दौंड:आवाज लोकशाहीचा
|विशेष प्रतिनिधी-विजय चव्हाण
आवाज लोकशाहीचा मधील प्रकाशित केलेल्या बातम्याने दौंड पुनर्वसन जमिनीचा घोटाळा करणाऱ्यांचे दाभे दणाणले आहे गेली पंधरा दिवसांपासून दौंड तहसील कार्यालयात फिरकले नाहीत सध्या सर्वच जण काय होणार या चिंता करीत भूमिगत झाले आहेत.त्यांच्या भूमिगत झाल्याने तहसील कार्यालयात अधिकारी आणि पुनर्वसन टेबल सांभाळणारा कारभारी समाधानी झाले आहेत.रोज त्यांना आमच्या प्रकरणाचे काय झाले अकाला सांगू का? या त्यांच्या धमकीने त्यांना मोठा त्रास होत असायचा सध्या त्यातून त्यांची मुक्तता झालेली आहे.
आका नावांची दहशत पसरवत या दलालांनी अनेक प्रकरणे खोट्या कागदपत्रे तयार केली खोटे लाभार्थींच्या नावावर जमिनी मिळवल्या त्यांची कवडीमोल भावात खरेदी केली आहे आणि विक्री मोठ्या रक्कमा घेऊन पैसे कमवले आहेत.
दौंड तालुक्यात बोगस खातेदारांची यादीच सध्या प्रकाशित होत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.दलाल चिंतेत असून ज्यांच्या नावे बोगस जमिनी मिळवल्याची अवस्था अस्वस्थ आहे.
अस्वस्थ असलेल्या खातेदारांना घाबरू नका ! अका आहेत बरोबर काही होणार नाही असा दिलासा देण्याचा केविलवाणी प्रयत्न सुद्धा दलाल करू लागले आहेत.
दौंड तालुक्यात सिंधुबाई दिनकर कडू, वाघू भागू पवार ,आशाबाई भगवान पवार,एकनाथ लक्ष्मण पासलकर,नकाबाई मुलाजी कोकरे नानू कोंडीबा मरगळे,आबा कोंडीबा मरगळे,भिकाजी तुकाराम दबडे,लक्ष्मण केसू सांगळे,गणपत हरी पवार, नथू गणपत पवार, प्रकाश पांडुरंग मोरे, राणू गेनू दबडे,शंकुंतला विठ्ठल गरुड,जिजाबाई सखाराम शेडगे,साधू वाघू पवार,अनिल धोंडीबा पासलकर, अनु गेणू पासलकर, मनोज पासलकर ,मालनबाई दामोदर कांबळे,ज्ञानु बाबुराव पासलकर, महादू रंगू कडू,अर्चना संजय पासलकर, सोनू रंगू पासलकर,दत्तू सखाराम सपकाळ, नथू सखाराम सपकाळ, अलका विठ्ठल गरुड, विकास विठ्ठल गरुड,अनु दगडू शेडगे, तान्हाजी दगडू शेडगे, रामा राघू कडू,भिका रामा कडू,शिवराम तुकाराम साबळे,विष्णू अर्जुन कोळेकर,भिवराव तुकाराम साबळे,द्रौपदाबाई रामचंद्र जांभळे,विष्णू नावजी शेडगे,मंगल दामोदर साबळे,बाळू रामभाऊ पासलकर,बाबुराव बाळु पासलकर,सखाराम विठू सपकाळ,सीताबाई कोंडीबा साबळे,बाळू रावजी दोन्हे,विनायक बाळू दोन्हे ,बापू हरिभाऊ पासलकर,अलका पुंडलिक पिवळे या सर्व खातेदारांना दौंड तालुक्यात मिळालेली जमिनी महसूल विभागाने केलेल्या नोंद वहीत चुकीचा आहेत.
त्यांची कारणे सुद्धा नमूद केली आहेत हा प्रकार पाहता बोगस आदेश करून जमिनी मिळवलेली आहे.आणि तेही कायद्याच्या चौकटीत शासनाची फसवणूक केली आहे असे समजते,सर्व खातेदारांना फसवणुकीच्या नावा खाली पोलिसात गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.
(पुढील नावे पुढच्या बातमीत प्रकाशित होतील)
दौंड तालुक्यात नानगाव कानगाव यवत दौंड शहराच्या परिसरातील गोपाळवाडी नानावीज सोनवडी लिंगाली परिसरातील पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्री झालेल्या सर्व प्रकरणे बारकाईने तपासा आणि दलाल स्टॅम्प विक्रेता आणि त्यांच्या टोळीचा कारभार उघडा कसा होतो ते पहा अशा स्वरूपाचा ठाम विश्वास दौंड परिसरातील नागरिक करू लागले आहेत.
वरवंड नानगाव कानगाव मधील जमिनीच्या व्यवहारात स्वतःला राजकीय मान्यवर समजणाऱ्या नेत्यांनी हात ओले केले आहे.
केडगाव मधील दलाल याची मोठी साथ मिळालेली आहे.दापोडी मधील प्रतिष्ठित व्यक्तीचा हा व्यवसाय झालेला असून अनेक प्रकरणे खामगाव लडकतवाडी दापोडी वाखरी यवत भोसलेवाडी परिसरात त्याने मोठा धुमाकुळ घातला आहे.
यवत मधील काही बिरबल स्वतःला अधिकाऱ्यांचा जावई समजत असून अनेक ठिकाणी हवेली मधील सहकाऱ्यांना घेऊन अशा जमिनी बळकावल्या आहेत.
एक दोन पत्रकार त्यांच्या मदतीने दलाल झाले आहे ते स्वतःला गुंठा मंत्री संबोधू लागले आहेत.या सर्व भानगडी मागे पुनर्वसन जमीन असून त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.



