यवत मधील खून जबरी मारहाण आणि चोरी प्रकरणातील चार आरोपी १२ तासाच्या आता अटक..

यवत:आवाज लोकशाहीचा

यवत मध्ये घडलेल्या खून जबरी मारहाण आणि चोरी  प्रकरणातील चार आरोपींना बारा तासाच्या आत अटक केल्याने ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.या घटनेमुळे घाबरलेल्या परिसराला सुद्धा दिलासा मिळाला आहे.

यवत पोलिस स्टेशन मध्ये यावेळी पत्रकार परिषदेत घेऊन पंकज देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की,सलमान दिलशाद शेख वय-२८ वर्षे,राहणार-पठाणकोट मोहल्ला हुश् मज्जिद जवळ बडौत तालुका जिल्हा-बागपथ राज्य उत्तर प्रदेश,मोमिन अकबर शेख,वय ४५ रहानार सदर त्यांचे साथीदार रावत सिंग चौधरी जगदेव सिंग तोमर वय २६ राहणार सदर आणि गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान वय २५ धंदा गुऱ्हाळ कामगारं रा-काशीराम कॉलनी बडौत ता.जिल्हा.बागपथ उत्तर प्रदेश या परप्रांतीय यांना अटक केली आहे.

चोरीच्या उद्देशाने आलेल्या या चार जणांनी बुधवार दिनांक ५ मार्च रात्री १०.३० च्या सुमारास यवत स्टेशन रोडच्या जवळील निळकंठेश्वर मंदिराच्या परिसरातील विश्वजीत शिवाजी चव्हाण यांच्या बंगल्यावर चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते त्या पैकी तीन जणांनी अनधिकृत पने चव्हाण यांच्या घरात प्रवेश करून केलेल्या मारहाणीत विश्वजीत यांच्या जागीच मृत्यू झाला होता.

तसेच त्यांची आई,वडील,
बहीण यांना बेदम मारहाण केलेली होती.आई यांची प्रकृती चिंताजनक असून वडील आणि बहीण जबर जखमी आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यावर यवत पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या माध्यमातून योग्य त्या नियोजनाने आरोपींचा तपास करण्यात आला आरोपी शोध घेत असताना एक संशियत बॅग मिळाली यामध्ये काही कपडे आढळून आले आणि त्यात एक जर्किंग वर युनिव्हर्सिटी दिल्ली असे लिहिले होते या आधारे आरोपी उत्तर भारतीयाचे असल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुण्याचा तपास दरम्यान हे सर्व  पुणे स्टेशनकडे गेल्याची बातमी गोपनीय बातमीदारांकडून आल्यानंतर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूला जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॅपर आरोपीचा शोध घेत असताना एरोडा परिसरातील गुंजन थिएटर चौकात ट्रॅव्हल्स स्टॅम्पवर दोन संशयित आढळून आले.

या दोघांनी उर्वरित दोघांची माहिती घेऊन त्या अनुषंगाने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरीही अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार दौंड विभागीय पोलीस अधिकारी बापूराव धाडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शेळीकर युवक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गणेश शाखेचे सहाय्यक पुरी पुण्याची राहुल गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सभांगे तसेच सुवर्णा गोसावी अभिजीत सावंत अमित सिद्ध पाटील किशोर वाघच सलीम शेख फौजदार ईश्वर जाधव हनुमंत पासलकर बाळासाहेब कारंडे सचिन घाडगे असिफ शेख महेश बनकर अतुल फरादे रामदास बाबर विजय कांचन अभिजीत एकशिंगे राहुल पवार राहुल बॉम्बे मंगेश तिथले योगेश नागरगोजे रणजीत कोंडके अमोल शेंडगे बाळासाहेब खडके सागर नामदास तुषार भोईटे मंगेश भगत निलेश शिंदे अजय घुले बिभीषणस्तुरे गुरुनाथ गायकवाड संदीप देवकर महेंद्र चांदणे रामदास जगताप अक्षय यादव दत्तात्रेय काळे विकास कापरे गणेश कुतवळ विलास जावळे प्रमोद गायकवाड मारुती बाराते प्रणव ननवरे या पोलीस अधिकारी पोलीस नाईक आणि पोलीस हवलदार यांनी तपास कामी सहभाग घेतला होता अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.