्याने या दूषित पाण्याने निर्माण होणाऱ्या शेतीतील भाजीपाला पुणेकरांनाच विक्रीसाठी जाऊन यातून रोगराई सुद्धा झाल्याचे समजणार नाही या सर्व बाबींचा विचार करता दौंडकरांची शेती पुण्याच्या मूलमूत्रावरच यापुढे होणार का असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे.
दौंडतालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्वसन झालेला आहे.हे पुनर्वसित नागरिक पुण्याच्या पश्चिम पट्ट्यात नव्याने बांधण्यात आलेल्या धरण क्षेत्रासाठी जमिनी गेलेली लोक आहेत.या सर्वांना जमिनी दौंड तालुक्यातील आहेत आणि त्यांच्या जमिनीतील धरणात साचलेलं पाणी हे पुणे करांच्या पिण्याची तहान भागवण्यासाठी वापरण्यात येते. त्यांच्या अंघोळीची आणि पिण्याचे पाण्याची सोय झालेल्या या पाण्यातील दूषितपणा मात्र गटार गंगेच्या माध्यमातून तो दौंडकरांना दिला जातोय ही मोठी कमालीची गोष्ट म्हणावी लागेल धरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्या बांधवांच्या शेती सुद्धा दौंड तालुक्यामध्ये काही प्रमाणात आहेत.त्यांना सुद्धा पुण्याच्या मलमूत्राचे पाणी शेतीसाठी वापरण्याची वेळ आलेली आहे हे त्यांचे दुर्भाग्य म्हणावं लागेल.
शेती सिंचनाचा प्रश्न पुण्याच्या मूलमूत्रावर येऊन ठेपेल हे स्वप्न सुद्धा कधी दौंडकरांना पडलेलं नव्हतं मात्र काही अभ्यास व्यक्तींच्या कारभारामुळे या तालुक्यातील शेती सिंचनाची व्यवस्था पुण्याच्या मूलमूत्रावरती काही प्रमाणात का ?होईना अवलंबून राहिलेले आहे हे आता उघड झालेले आहे.
शासनाच्या नव्या नव्या योजना आणि नवीन संकल्पना पाणी धोरणा विषयी राबवताना दिसत आहेत.नद्या जोड प्रकल्प त्यातील एक प्रमुख प्रकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून पुढे आलेला होता त्याचा कुठेतरी आता विधिमंडळामध्ये विचार विनिमय होत असतानाच नद्यांमध्ये सोडण्यात येणारी ह्या शहरातील गटार गंगा यांचं काहीतरी आगोदर कराव लागणार आहे.अन्यथा नदीपात्रात सोडण्यात येणारे मलमूत्र नदी जोड प्रकल्पातून मलमूत्र जोड प्रकल्पाकडे जाईल की काय अशी चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही.



