देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या मागील कामकाजाची चौकशी करा नागरिकांचे मागणी अन्यथा आंदोलन केले जाईल इशारा

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा ग्रामपंचायती मधून बोगस कागदपत्रांच्या आधारे ना हरकत दाखले घेणाऱ्या दगडखान व्यावसायिकांनी शासनाला सुद्धा फसवून व्यवसाय सुरू केला आहे का? असा प्रश्न सध्या ना हरकत प्रमाणपत्र मिळवून सुरू केलेल्या व्यावसायिकांच्या कारभाराकडे पाहून नागरिकांना निर्माण होत आहे.

देऊळगावगाडा या गावात ग्रामपंचायतीचा हा घोटाळा सरपंच,ग्रामसेवक,का? सदस्य यांनी केला आहे.याची खातर जमा करण्यासाठी सन २०१६ ते २०२१
मधील दप्तर परत एकदा प्रामाणिक अधिकाऱ्याने तपासले पाहिजे अशी शंका उपस्थित होणे साहजिकच आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दौंड तालुक्यात देऊळगाव गाडा गावात दगड खान स्टोन क्रेशर डांबर प्लांट आणि मुरूम चोरीची दोन गावे आहे.या मध्ये मुरूम चोरीत या गावाला पाठीमागे टाकणारे खोर गाव आहे.

मात्र बोगस कागदपत्र दाखल करून जमीन नावावर नसताना तीन अर्जदार असताना एकाचेच नोटरी दस्तऐवज,अर्जदोन वर्ष आधी आणि सातबारा दोनवर्षा नंतरचा ,मुलाचा मागणी अर्ज बाप अनुमोदक ग्रामपंचायतीच्या कागदपत्रात खाडाखोड,दप्तरच पाच वर्ष गायब या भानगडी झालेला आहेत.सरपंच महिला आणि कारभार नवऱ्याने केल्याची तक्रार सुद्धा आता होऊ लागलेली आहे .

गटविकास अधिकाऱ्याच्या कारभाराबाबत शंका!

पाच वर्ष ग्रामपंचायतीचे दप्तर गायब असलेल्या ठिकाणी कामकाज कसे केलेगेले हा प्रश्न मोठा असला तरी ग्रामचायतील कंट्रोल करणारे कार्यालय म्हणून गटविकास अधिकारी यांच्या कडे पाहिले जाते .आठवड्यात येकदा तरी ग्रामसेवक यांची मीटिंग या कार्यालयात घेण्यात येते याच कार्यालयाने विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक केलेली असते यापदावर काम करणारे ग्रामपंचायतीला भेटी देतात कामांचा आढावा घेतात त्याचा सविस्तर अहवाल गटविकास अधिकारी यांना सुद्धा देतात या प्रणालीमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये काय चालू आहे याचा तपशील या गटविकास अधिकाऱ्यांकडे असतो देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीमध्ये पाच वर्ष दप्तरच गायब असल्याचा तपास या गटविकास अधिकारी आणि त्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांना समजला कसा नाही हा प्रश्न या त्यांच्या सर्व कारभाराकडे बोट दाखवणार आहे.

या गावात बोगस कागदपत्रांचा सुळसुळाट झालेला असो राजकीय आशीर्वादाने मस्तावलेल्या व्यवसायिकांनी यात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे आणि त्याच आशीर्वादाने सत्तेचा बहुमान मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी चुकीचा कारभार केला की काय अशी शंका येणे सहाजिकच आहे.

या सर्व बाबींची सखोल चौकशी केल्यास यामध्ये तत्कालीन सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यापैकी कोण दोषी आहे हे उघड झाल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या कारभारातून हरकत दाखला घेऊन ज्यांनी आपले उद्योग व्यवसाय केलेले आहेत त्यांनी शासनाला सुद्धा गंडा घातलेला आहे हे उघड होणार नाही दगड खान डांबर प्लांट यामुळे नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात होते तसेच परिसरामध्ये या सर्व वातावरणाचा विपरीत परिणाम होऊन नागरी जीवन अडचणीत येते गावच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने या भानगडी गांभीर्याने विचार केल्यास या गावातील तत्कालीन गाव कारभाऱ्यांकडून सर्व प्रकरणाला जाणून-बुजून दुर्लक्षित करीत राजकीय पार्टी म्हणून सहकारी म्हणून गटाचा म्हणून हे सर्व केले की काय हा प्रश्न सुद्धा पुढे येत आहे.

दिलेल्या सर्व ना हरकत दाखल्यांची सखोल चौकशी करावी आणि या गावातील ग्रामपंचायत मध्ये पाच वर्षे गायब झालेल्या दप्तरातील अनेक नोंदीमध्ये कसा गोंधळ करण्यात आलेला आहे हे लोकांमध्ये उघड करावे अशा स्वरूपाची मागणी जोरावली असून प्रशासनाने यामध्ये लक्ष न घातल्यास गावातील काय सुजाण नागरिक दौंड पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती गावातील काही सुज्ञ नागरिकांनी आवाज लोकशाहीचा शी बोलताना दिलेली आहे.