दौंडच्या भीमजयंतीची सुरवात भीम पुरस्कार गौरवाने …

दौंड आवाज लोकशाहीचा ….

दौंड मध्ये भीम गौरव सन्मानाने आंबेडकर जयंतीची सुरवात झाली .शहरात भीम जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .वेगवेगळ्या भागातून भीम अनुयायी हा जल्लोष करीत असतात .

या सोहळ्याची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार सेना तसेच ई-वेस्ट मॅनेजमेंट यांच्या विद्यमाने १० एप्रिल ला ठीक रात्री आठ वाजता या सोहळ्याचे प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक रमेश थोरात यांची उपस्थिती होती यावेळी त्यांच्यासह व्यासपीठावरती माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर गटाचे माधव दादा जमदाडे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार इंद्रजीत जगदाळे पाटील बादशाह भाई शेख गौतमजी साळवे कांचनाताई साळवे भगवान गायकवाड  मनिषा गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी बारामती आरटीओ प्रमुख सुरेंद्रजी निकम . शैक्षणिक विभागासाठी सुभाष समुद्र सर यांना उद्योजक म्हणून सतीश परशुराम शितोळे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे पत्रकार क्षेत्रामध्ये राजू जगदाळे विधिकार, श्रीकांत थोरात, बांधकाम क्षेत्रामध्ये सुवासजी साळवे ,भारत सरकार नोटरी साठी अक्षय जी शितोळे ,क्रीडा क्षेत्रामध्ये सुरेश जी पालवे, डॉक्टर यासाठी प्रसादजी भापकर ,आणि रजनीकांत गायकवाड ,कला व नाट्य मध्ये गणेश जी लोणकर, आणि निवेदक रवी पवार, यांना पुरस्काराने गौरविण्यात आले

जयंती समितीचे अध्यक्ष प्रज्वल थोरात समितीचे उपाध्यक्ष आदित्य लोंढे कार्याध्यक्ष तन्मय कांबळे सचिव संजयजी सोनवणे खजिनदार हर्ष बाळासाहेब आढाव आदींनी  या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती.

कार्यक्रम यशस्वीरित्या आणि भक्कमपणे पार पाडता यावा म्हणून या सर्वांच्या पाठीमागे आयोजक अनिल बापू साळवे आनंद बगाडे आयुष्य मती मनीषा गायकवाड मयूर राजेंद्र आढाव दिलीप पाखरे तसेच सूत्रसंचालन करणारे डॉक्टर आयुक्त किरण सर जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.

दौंड शहरामध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात असतो १४ एप्रिल हा जरी बाबासाहेबांच्या जन्मदिनाचा दिवस असला तरी दौंड शहरात त्यांच्या उत्सवाच्या सोहळ्याची सुरुवात एक आठवडा अगोदर सुरू होते आणि त्यातील हे पहिलं सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन या सर्व मंडळींनी पार पाडलं यावेळी भीम गीताचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थेत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त आरटीओ विभागाने १३४ वाहन चालकांना वाहन परवाने देऊन बाबासाहेब यांची १३४ वी जयंती चे अवचित साधण्यात आले परिवहन विभाग शहरातील वाहतूक व्यवस्था आणि वाहन परवाने नव्या स्वरूपाच्या आलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट यासाठी विशेष मदत करेल अशा स्वरूपाची ग्वाही सत्कारमूर्ती बारामती विभागाचे आरटीओ सुरेंद्र जी निकम साहेब यांनी याप्रसंगी दिली आहे.