दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण
दौंड शहरात पुनर्वसन जमिनी काही बिल्डर काही आजी माजी नगरसेवक आणि त्यांच्या साठी करणाऱ्या तानाजी पंतांनी घेतलेले आहेत.ही सर्व मंडळी राजकीय आशीर्वादाचे लाभार्थी असल्याकारणाने आमचं काहीच होऊ शकत नाही आमच्या मागे आशीर्वाद आहे अशा स्वरूपाची धारणा व्यक्त करून या जमिनीचे आता विक्रीसाठी काहींनी काम हाती घेतलेला आहे.
दौंड शहरातील पुनर्वसनसाठी दिलेल्या जमिनी सध्या बिल्डरांच्या घशात गेल्याने तिथे इमारती व्यापारी संकुलने उभे राहून मोठी माया कमवण्याचा कार्यक्रम झालेला आहे.
मूळ लाभार्थीच्या जागी तिच्या नावात आणि आडनावात साम्य असलेल्या महिलेला उभे करून या बहाद्दराने पाटस दौंड रोडला विकलेल्या जमिनीची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणी लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून यासाठी योग्य ती हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितल आहे.
पुणेरी दलाल आणि त्याच्यासाठी केबिन करणारा दौंड मधील स्टॅम्प विक्रेता आणि काही बांधकाम व्यवसायिकांची कागदपत्राची तपासणी सुरू झाल्याची माहिती सुद्धा हाती आलेली आहे.
लवकरच दौंड तालुक्यात भूकंप होऊन पुनर्वसन जमिनीच्या प्रकरणाच धक्कादायक असा दणका तालुक्यात बसण्याची शक्यता आहे.आवाज लोकशाहीचा मधून प्रकरणाचा छडा लागल्याने वरिष्ठ कार्यालयामध्ये पुनर्वसन हा विषय गंभीर स्वरूपाने हाताळला जात आहे या प्रकरणावरती राजकारणातून मात करता येईल का? म्हणून काही दलाल त्यांचे बगलबच्चे आणि बांधकाम व्यावसायिक पळापळी करू लागलेले आहेत.काही बांधकाम व्यवसायिकांनी माहिती असून सुद्धा कृषी जमीन करण्यासाठी भानगड सुरू केली असून यामध्ये जमिनी खरेदी विक्री करणाऱ्या एका मोठ्या व्यावसायिकाचा हात आहे.
तसेच शहरांमध्ये नामवंत समजलेल्या एका व्यक्तीने दहा एकर जमिनीचा घोटाळा केला असून कवडीमोल भावाने घेतलेली ती जमीन नक्की कोणत्या लाभार्थीची विकत घेतलेली आहे हा विषय गुंत्याचा होणार आहे.
तालुक्यातील कामटवाडी येथील पुनर्वसन घोटाळ्यातील जमीन विकण्यासाठी दलाल शर्तीचे प्रयत्न करीत आहे या दलालाने पुनर्वसन जमीन खरेदी विक्री हा धंदा सुरू केलेला होता आणि तो गेले दहा-बारा वर्ष त्यांनी केल्याने अनेक जमिनीतील हेराफेरी खातेदारांची उलट सुलट कामगिरी हे प्रकार केलेले आहेत.त्याच्या घरात आणि गाडीत छोटसं पुनर्वसन कार्यालयात त्याने सुरू केलं होतं अशी वादळी चर्चा केडगाव दापोडी बोरे पारधी या परिसरात होती.
कानगाव येथील पुनर्वसन जमिनीच्या वाटप पत्रांमध्ये महा घोटाळे झालेले आहेत या घोटाळ्यांना पुनर्वसन मधीलच स्वतःला राजकारणाचा आशीर्वाद आहे असे समजणारे एक नव्हे तर अनेक दलाल कामकाज करीत आहेत.
दौंड तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या पत्रकारांनी सुद्धा या घोटाळ्या गंगे राजकारणाच्या मदतीने काही जमिनी खरेदी विक्री केलेली आहे हे पत्रकार नक्की कोण? हा प्रश्न गुलदस्त्यात सर्वांना वाटत असला तरी त्यांची परिस्थिती तालुक्यामधील महसूल प्रशासनासह पुनर्वसनची दलाल आणि एजंटकी करणाऱ्यांमध्ये परिचित आहे यामधून काही प्लॉटिंग ठेकेदार तर काही बांधकाम विभागाचे ठेकेदार बनलेले आहे आपला व्यवसाय अबधित राहवा म्हणून राज्यकर्त्यांचे भक्त होऊन कामकाज चालवलेले आहे.
दौंड तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तालुका भर विकासाची मोठी कामे केलेली आहेत हा सर्व प्रचार आणि प्रसार तालुक्यापासून जिल्हापर्यंत सर्वप्रथम असताना तालुक्यात लागलेल्या या भ्रष्टाचारी किडे-कडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे अशा स्वरूपाची अपेक्षा आणि आशा नागरिक व्यक्त करू लागलेले आहेत.



