तालुक्यात जलजीवनचे पाणी पिण्यास मिळणार का?गेली पाच वर्ष कामे संपेना

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण

१२० कोटींच्या जलजीवन नळपाणी पुरवठा योजना दौंड तालुक्यात सुरु कधी होणार हा प्रश्न मोठा गहण झाला आहे.

गेली चार वर्ष या योजनेचे काम तालुक्यातील ५४ गावांमधून सुरू आहे.कामांची मुदत निविदा काढताना दोन वर्षाची होती आता पाच वर्ष होत आले आहेत.अद्याप पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही या प्रकाराने योजना नक्की कोणासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक गावात ठेकेदार अर्धवट योजना करुन पैसे घेऊन बसले आहेत ते निवांत झाले आहे.कामे पूर्ण झालेली नसल्याने अधिकारी चिंतेत असून गावकऱ्यांना या योजनेचा विसर पडला आहे.होईल की नाही हे राम भरोसे म्हणून पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत.

गावच्या मूलभूत विकासातील हा महत्वाचा विकास केवळ अधिकारी यांच्या भंगार कारभाराने रसा तळाला गेलेली आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.

कामाची मुदत अजून वाढवलेली आहे.अशी माहिती नुकतीच सूत्रांकडून मिळाल्याने या योजनेचे पाणी पुढील पिढीला तरी मिळेल का ? असा अंदाज करावा लागणार आहे.मागील मुदतीत काम झाले नाही आणि मुदत संपून तीन वर्ष जास्त झाली आहेत याचा विचार केल्यावर पाणी पुढच्या पिढीला मिळेल असा आशावाद होणे ही साहजिकच आहे.

सध्या तालुक्यात विकासाच्या मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या जात आहेत अंध भक्त मनापासून ती कामे करीत आहेत.तालुका सुजलाम सुफलाम झाला असल्याचं सोशल मिडिया वरून तालुक्यात पसरवण्याचा प्रामाणिक पने सूर आहे.

गावकऱ्यांची मात्र तहान विकतच्या पाण्यावर सुरू आहे मिळणाऱ्या पाण्याची शुद्धता किती आहे.याचा माग मूस नसतो अन्न भेसळ अधिकारी महिन्याच्या चिरी मिरीने दिसून आंधळे ऐकून बहिरे झाले आहेत.

भेसळ करण्यात तालुक्याचा जिल्ह्यात नंबर एक आल्याशिवाय राहणार नाही त्यात पाणी हाच एक घटका म्हणावा असे नाही भेसळ गुळाची निर्मिती या भागात उच्चांक करणारी आहे अनेक वेळा या विभागाने कार्यवाही केली.

मात्र अंतिम फलित काय झाले अधिकारी आणि ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या शिवाय त्रस्त व्यक्तीला माहीत नाही अशा तालुक्यात पिण्याच्या पाण्यातील रामायण मारुतीच्या शेपटी सारखा लांबत चालले आहे.पूर्ण होण्याची लक्षणे नाहीत परिणामी पोटाचे आजार बळावलेले आहेत.डॉक्टरांचे उंबरे रुग्णांच्या जाण्या येण्याने झिजू लागले आहेत.याला दौंड पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषद पाणी विभाग कारणी असून नळपाणी पुरवठा योजना तालुक्यातील नागरिकांसाठी मृगजळ बनू नये अशी भीती निर्माण झालेली आहे.

विशेष वाचा

दौंड तालुक्यातील एका अभियंता याच विभागात काम करतो राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांनी काही कामे ठेकेदाराकडून भागीदारीत केलेली आहेत.अर्थात ती उघड नाहीत पडद्या आडून त्याचा कारभार असला तरी ठेकेदारांना त्याचा तपास लागलेला आहे त्याची अंतर्गत माहीत काहींनी दिली आहे.ज्यांनी दिली त्यांच्या कडून कामाची व्हिजिट आणि कागद पत्रांवरून सह्या करण्यासाठी पाच टक्के कमिशन घेतो,दिले नाही अथवा विरोध केल्यास कागदपत्रांमध्ये अडचणीत आणतो जाणून बुजून विलंब करतो अशा खोड्या करीत असल्याने त्याच्या बाबतीत अत्यंत सावध गिरीने ते वागत असतात.

दौंड तालुक्यातील योजनेत मलई खाणारा राजकीय आशीर्वादाचा बोका आहे अशी दबक्या आवाजात तक्रार सुद्धा होऊ लागलेली आहे.