कडेठाण येथील लता धावडे महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू नव्हेच तर पुतण्यानेच केला दगडाने ठेचून खून! नागपूरच्या त्या अहवालाने केला पर्दाफाश!

वरवंड : आवाज लोकशाहीचा … दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला लता बबन‌ धावडे हिचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू झाला नुसन तिचा उपसरपंच असलेल्या पुतण्यानेच खून केल्याचे पोलीस तपासात अखेर निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सतिलाल वाल्मीक मोरे ( वय – ३०, मुळ रा तिकी, ता चाळीसगाव, जि धुळे. सध्या रा कडेठाण ता दौड जि पुणे, अनिल पोपट धावडे (वय ४० रा.कडेठाण ता दौड जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत ७ डिसेंबर २०२४ रोजी शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (वय ५० ,रा.कडेठाण) हिच्यावर बिबट्याने हल्ला करून तिला उसाच्या शेतात फरफडत नेले . या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. लता धावडे हिचा बिबट्याच्या हल्ल्यातच मृत्यू झाल्याचा गाजावाजा आरोपी आणि ग्रामस्थांनी केला होता. पोलिस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापुर्वीच तिचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आला. या रिपोर्ट मध्येही गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी हा प्रकरणाकडे गांभीर्याने घेतले नाही. सुरुवातीलाच या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आले होती .वन विभागांनी ही हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती. मृत महिलेचा मृतदेहाचे शवविच्छेदन वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. मयतास कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून मृत्यु झाला नसले बाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपींनी अनैतिक संबंधाचे कारणावरून आपसात संगनमत करून लता धावडे हिस जिवे ठार मारण्याचा कट रचुन तिचे तोंड व डोके दगडाने ठेचुन तिला जिवे ठार मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी फिर्यादी दिली असून या गुन्हयाचा पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एच. संपांगे हे करीत आहेत. दरम्यान या महिलेच्या बिबट्या चालत मृत्यू झाल्या चे समजल्याने काहींनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामधील काही फोटोमध्ये मृत्यू देहाच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड स्पष्टपणे दिसत होता. मात्र वन विभागाचे अधिकारी, पोलीस आणि पत्रकार त्या ठिकाणी गेले असता घटनास्थळी दगड दिसुन आला नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शोध घेतला असता त्यांना घटना स्थळापासुन‌ काही अंतरावर उसाच्या शेतात सापडला. त्याचवेळी पोलिसांनी हा दगड ताब्यात घेतला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास ही सुरू केला होता. मात्र मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव आल्याने हा तपास थांबला होता. अशी चर्चा होती. दरम्यान,आमदार राहुल कुलांनी अधिवेशनात मांडला होता प्रश्न ! कडेठाण येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने लता व
धावडे हिला वन विभागाने आर्थिक मदत करावी तसेच तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. आमदार कुल यांनी सदर महिलेच्या कुटुंबाची भेट ही घेऊन आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तर उपसरपंच असलेल्या पुतण्या अनिल धावडे हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने फोन करून पैशाची मागणी करीत होता. मात्र सदर महिलेचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू नसून तिचा पुतणी आणि कामगाराने खुन केल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.