दौंड:-आवाज लोकशाहीचा..
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण
देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या बोगस दाखला प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अन्यथा दौंड पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती गावातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
ग्रामपंचायतीचे पाच वर्ष दप्तर गायब करण्याचा मूळ हेतूच बोगस कागदपत्रांच्या आधारे आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने केलेले पाप होते अशी पुष्टी या निमित्ताने गावकरी देऊ लागले आहेत.
ग्रामपंचायत मालकी असल्यासारखा कार्यक्रम त्यांनी राबवला असून खिरापत वाटावी तसे नाहरकत दाखले दिलेले आहेत अशी टीका टिप्पणी या निमित्ताने सुद्धा ते करताना दिसत आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की सन २०१९ मधील जानेवारी मध्ये झालेल्या ग्रामसभेत एकच वेळी जवळपास स्टोन क्रेशर आणि दगडखान डांबर प्लांट यासाठी मंजुरी दिलेली आहे.हे व्यवसाय करणाऱ्यांचे अर्ज आणि त्याला जोडण्यात आलेली कागदपत्रे पूर्ण पने दिशाभूल करणारी असल्याची माहिती माहिती अधिकार मधून मिळालेली आहे.हा प्रताप करताना ग्रामसेवक,सरपंच यांच्या बरोबर सरपंच गटाचे काही सदस्य यात सहभागी आहेत अशी शंका नागरिकांना आहे.
गेली ६ वर्षे या प्रकरणी गावात धुसफूस सुरू आहे.अर्ज भानगडी काहींनी करून पाच वर्ष गायब असलेले ग्रामपंचायतीचे दप्तर मिळवेल आहे.मात्र दप्तरात मोठा गोंधळ आहे काही ठिकाणी लिखाणात खाडाखोड काही ठिकाणी मधेच वेगळी पाने लिहून चिकटवलेली आहेत असा आरोप केलेला आहे.
गावच्या ग्रामपंचायतीचे दप्तर गायब असताना दोन वेगवेगळ्या ग्रामसेवकांनी कामकाज सुद्धा केलेले आहे.दप्तर नसताना कामकाज कसे केले हा प्रश्न कामकाज करणाऱ्यांसाठी महत्वाचा नसला नसला तरी ही बाब प्रशासनाच्या कारभार गंभीर आहे.अशा गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने कसे पाहिले नाही ही बाब मोठी कमालीची म्हणावी लागेल.
अशा कारभारात गावकऱ्यांना जवळपास वेड्यात काढलेले म्हणावे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
गावातील सरकारी कागदपत्रे ५ वर्ष गायब होतात आणि कामकाज केले जाते याला काय म्हणावे अशी चिंता ते या निमित्त व्यक्त करताना दिसत आहेत.
> *तत्कालीन सरपंच आणिं ग्रामसेवक यांनी याबाबत खुलास केला पाहिजे*
५ वर्षे दप्तर गायब असल्याची चर्चा आता वादळी झाली असून तत्कालीन सरपंच यांनी गमसेवक याबाबतचा खुलासा करणे काळाची गरज आहे.आणि त्यासाठी त्यांनी विशेष ग्रामसभा बोलावी यातून गावकऱ्यांपुढे या सत्य घटनेचा कथन केलं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने गावकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे.
दौंड तालुक्यामध्ये ४ हजार च्या आसपास असलेल्या लोकसंख्येच्या गावात यानिमित्ताने मोठा घोटाळा झाला आहे की काय? अशी चर्चा सुद्धा होत असल्याने नाहक गावाची बदनामी होत आहे.हे बदनामी थांबवण्यासाठी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांना पावले उचलावी लागतील आणि त्यांनी उचलावीच अशी अपेक्षा ते करताना दिसत असून याबाबत लवकरात लवकर गावाच्या बदनामीचे प्रकरण थांबवण्यासाठी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्यांचे ग्राम विस्तार अधिकारी तसेच तत्कालीन आमच्या गावच्या सरपंच त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य मंडळ आणि ग्रामसेवक यांनी प्रयत्न करावा अन्यथा या सर्वांचे विरोधामध्ये लढा उभारून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचा इशारा आता ते देऊ लागले आहेत.
> *विशेष वाचा!*
गावामध्ये मुरूम चोरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मोरुम चोरटं गाव म्हणून बदनामी सुद्धा होऊ लागलेली आहे.विदाऊट नंबर प्लेटच्या असणाऱ्या गावातील अवजड वाहतूक करणारे डंपर नंबर प्लेट टाकून वापरले पाहिजेत हायवा नावाचा अवजड वाहतूक करणारा ट्रक आपल्या गावामुळे बदनाम होतोय त्याची सर्व कागदपत्रे व्यवस्थित करून त्याला नंबर प्लेट असली पाहिजे आणि यासाठी यवत पोलिसांचा ट्राफिक विभाग तसेच आरटीओ विभागाच्या भरारी पथकाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा यानिमित्ताने करणाऱ्या ग्रामस्थांनी दौंड तहसील विभागाला गावातील आत्तापर्यंत चोरणाऱ्या मुरूम चोरांसाठी काय उपाययोजना केली याची जाहीर रीत्या माहिती दिली पाहिजे.
सध्या गाव हे बोगस कागदपत्रे आणि मुरूम चोरीच्या प्रकरणांमध्ये बदनाम होत आहे.पण ही बदनामी थांबवण्याची काम प्रशासन म्हणून दौंड तहसीलदार यांनी मुरूम प्रकरणी यवत पोलिसाच्या ट्राफिक विभागाने आणि आरटीओ कार्यालयाने या गावातील नंबर नसलेल्या वाहनांना आवर घालावा मुरूम चोरी थांबवावी ओव्हरलोड वाहतूक बंद करावी अशा स्वरूपाची मागणी होऊ लागलेली आहे मुरूम चोरांकडून रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना दमबाजी होत आहे.
राजकीय आधार असणारे हे चोरटे पोलीस विभागाला सुद्धा जुमानत नाहीत अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या सर्व बदनामी प्रकरणाला काळा बसवण्यासाठी आता लढाऊ भरावा लागेल का अशी शंका सुद्धा या निमित्ताने ते व्यक्त करताना दिसत आहे.



