दौंड :- आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी विजय चव्हाण
अनेक वर्ष पुनर्वसन जमिनींचा भ्रष्टाचार करणाऱ्या दलाल आणि भामट्यांच्या कारभाराची चौकशी होण्याचे संकेत सूत्रांकडून मिळाल्याने तालुक्यात मोठा भूकंप होणार आहे.जमीन घेणारे आणि विकणारे यांच्या साठी हा विषय महाप्रलय असणारा असून अनेक जणांचा कारभार या निमित्ताने उघडा होवून त्यांची दरिद्री वृत्तीचा बुरखा फाटला जाणार असल्याने मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याचा गोड दिवस या निमित्ताने कडू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
दौंड शहरातील महत्वाचे आणि स्वतःला मातब्बर समजणारे नेते त्यांचे बगलबच्चे यांची या निमित्ताने शिकार होणार असून सरकारी पाशातून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्यां आका ला सुद्धा आपला पाय अडकेल अशी भीती वाटू लागलेली आहे.अनेक कुटुंबाला प्रचंड त्रास यांच्या मुळे भोगावा लागला असून काहीना प्रचंड त्रास भोगावा लागला आहे.
बुवा,बाबा,दादा,नाना,शेटजी काका, अण्णा,भाऊ तात्या मामा समजणारे या जमिनींचे लोभी झालेले आसल्याने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे पर्यंत करण्यासाठी अनेक हितचिंतक कामाला लागले आहेत.
पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तालुक्यात अशा जमिनींची चौकशी केली जाणार हे निश्चित असल्याची वार्ता सूत्रांकडून आल्याने गोड पाडवा दलाल आणि त्यांच्या टोळीसाठी आगामी काळात कडु ठरणार का? अशी शंका निर्माण झालेली आहे.
पुनर्वसन जमिनींच्या घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकां पेक्षा धनदांडग्यांची मोठी टोळी सामील असून त्यांनी काही चेल्या चपट्यांच्या माध्यमातून जमिनी मिळवल्या आहेत.
शहरात अनेक मातब्बर यात गुंतलेलं असून व्यापारी सुद्धा मागे राहिलेले नाहीत.स्टॅम्प विक्रेता नगरपालिकेचा तत्कालीन बांधकाम विभागातील एक स्वतःला बिरबल समजणार शाखा अभियंत्याने सुद्धा गंगेत आत धुवून घेतले आहेत.ज्यांच्या जमिनी लाटल्या ज्यांची फसवणूक केली त्यांचा यांनी विश्वास घात केला असून बिचारे गरीब या टोळींच्या त्रासाने हतबल झाले आहेत.
दौंड तालुक्यात जवळपास बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन मिळवलेल्या जमिनीचा आकडा मोठा असून शासनाच्या डोळ्या धूळफेक करून खोट्या कागदपत्रांच्या साह्याने जवळपास ३ हजार एकर जमिनी लुबाडलेली आहे.२०१३ च्या दरम्यान तत्कालीन पुरंदर दौंड प्रांतांनी जवळपास या सर्व जमिनींचे रेकॉर्ड तपासून त्यांना सरकार असे शेरे मारले होते मात्र राजकारणाच्या आशीर्वादाने मदन मस्त झालेल्या दलालांनी आणि लाभार्थ्यांनी त्या जमिनी विक्री केलेल्या आहेत.
दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनी लुटणारी टोळी राजकीय आशीर्वादाची असल्याने गेली पंधरा वर्षे त्यांनी बेलगाम जमिनी मिळवून विक्री खरेदी व्यवसाय थाटात केला होता.या सर्व व्यवसायाला या प्रकरणाने मोठा दणका बसणार आहे.वेळ पडल्यास आणि चौकशीत दोषी आढळल्यास कारवाईला समोर जावे लागणार आहे.अशा प्रकरणात दौंड शहर गोपाळवाडी नानावीज लिंगाळी खोरवडी सोनवडी परिसरात धूमाकूळ घालणाऱ्यात दौंड शहरातील अका आणि त्याच्या टोळीचा मोठा सहभाग असला तरी या टोळीत पुणे शहरातील एक ठग मोठा कावेबाज असून त्यानेच पुनर्वसन जमिनींच्या घोटाळ्याला आशीर्वाद म्हणून दौंडच्या या टोळीला मदतीला घेतले होते अशी मोठी चर्चा आहे.
दौंड तालुक्यातील अन्य गावात सुद्धा जमीन मिळवणारे बहाद्दर सर्वदूर परिचित झालेले असून वरवंड गावातील स्वतःला हुशार समजणारा एक दलाल केडगावच्या दलांलाच्या मदतीने चतुर बनला आहे या दोघांसह नानगाव,यवत,कानगाव,पिंपळगाव,देलवडी,कडेठाण,पारगाव,दापोडी पारगाव पाटस केडगाव वाखारी,भांडगाव,कामटवाडी,कासुर्डी खामगाव,नांदूर,सहजपूर या दौंड तालुक्यातील गावांसह हवेली तालुक्यातील उरुळी कांचन मध्ये सुद्धा जमिनी लुटणारी टोळी प्रचलित झालेली आहे या सर्व टोळीला लवकरच चौकशीच्या महाप्रलयाला सामोरे जावे लागणार आहे असे संकेत दिसू लागले आहेत.
अनेक वर्षाचा हा सावळा गोंधळ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताने आगामी काळात लवकरच प्रशासकीय पातळीवर चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकणार आहे.अशा स्वरूपाची माहिती सूत्रांकडून मिळाल्याने दौंड तालुक्यात या प्रकरणासाठी मोठा भूकंप होऊन याचे विपरीत परिणाम जमिनी घेणारे आणि विक्री करणारे सौदेबाज दलाल आणि त्यांच्या टोळीला दणका देणारा विषय ठरणार आहे असा समज होणे साहजिकच आहे.
> *हे वाचा !*
काही बहादरांनी पुनर्वसनच्या जमिनीची विक्री करून त्यातून मिळालेल्या रकमातून वेगळ्या स्वरूपाच्या जमिनी घेत प्लॉटिंगचे कामकाज सुरू केलेले आहे मात्र या प्लॉटिंगसाठी उभा केलेला पैसा हा पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्रीतून केल्याचे त्यांना पक्के माहीत असल्या कारणाने आगामी काळात आपल्यावरती हे संकट येणार आहे. अशा स्वरूपाची भीती त्यांना वाटू लागलेली आहे.
हा सर्व प्रकार सोनवडी लिंगाळी गोपाळवाडी या टप्प्यात मोठ्या प्रमाणात केला जातो यामध्ये प्लॉटिंग विकणाऱ्या मध्ये समोर असणारा व्यक्ती हा वेगळा असून मूळ मालक पाठिंबा घेऊन हा व्यवसाय करीत आहे पुढे येऊन प्लॉटिंग विक्रीचे काम करणारा बदल्यात मोबदला घेतो मात्र खरा खऱ्या अर्थाने फायदा मोठ्या प्रमाणात पडद्या आडचा व्यक्ती करून घेतो अशा स्वरूपाची माहिती काही सूत्रांनी दिलेली आहे.
या मध्ये सोनवडी येथील एका प्लॉटिंगमध्ये दलित वस्तीच्या नावाखाली पंचायत समितीकडून शासनाच्या फंडातून रस्ता सुद्धा करण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे.
या सर्व भानगडी शासनाच्या चौकशीत उघड्या होण्याची शक्यता असल्याने पुनर्वसन जमिनीच्या संकटाची सुमानी दौंड तालुक्यात पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धडकणार असल्याने मोठा धमाका होण्याची निश्चित लक्षणे दिसू लागलेली आहे.



