कासुर्डीच्या अतिक्रमणा मागे पुरुष सैतानी डोके.. गावकऱ्यांचा आरोप

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण

महिला घर पाडुन कुटुंब बेघर करू शकत नाही या पाठीमागे कोणतरी पुरुषाचे सैतानी डोके असावे अशा स्वरूपाचा आरोप कासुर्डी गावात होत असूनकासुर्डी गावच्या सरपंच पदाचे कामकाज करतोय कोण? याची सखोल चौकशी केल्यास अतिक्रण पडणाऱ्या सैतानी डोक्याचा तपास लागल्या शिवाय राहणार नाही अशी गावकरी मागणी करू लागले आहेत.

सरपंच पद महिलेच्या पदरी असून तिच्या पदाचा कारभार पुरुष करीत आहे अशी याची प्रशासनाने प्रामाणिक पुणे चौकशी करावी अशी मागणी गावकरी करू लागले आहेत.

गावात अतिक्रमणाच्या कारभाराने नागरिकांनी सरपंच पदाच्या काम काजावर शंका उपस्थित करीत संताप व्यक्त करू लागलेत.या पूर्वी गावात अनेक सरपंच पदाचे दावेदार झाले आहेत.गावात कुरुघडीचे राजकारण सुद्धा होत आलेले आहे.गटांतटची लागण सुद्धा गांवात नवीन नाही.

दरम्यानच्या काळात काही महिलांनी गावात सरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे.मात्र असे कृत्य केलेले नाही.गावच्या विकासाच्या नावाखाली गोरगरिबांची घरे पाडायची आणि सदन असलेल्या समर्थकांच्या घरांना अभय द्यायचं हे झालेले नाही.

दौंड तालुका सध्या राजकीय गटाच्या नावाखाली वेगळ्या वळणावर निघालेला आहे.गावकारभारी नेत्यांची पाठीवर थाप पडावी म्हणून बेताल वर्तन करू लागले आहेत.छोट्या छोट्या गोष्टीत राजकीय कुरघोडी करीत गावातील वातावरणात वितंडवाद निर्माण करू लागले आहेत.

हा प्रकार पूर्वी निवडणूक काळात होत असायचा मात्र गेली काही वर्षात गटाच्या तटाच्या राजकारणाने कहर केला आहे.त्यात जाती जमातीच्या राजकारणाला मोठे पेव फुटले आहे.सरकारी अधिकारी शासनाच्या पगारावर काम करताना कोणाच्या घरचे घरगडी असल्यासारखे वागवले जात आहेत.

परिणामी अनेक गरीब न्यायापासून वंचित राहत आहेत.तालुक्यात राजकीय विरोध करणारे कोणत्यातरी कारणाने पेचातं कसे सापडतील आणि त्यांना कसा त्रास देता येईल या साठी काही गावातील आनाजी पंत राजकीय हुजुरी गिरी करण्यासाठी प्रामाणिक कामे करीत आहेत.

परिणामी गावात गावकरी कमी आणि राजकारणी जास्त दिसू लागले आहेत.कासुर्डी
,देवळगावगाडा,खोर,दापोडी, खोपोडी,तालुक्यात कमी लोकसंख्या असलेले गावे या प्रकाराने वितंडवादाची केंद्रबिंदू बनलेली आहेत.

गावच्या विकासापेक्षा गावच्या कुरघोडीच्या राजकारणाची जिद्द पकडून कामकाज होऊ लागल्याने मतदान विरोधात करतो काय म्हणून गोर गरिबाना टार्गेट करून त्यांना त्रास दिला जातो आहे.कासुर्डी गावच्या अतिक्रमणाचा हाच विषय आहे.अशी कबुली ज्यांना बेघर करण्यात आले त्यांनी दिलेली आहे.

घर खऱ्या अर्थाने महिलेच्या हाती असते आणि महिला घराचा पसार होऊ देत नाही ते सुंदर असावे म्हणून असतील त्या सुविधांमध्ये ते सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नशील असते मात्र खिंडार व्हावं ते विचित्र असावं अशी तिची धारणा असू शकत नाही.गावच्या सरपंच महिला आहेत आणिमहिला घर पाडेल असे होऊच शकत नाही राहिला अतिक्रमण नावाखाली केलेला प्रताप पण ऐकला अभय आणि दुसऱ्याचे उध्वस्त केले जात नाही अशी उलट सुलट चर्चा गावकरी करीत असताना या पाठीमागे कोणाचा सैतानी डोकं असलं पाहिजे त्याची सखोल आणि प्रामाणिकपणाने चौकशी करा अशी मागणी करू लागलेली आहेत.

महिला सरपंच पदाचा गैरवापर कोणतरी सैतान डोक्याचा व्यक्तीच करीत असावा असा ठाम आरोप सुद्धा ते करू लागले आहेत.

अतिक्रमणामुळे बेघर झालेला परिवार