केडगाव:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :-विजय चव्हाण
दापोडी गावच्या मारुती मंदिराचे काय झाले अशा स्वरूपाची वादळी चर्चा गावभर सुरू झालेली असुन तीची गडबड केडगाव बाजार पेठे पासून दौंड पंचायत समितीच्या कार्यालया पर्यंत गेली आहे.
नियोजन नसताना आणिं गावकऱ्यांना विश्वात नघेता पाडल्याने मारुती मूर्ती सध्या सोसायटीच्या आवारात ठेवलेली आहे.तिथे सकाळी सरकार धान्य दुकान सुरू असते परिणामी मारुतीरायाला धान्य वाटपाच्यां कामावर लक्ष ठेवण्याचे काम दिले आहे का? असा प्रश्न सुधा टिंगल टीवाळी द्वारे बोलला जातो आहे.
गावात मारुती मंदिर पाडल्याने हा प्रकार सुरू झालेला असून मंदिर पाडताना गावकऱ्यांना विश्वासात का ?घेतले नाही असा आरोप होऊ लागला आहे.
परिणामी गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अर्जुन टुले यांनी माहितीच्या अधिकारता ग्रामपंचायतीला विचारणा केलेली आहे.आणि एका गावकऱ्याने लेखी अर्ज सुद्धा दिलेला आहे.
सध्या गावात मारुती मंदिरातून सोसायटी गोडाऊन मध्ये उघड्यावर ठेवल्याने मोठा गोंधळ उडाला असून एकड्याकडून जाणूनबुजून विटंबना होण्याची शक्यता होऊ शकते अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे
महिन्याकाठी गावाची यात्रा आलेली आहे.गावातील मारुती मंदिरात नाही मंदिर पाडले आणि नव्याने मंदिर बांधण्याचे अद्याप तरी नियोजन झालेले दिसत नाही हा प्रकार गावकऱ्यांना गोंधळात टाकणारा ठरला आहे.
गावचे सरपंच आबासाहेब गुळमे यांना विचारले असता मंदिर पडण्याची भीती निर्माण झालेली होती म्हणून गावकऱ्यानं समोर पडलेले आहे अशी माहिती देता असले तरी नवीन मंदिर बांधणार याबाबत माहिती दिलेली नाही परिणामी मारुतीरायाला किती दिवस वीणा मंदिरा सोसायटी बाहेरील आवरता मुक्काम करावा लागेल हे समजणे अवघड झालेले आहे .
या प्रकारात गावकरी चिडले असून त्यांनी मारुती मंदिराचे काय झाले म्हणून वादळी चर्चा सुरू केलेली असून तिच्या गवगवा मोठ्याप्रमाणात होऊ लागलेला आहे.
विशेष हे वाचा
गावचे सरपंच यांनी मारुती मंदिरा बाबत आमचे म्हणणे सांगतो नंतर काय लिहियाच ते लिहा असे सांगून दोन दिवस झाले त्यांनी अद्याप काहीच माहिती दिलेली नाही आणि फोन केल्यास उत्तर सुद्धा देत नाहीत त्यांच्या या भूमिकेने नक्की मारुतीचे मंदिर का? पाडले आणि पाडले असल्यास गावकरी त्यांच्या विरोधात जातात कसे हा मोठा गोंधळ गावकऱ्यांसह केडगाव बोरीपारधी नागरिकांच्या मध्ये झाला आहे.



