पाटस आवाज लोकशाहीचा …
पाटस मधील श्री सिमेंट कंपनीच्या विरोधात गावातील ट्रक वाहतूक व्यवसायिक आक्रमक झाले असून कंपनी तालुक्यातील बाहेरच्या ट्रॅक वाहतूक व्यवसायाला मदत करीत असल्याचा आरोप ते करीत आहेत .
गेली दोन दिवस कंपनी या प्रकाराने कंपनीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय ठप्प झालेला आहे .
अधिक माहिती अशी की पाटस गावच्या हद्दीत सिमेंट उत्पादन करणारी कंपनी सध्या स्थानिक ट्रकवाहतूक व्यावसायिकांना त्रास देते आहे असा आरोप केला जातो आहे .
कंपनी कडे जवळपास या व्यवसायासाठी तीस ते बत्तीस ट्रान्सपोर्ट माल वाहतुकीचे काम करीत आहेत . या मध्ये जवळपास दोनशे तीनशे अधिक अवजड वाहतूक करणारे ट्रॅक आहेत .पैकी परिसरातील व्यावसायिकांचे फक्त ७० ट्रॅक आहेत.
कंपनी सुरू होतं असताना स्थानिक व्यवसायांना एक हजार टन मालाची फिक्स वाहतूक देण्याचे लेखी आश्वासन दिले होते अशी माहिती सध्या ज्यांची फसवणूक कंपनी करीत आहे.त्यांनी दिली आहे .
रोज कंपनी साधारण ५०००टन वजनाचे सिमेंट ट्रान्सपोर्ट करते त्या साठी कंपनीला वाहतूक करणारे ट्रॅक लागतात आणि जास्तीत जास्तअधिक ट्रॅक पाहिजे असतात मात्र स्थानिक ट्रॅक मालक यांना यातून अत्यंत कमी व्यवसाय दिला जातो आणि बाहेरील ठेकदराला मोठ्या प्रमाणात देत आहे असा आरोप स्थानिक राजरोस पने करीत असल्याने गेली दोन दिवस वाहतूक हा विषय बंद झाला आहे .

कंपनी कडे किलोमिटर प्रमाणे भाडे दिले जाते यातही कंपनीने काही अट ठेवली आहे त्यांच्याकडून काही किलोमिटर साठी भाड्याचा आकडा जाहीर केला जातो याची माहिती सगळ्या ट्रान्सपोर्ट एजन्सींना कळविण्यात येते या सर्वांनी याच्यावर किती कमी घेणार हा आकडा कंपनीला द्यावा लागतो आणि मूळ कंपनीच्या भाड्यातून या वाहतूकदारांकडून काही रक्कम कमी करून ते भाडे ठरवले जाते असा फंडा कंपनीचा परिणामी कंपनीचा हा निर्णय जाचक आहे .
.. …….वशिला वाल्याचा रुबाब………
कंपनीने सुरू करताना स्थानिकांना व्यवसाय दिला जाईल त्याचा ठोस आकडा सांगितला होता त्या स्वरूपाने लेखी दिलेले होते अशी माहिती सध्या तक्रारदार असणारे देत आहेत .असे असताना कंपनीने कोणत्यातरी आका च्या पिल्लाला जास्त महत्व देत आहेत सदर पिल्ला या तालुक्यातील नाही मात्र आकाची चमचेगिरी करुन आणि अकाला काही खिरापत देऊन आपला मतलब साधून घेत आहे .सध्या त्याचीच जास्त चालती असून स्थानिक मात्र आंदोलनावर आलेले आहेत .
L………….कंपनी माहिती दिली जात नाही……….
कंपनीचे गेट मोठे महाकाय असून गेटवरील काम करणारे परप्रांतीय आहेत. त्यांच्या कडून कोणतीच माहिती मिळत नाही आणि माहिती देणारा कंपनीचा दुसरा व्यक्ती समोर येत नाही परिणामी साब हम सिक्युरिटी वाले हमको कुछ मालूम नहीं!अशी माहिती ते सांगून वेळ मारून नेत असल्याने आतमधील कोणतीच माहिती स्थानिकांना पत्रकारांना मिळणार नाही याची पुरेपूर काळजी कंपनीने घेतलेली असल्याने नक्की काय प्रकार आहे हे समजणे अवघड आहे .
….परिसराला कंपनीच्या प्रदूषणाचा मोठा त्रास….
कंपनी सुरू करताना परिसरातील नागरिक शेतकरी त्यांच्या पिकाला कोणताच त्रास होणार नाही अशी शासनाच्या प्रदूषण विभागाला माहिती दिली गेली आहे .त्या साठी शासनाच्या एका कमिटीने जनसुनवाई कंपनी कार्यस्थळावर घेतलेली आहे .
या मध्ये किती.स्थानिक नागरिक होते हा प्रश्न शोधमोहिमेचा भाग असला तरी सरकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घेतल्या जनसुनावाई कागदपत्री व्यवस्थित घेतलेली आहे .
सध्या मात्र प्रदूषणाच्या तडाख्याने कंपनीच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होत असून पिकांवर प्रदुषनाच्या थराचे चित्र नित्याचा विषय झाला आहे .
……….गाव म्होरके झाले ठेकेदारा?……
गावातील स्थानिक कंपनी विरोधात एखादे पाऊल उचलू लागले की कंपनी गाव म्होरक्यांशी संपर्क साधते,त्याच्याकडून तक्रार करणाऱ्यांना समज दिली जाते हा प्रकार नित्याचाच झालेला असला तरी म्होरक्यानी सुधा ठेका घेतलेली माहिती मिळाली आहे त्यांच्या नावाने नसला तरी घरातील कोणाच्यातरी नावाने त्यांचा व्यवसाय आरामात सुरू आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे या प्रकाराने गाव म्होरके गावातील नागरिकांच्या प्रश्नाच्या पाठीमागे उभे राहण्याचे सोडून समझोता करण्यात त्यांचा फार वेळ जातो अशी अवस्था सध्या आहे .परिणामी म्होरके तुपाशी आणि गावातील नागरिक उपाशी ?अशा म्हणीची आठवण आल्या शिवाय राहत नाही



