केडगाव आवाज लोकशाहीचा …
केडगाव क्रांतीवीर महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले जयंती उत्सव समिती च्या माध्यमातून करण्यात आले होते.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
या वेळी विधीतज्ञ बापूराव भागवत यांचे महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी व्याख्यान झाले .त्याग आणि समतेचा महा मेरू असणारा महात्मा.शिक्षणात कमी होत मात्र प्रचंड शिक्षण घेतलेल्या आणि देशाचे संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरु म्हणून संबोधला गेला ,शिक्षणाची क्रांती करणारा हा क्रांती सूर्य महिला उद्धारक बनून गेला चूल आणि मुल इथपर्यंत असलेल्या महिलेला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या पत्नीमार्फत मुलींची शाळा सुरू केलेल्या या ज्योतिबांनी महिला उद्धारासाठी शिक्षणाचा पाया घातला आहे .तो कोण्या एका जातीचा न्हवता मात्र मानव जातीचा उद्धारक होता अशा स्वरूपाचे मौलिक विचार भागवत त्यांनी व्याख्यानातून दिले
सायंकाळी सवाद्य मिरवणूक निघाली होती विद्युत रोशनाई केलेल्या रथामधून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली आकर्षक फेटे परिधान करून महात्मा फुले प्रेमी मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते

११एप्रिल दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिन म्हणून मोठ्या जल्लोषात केडगावकरांनी साजरा केला,पुढील काळात ज्योतिबा यांच्या अर्धांगिनी महिला उधारकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी जन्मदिनानिमित्त मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात येतील त्यातून प्रबोधनाचा कार्यक्रम केला जाईल आणि भविष्यात माता सावित्री आणि क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर परिसरामध्ये जनजागृती करण्यात येईल अशा स्वरूपाची घोषणा या निमित्ताने उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे .
……………विशेष वाचा ……….
महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना या जयंती उत्सवाची सोशल मीडिया वरून माहिती दिली जाते आणि सोशल मीडियाच्या आधारावर या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येते हे जिल्ह्यातील एकमेव उदाहरण असून सोशल मीडिया वरूनच आर्थिक मदत केली जाते आणि हा सोहळा विश्वासाने आणि जल्लोषाने पार पडतो



