केडगाव:आवाज लोकशाहीचा
एकाच ग्रामसभेत डझनभर दगड खान क्रेशर डांबर प्लांट आणि वीज कनेक्शन साठी सहमती दर्शविणाऱ्या देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.अशी शंका गावभर आहे
आमच्या गावचे नाव कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या कारभाराने बदनाम होणार असल्यास त्याची चौकशी केली पाहिजे दोषी असणाऱ्याला त्याचे प्रायचित्त झालेच पाहिजेल अशा स्वरूपाची अपेक्षा सुद्धा या निमित्ताने नागरिक व्यक्त करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सन २०१६ ग्रामपंचायतचे दप्तरच नसताना पाच वर्षात दप्तरात अनेक चुकीची कामे केली गेलीत या मध्ये अनेक स्टोन केशर दगडखानी डांबर प्लांट आदींना न हरकत दाखले देण्याची किमया करण्यात आलेली आहे.
हे कामकाज कसे झाले हा प्रश्न जरी संशोधनाचा विषय असल्या तरी हे दप्तर संतोष सकट या ग्रामसेवकाच्या काळात गायब झालेले होते ते २०१९ दरम्यान ग्रामपंचायत सलग दोन ग्रामसेवकांनी कारभार करून सुद्धा हे दप्तर उघड करण्याचे काम केलं नसल्याने तिसरा ग्रामसेवक आल्या त्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन त्याचा मोठा गाजावाजा केला होता.
सकट नावाच्या ग्रामसेवकाच्या काळात हे दप्तर अज्ञात वासात गेलेले होते.सकट यांच्यानंतर या दोन ग्रामसेवकांनी कामकाज कोणत्या आधारे केले हा प्रश्न गमतीचा विषय असला तरी दप्तर गेले होते तरी कुठे हा मोठा घन आहे.या प्रकाराने ग्रामपंचायती मधील सावळा गोंधळच उघडा पडला आहे .त्या काळातील सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक याची जबाबदारी घेतली पाहिजे होती मात्र तसं काही झालेले दिसत नाही.
विकास झगडे नावाच्या ग्रामसेवकांना एका कर्मचाऱ्याने २०१५आणि १६ मधील ग्रामपंचायतीकडून कुठल्यातरी रकमा माझ्या येण्या आहेत या विषयाची मागणी केली होती त्यावेळी झगडे यांनी दप्तराचा शोध घेतल्या असता ते नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि नंतर पुढे दप्तर गायब असल्याचा प्रकार गावभर वादळासारखा निर्माण झालेला होता.
दप्तर गायब असलेल्या काळात ग्रामपंचायतीला दौंड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांनी अनेक वेळा व्हिजिट केलेली असणार हे व्हिजिट करताना ग्रामपंचायत दप्तरी ते भेटी दिल्याचा शेरा पुस्तकात लिहीत असतात.त्यांच्या भेटीच्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या कामाकाजाचा आढावा ते घेत असून त्याचे शेरे त्या वहीमध्ये नोंद करीत असतात मात्र पाच वर्षांमध्ये दप्तरच गायब असल्याने या ग्रामपंचायतीला विस्तार अधिकारी यांनी सुद्धा भेट दिली का ?नाही हा प्रश्न संशोधनाचा विषय आहे.
संबंधित प्रकरणाचा मोठा गवगवा होऊन आरडा-ओरडा झाल्याने दौंड येथील गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या सूचनेनुसार आणि लेखी पत्राच्या अनुषंगाने या दप्तराची शोध मोहीम राबवली गेली आणि ते दप्तर ग्रामपंचायत मध्ये दाखल झाले.
या दप्तराची माहिती घेतल्यास धक्कादायक प्रकार यामध्ये उघड झालेले आहेत २६ जानेवारी २०१९ च्या ग्रामसभेमध्ये एकाच वेळी एक डझनभर स्टोन केशर दगडखान चालवण्यासाठी मागणीचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे.
मात्र या माहितीची कागदपत्रे पाहिले असता फार मोठा गोंधळ असून २०१९ साली मागणी केलेल्या अर्जामध्ये २०२४ सालचा सातबारा जोडण्याचे धाडस अर्जदाराने केलेले आहे.अनेक अर्जदार यांनी नोटरीची कागदपत्रे केलेली आहेत त्यामध्ये गोंधळ दिसून येतो काही नोटरी साठी लागणारे कागदपत्र खोटे स्वरूपाच्या आहेत असे सुद्धा म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
जमीन घेण्या अगोदरच काहींना स्टोन केशर दगडखान यासाठी अर्ज केल्यावर मंजुरी देण्यात आलेले आहे.हा प्रकार तर अतिशय भयानक म्हणावा लागेल अशा प्रकारची बोगस कामे झालेली आहेत अशा स्वरूपाची माहिती मिळत आहे .
मुलाला मागणी अर्जाला वडील सुचक म्हणून दिसून आले आहेत मीटिंग यांचं प्रोसिडिंग लिहिणाऱ्या पुस्तकांमध्ये बऱ्याच खाडाखोड आणि कागदपत्र उलटी सुलट चिकटवल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतच्या या कारभाराची तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य बॉडी सरपंच आणि ग्रामसेवक या सर्वांची सखोल चौकशी केल्यास या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होऊन अनेक भानगडी झाल्याचे चित्र उघड झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची ठाम स्वरूपाची अपेक्षा नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.
अवघ्या ४ हजार इतपत असलेल्या लोकसंख्येमध्ये गावात अनेक स्टोन केशर दगडी खान डांबर प्लांट ह्या चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे निर्माण होण्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ दिसत असून तिची प्रामाणिक चौकशी तत्कालीन सरपंच सदस्य यांनी करणे काळाची गरज असताना त्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे
सध्या आवाज लोकशाहीचा मधून गावाची बातमी प्रकाशित झाल्याने आमच्या गावची बदनामी होणारे जे कारण आहे ते शोधले पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंतिम दोषी असणाऱ्या वरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने गावकरी करतात.



