दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:विजय चव्हाण
४ हजार लोकसंखेच्या देऊळगाव गाडा गावात टेकड्यांचा चुरा दगडांचा भुगा करणाऱ्या यंत्रणेचा धिंगाणा मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यासाठी दगडखान, स्टोन क्रेशर डांबर प्लांट टाकणारांची स्पर्धा सुरू झाली आहे.या स्पर्धेत ग्रामपंचायतीने मनमानी कारभार केलेला असून बोगस कागदपत्रांच्या आधारे नाहरकत दाखले देऊन सावळा गोंधळ करून ठेवला आहे.
या सर्व प्रकारात आर्थिक घोटाळा केला असावा अशी शंका येणे साहजिकच असून गावात सध्या या प्रकरणाने मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या सर्व प्रकारात काही फकड्यांनी मुरूम चोरीचा धंदा जोरदार केला आणि गावातील रानमाळांच्या शेतांना खाच-खलगे करून ठेवलेले आहेत.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,२०१९ च्या २६ जानेवारीला ग्रामसभा झालेली आहे.या ग्रामसभेने एकाच वेळेला विषय क्रमांक ८ मध्ये येलुबाई मारुती कोकरे राहुल मारुती कोकरे गट नंबर ३११ आणि ३१४ मध्ये खडीमशीन क्रेशर खान पट्टा यासाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता.या सभेने सुचक अजित सुभाष जाधव आणि अनुमोदक राहुल जगन्नाथ मोरे यांना परवानगी दिलेली आहे.याच ग्रामसभेने दत्तात्रेय नामदेव बारवकर यांचा १८ जानेवारी २०१९ चार्ज मंजूर केलेला आहे.
बारवकर यांचा गट नंबर १९ आणि २० यामध्ये वीज कनेक्शन खडी क्रेशर आणि खानपट्ट्यासाठी परवानगी मागितली होती. २९ जानेवारी २०१९ ला सूर्यकांत लक्ष्मण गायकवाड जमीन गट नंबर १९,२०,२१,२२,२३,२४, मध्ये डांबर प्लांट खडी क्रशर आणि स्टोन क्रेशर यासाठी अर्ज दाखल केलेला होत,
२१ जानेवारी १९ मध्ये निखिल बाळासाहेब पासलकर गट क्रमांक ३११ साठी एम सी प्लांट खडी क्रेशर स्टोन क्रेशर खान पट्टा वीज कनेक्शन आणि नवीन ट्रान्सफर साठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केलेला होता.
२२ जानेवारी २०१९ मध्ये संग्राम विश्वासराव देवकाते रोहित विश्वासराव देवकाते राहणार निरावागज यांनी गट नंबर २५आणि ५६ मध्ये खानपट्टा स्टोन केशर डांबर प्लांट आणि वीज कनेक्शन साठी मागणी करणारा अर्ज केलेला होता.
२४ जानेवारी२० १९ मध्ये आरोधी इंटरप्राईजेस तर्फे अजय झुंबर गवळी अमोल लक्ष्मण जाधव त्रिंबक साहेबराव बारवकर किरण भुजंग बारवकर आणि श्रद्धा अजय गवळी यांनी गट नंबर २०,२१ साठी थोडे क्रेशर खानपट्टा वीज कनेक्शनसाठी अर्ज केलेला होता.
१० जानेवारी २०१९ मध्ये थोरात स्टोन केशर तर्फे केदार सुधीर थोरात राहणार खुटबाव यांनी गट क्रमांक २०,२१,२२,२३,२४ साठी खडी क्रेशर खान पट्टा वीज कनेक्शन यासाठी अर्ज दाखल केला होता या सर्व अर्जदारांच्या अर्जाला मान्यता या ग्रामसभेने दिले असून ग्रामसभेमध्ये मान्यते त्यांना सूचक म्हणून दौंड तालुक्याचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव भैरू बारवकर हे सूचक आहेत आणि अनुमोदक म्हणून दत्तात्रेय दामोदर बारवकर यांचे नाव आहे नामदेव बारवकर हे काही काळ या गावच्या सरपंच पदाच्या पदाचा कारभार सांभाळणारे व्यक्ती आहेत.
या गावाने २०१६,२०१७, २०१८, या काळात सुद्धा काही स्टोन केशर खडी क्रेशर डांबर प्लांट यासाठी अर्ज स्वीकारलेले आहेत आणि त्यांना सुद्धा परवाना नाहरकत दाखले दिलेले आहेत.
गावची लोकसंख्या आणि गावातील स्टोन क्रेशर यांची सध्याची आकडेवारी पाहता सुरू असलेल्या स्टोन क्रेशर पासून निघणारी धूळ एकत्रित जमा करून गावच्या कडेने टाकल्यास गेली २०१६ ते आज तारखे पर्यंत गावच्या कडेने नुसत्या धुळीचे डोंगर झाला असता या त शंका नाही.
या सर्व परवानग्या साठी दिलेल्या नाहरकत साठी बोगस कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे अशी मोठी वादळी चर्चा सध्या जोरावलेली आहे.या साठी आवाज लोकशाहीचा ला महत्वाची माहिती मिळालेली आलेली आहे.
अनेक अर्जदारांनी बोगस नोटरी करून जोडलेली आहे.मागणी ज्या गटात केली त्याचे सातबारे चुकीचे आहेत.परवानगी अर्जात तीन व्यक्ती मागणी करीत आहेत आणि नोटरी एकाने फक्त केलेली आहे बाकी दोघांनी या बाबत काहीच केलेले नाही.
एकाच गटात बहुतांश अर्जदारांनी मागणी केली असल्याने या गटात एकूण खातेदार किती त्यांच्या नावावर जमीन किती याची शंका मोठी आहे.पोटखराबा खातेदारांनी किती आहे कोणत्या खातेदाराच्या नावावर किती आहे हा नक्की कोणत्या स्वरूपाचा आहे अशा विविध विषयांसह कागदपत्रांच्या त्रुटी असताना नाहरकत दिले गेले आहेत.गावचा कारभार एवढ्यावरच थांबलेला नाही बाराही महिने या गावात मुरूमचोरी सुरू असते याची माहिती गावकऱ्यांना आणि गावापासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे.
मात्र महसूल विभागाला याची माहिती नाही अशी परिस्थिती आहे.तलाठी सर्कल यांना याबाबत माहिती नसल्याने जुजबी कारवाई वितिरिक्त गेली दहा वर्षे हा सुरू असलेल्या चोरट्या मुरूम व्यवसाय वरती त्यांनि ठोस कारवाई केल्याचं दिसून आलेले नाही.ज्यांनी स्टोन केशर डांबरी प्लांट खदान यासाठी पूर्वी परवानगी मागितल्या होत्या ते सध्या याच ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी सुद्धा झालेले आहेत.
केडगाव येथून एका अर्जदाराने बोगस नोटरीच्या आधारे परवानगी मागण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचा तो यशस्वी झालेला आहे तसेच बारामती तालुक्यातून जमीन खरेदी करण्याच्या अगोदरच जुजबी अधिकार पत्रावरती नोटरी करून यांच्यासह काही खातेदारांनी परवानगी घेऊन ठेवल्यात गेले चार वर्ष कोणाचा आठ वर्ष उलटून गेलेले आहेत.मात्र अद्यापही क्रेशर सुरू केलेले नाही नुकतीच सूत्रांच्या हातून मिळालेली माहिती अशी की मागील परवानग्या साठी केलेल्या अर्जदारांनी आता परत आम्हाला परवानगी मिळावे म्हणून अर्ज केलेले आहेत.
मात्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कमिटी यांनी मागील काळात तुम्हाला दिलेले असल्या कारणाने परत कसे देण्यात येईल या विषयाखाली अर्ज बाजूला ठेवलेले आहेत अशी माहिती आलेली आहे.
४ हजार लोकसंख्येच्या गावामध्ये अनाठाई स्वरूपाने स्टोन केशर डांबर प्लांट दगडखान यांना वारे माप न हरकत दाखल दिलेले आहेत . गौण खनिज प्रशासन आणि दौंड महसूल प्रशासन यांनी यांच्याकडच्या कागदपत्राची नक्की कोणती तपासणी केलेली आहे. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे .
गावांमध्ये एकूण क्षेत्र दगड खान साठी किती आहे अर्जदार यांनी एकाच गटातून किती लोकांना परवानगी देण्यात आलेले आहेत या गटांमध्ये अर्जदारांच्या कोणाकोणाच्या नावावरती किती किती क्षेत्र आहे याबाबतची तपासणी केली की नाही हा प्रश्न संशोधनाचा विषय असला तरी पुढील भागात आवाज लोकशाहीचा मधून अर्जदार त्यांच्या मालकीचे ऐकून क्षेत्र तसेच त्यांनी केलेली नोटरी कागदपत्रे यांची माहिती दिली जाईल..



