सरकारने पुनर्वसन जमीन डोळे झाकून वाटली ?

दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी-विजय चव्हाण

सरकारने पुनर्वसन जमीन डोळे झाकून वाटली की जमीन देण्यासाठी खातेदार दलाल यांच्या कडून लाच घेतली हा प्रश्न ? दौंड महसूल विभागाने शोधलेल्या जवळपास ७०० अधिक एकर जमीन घोटाळ्याकडे पाहून पुढे आला आहे.

दौंड तालुक्यात अनेक खातेदार जमिनी मिळवून बसले होते मात्र त्यांनी जमीन मिळवताना अनेक कागदपत्रांमध्ये हेराफेरी केलेली आढळून आलेली आहे.

सोनवडी गावात धोंडीबा कोंडीबा पायगुडे,जयवंती राजेंद्र पासलकर, गजानन वामन सुतार, बारकु विठू शेडगे,नारायण गोविंद पासलकर, बबई बाई नारायण पासलकर महादेव नारायण पासलकर सोनू रंगू पासलकर,अनु गेनू पासलकर,राजेंद्र ज्ञानोबा पासलकर, चिंतामणी मारुती पासलकर, सतीश ज्ञानोबा शेलार , नंदा हरी जगदाळे ,गणपती तुकाराम पडवळ, ज्ञानोबा गणपत पडवळ

पेडगाव मध्ये अनु बाबू दबडे गोपाळापासून दबडे राजेंद्र किसन दबडे शिवाजी चांदु मोरे सखुबाई नाथू दबडे विष्णू अंबु दबडे श्याम दगडू दबडे दगडू लक्ष्मण दबडे जनाबाई विष्णू मोरे जिजाबाई भिकू मोरे विद्या अंकुश दबडे जयश्री उत्तम जगदाळे दगडू रामजी दबडे अंकुश दगडू दबडे सखाराम विठू दबडे मारुती किसन दबडे सीताबाई सखाराम धिंडले,

वरवंड येथे रामा गणू वाकसे मंगल नारायण तनपुरे सोमा भिवा शिरसागर अनंता लक्ष्मण पडवळ रुक्मिणी विठ्ठल चव्हाण.

पाटस येथे नथू खंडू वरघडे नामदेव सोमा गेढले  बबन उभे बबन गोविंद कोळेकर मायावती बबन कोळेकर विठ्ठल बाळा बेलूसे मंगल वसंत मरळ कोंडू आबू कोकरे कोंडाबाई गंगाराम डेबे.

नानवीज येथे गेनू श्रीपती कडू सुभद्रा धोंडीबा पासलकर ज्ञानोबा सोनबा पासलकर कृष्णा खाशाबा पासलकर दामू रामदास साबळे हलका बाबुराव पासलकर छबबाई रामभाऊ कडू जणू शिवा कडू शिवा जणू कडू विठ्ठल रामभाऊ कडू बळवंत गोविंद पासलकर विठ्ठल धोंडीबा पासलकर.

कानगाव येथे सदाशिव गणपत कालाने इंदुबाई यशवंत आणि सोमनाथ सदाशिव कालाने गणपत गोविंद मोरे हनुमती गोविंद मोरे भांबू सदू कोळेकर दगडू रामभाऊ पासलकर सखाराम रावजी मोरे निवृत्ती मारुती मोरे चंदर लक्ष्मण काटकर मंदाबाई बापू बिटके तुकाराम राघू लोहकरे जयाबाई दगडू गोरड इंदुबाई पांडुरंग भोसले सतु गोपाळ दबडे उत्तम गोविंद दबडे कृष्णा संभाजी शेडगे नुरा गोपाळ दबडे ज्ञानेश्वर गोविंद दबडे बबई बाई तुकाराम शेडगे धोंडाबाई बहिरू कडू सखाराम भैरू कडू गोपाळ नरसू निवंगुणे उत्तम शंकर निवंगुणे संगीता शंकर दिंडले विठ्ठल सोमजी हनम घर दत्तू तुकाराम पेठेकर विमल चंद्रकांत पोकळे राजू व वासुदेव शिवाजी भोसले योगेश सखाराम मोरे बबईबाई गणपत पासलकर मारुती पांडुरंग भोसले हिरामण तुकाराम लोहकरे शिवाजी विष्णू दबडे शशीकला व विष्णू दबडे बाळू किसन सखाराम मोरे रामभाऊ भागोजी सास्टे जया श्याम दबडे शिवराम भिकू कटके यशवंत शिवराम कटके अशोक मारुती भोसले नितीन सखाराम मोरे शोभाबाई योगेश मोरे चंद्रकांत मनोहर वैद्य गिताबाई विलास भोसले.

या सर्व मिळकतरांच्या जमिनीमध्ये गौड बंगाल करून जमीन मिळवल्या आहेत अशा स्वरूपाची शंका दौंड तहसील प्रशासनाने घेऊन त्यांच्या नावाची पुस्तिका तयार केलेली आहे.

शासनाला खोटे कागदपत्र देणे दस्तऐवजामध्ये खडाखोड करणे अशा प्रकारचे प्रकार या जमीनधारकांनी केल्याची नोंद दौंड तहसील प्रशासनाने मागील काही वर्षांपूर्वीच घेतलेली होती मात्र सदर नोंदीची अंमलबजावणी केली का नाही हा आता शोध मोहिमेचा विषय बनलेला आहे.

हा सर्व प्रकार विचारात घेतला सरकारने जमीन डोळे झाकून वाटली की जमीन वाटप करण्यात आलेल्या लाभार्थी कडून आर्थिक लाभ मिळवलेला आहे का अशा स्वरूपाची शंका उपस्थित होणे साहजिकच आहे.

जमिनीचा बांध कोरला तर बांधावरून रक्तबंबाळ होण्याची अनेक उदाहरणे वृत्तपत्रातून माहिती प्रसारातून सर्वश्रूत झालेली असताना या दौंड तालुक्यामध्ये शासनाच्या करोडो रुपया किमतीच्या जमिनी अशा स्वरूपाच्या बोगस कागदपत्राने लाटण्याचा हा प्रकार मोठा गंभीर असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.

दौंड शहरालगतच्या करोडो रुपयांच्या किमतीच्या जमिनी अशाच दलालांनी त्याच्या टोळीने त्या टोळीला आशीर्वाद असणाऱ्या आकांनी मिळवलेले आहेत त्यातून बक्कळ पैसा कमावला राजकारण केले आणि आणि समाजकारण करण्याचा खटाटोप करण्याचा प्रकार केला यातून स्वतःचं टोळीचं भलं केलं मात्र गोरगरिबांचे वाटोळं केलं अशा स्वरूपाचे चित्र सध्या उघड होत आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये प्रशासनान गांभीर्याने चौकशी करावी हा राज्यातील सर्वाधिक जमीन घोटाळा म्हणून उघड होईल अशा स्वरूपाचा ठाम विश्वास दौंड मधील सर्वसामान्य जनता व्यक्त करताना दिसत आहे.