पुनर्वसन घोटाळ्याच्या आवाज लोकशाही मधील बातम्यांची जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतली गंभीर दखल लवकरच चौकशी होणार दिले आश्वासन..

दौंड:आवाज लोकशाहीचा…….विजय चव्हाण….

दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीचा घोटाळा या विषयाची मालिका आवाज लोकशाहीचा मधून सुरू आहे आणि तिची दखल जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतली असून लवकरच याचा सखोल तपास केला जाईल असे आश्वासन त्यांनी आवाज लोकशाहीचा शी बोलताना दिली आहे.

अखेर आवाज लोकशाहीचा मधून जिल्हा अधिकारी डूडी यांच्या पर्यंत अन्यायाला वाचा कोण फोडणार हा आवाज पोहचल्याने दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीची कसून चौकशी होणार आहे अशी आशा या निमित्ताने वाढलेली आहे.

पुनर्वसन जमिनीमध्ये अनेक भानगडी या शासकीय जमिनी मिळवण्यासाठी काही दलाल आणि त्यांच्या टोळीने केलेल्या असून आता चौकशी झाल्यास त्यांचे बिंग फुटणार आहे.

दौंड तालुक्यात शासनाकडून चौकशी केलेल्या ७०० अधिक जमिनींची खोटी कागदपत्रे करून शासकीय जमिनी मिळवलेली आहे होती याचा अहवाल तत्कालीन पुरंदर दौंड प्रांत यांच्या वतीने करण्यात आलेला होता.

मात्र या व्यतिरिक्त अजूनही तालुक्यामध्ये या जमिनीमध्ये मोठा सावळा गोंधळ आहे.धरणासाठी एका व्यक्तीची जमीन जाते आणि बदल्यात तो अख्ख्या परिवाराला जमीन मागतो हा काही महा-ठकांचा कारभार असला तरी ज्यांची जमीनच गेली नाही त्यांच्या नावावर सुद्धा वाटप करून दलालांनी या जमिनीच्या विक्री केलेल्या आहेत.

सर्वाधिक या जमिनीचा घोटाळा कानगाव दौंड आणि तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील यवत पिंपळगाव केडगाव पारगाव नानगाव वरवंड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.यात राजकीय कारभाऱ्यांनी यामध्ये मोठी लुडबुड केली असून त्याचा विपरीत परिणाम सरकारची एक प्रकारे लूट करण्यातच झालेला आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

पुनर्वसन जमिनीतील काही दलालांनी दौंड तालुक्यात आणि हवेली तालुक्यात सुद्धा जमिनी मिळवलेले आहेत आणि त्या विक्री करून टाकल्या आहेत बोटावर मोजण्या इतकेच दलाल यामध्ये आग्रभागी असून त्यांच्या बोटाला धरून राजकारणातील काही स्वतःला पुढारी समजणारे व वृत्तपत्रात काम करणारे काही पत्रकार यांनी सुद्धा हात धुण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वरवंड गावातील एका स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या पुढाऱ्याने मोठा धुमाकूळ घातला असून त्याच्या जोडीला केडगाव परिसरातील एक दलाल असून हा दलाल मोठा राजकीय आश्रय आहे अशा स्वरूपाची तालुका भर चर्चा झालेली आहे.

हा दलाल राजकारणाच्या आश्रयाने अधिकाऱ्यां वरती हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून बोगस कागदपत्राच्या आधारे कोणाच्या तरी नावावर जमिनी मिळून त्याचे खरेदीखत साठेखत अशा स्वरूपाची दस्तऐवज करून ते विकण्याचा प्रताप करीत असतो अशी मोठी वादळी चर्चा सुरू आहे.

आवाज लोकशाहीचा ने या सर्व बाबींना कागदपत्रांच्या आधारे मालिका लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि हा आवाज जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहचवलेला आहे.त्यांनी आवाज लोकशाहीचा शी बोलताना या सर्व पुनर्वसन जमिनीच्या चौकशीसाठी लवकरच योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा स्वरूपाच्या आश्वासन त्यांनी दिल्याने आता कारवाई होणार अशी आशा निर्माण झालेली आहे.

सन २०१३-२०१५ दरम्यान दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी यांनी काही जमीन लाभार्थ्यांची चौकशी करून एक निकष तयार केला होता.यामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेकांनी शासनाची फसवणूक करून या जमिनी मिळवल्या होत्या त्या सर्व जमिनीवरती सरकार म्हणून नावे लावून कारवाई केली होती त्या सुद्धा जमिनी सध्या त्यांच्या ताब्यात नाहीत त्यांचेही दुबार वाटप करण्यात आलेले आहे.

हा प्रकार जमीन वाटप करणाऱ्या यंत्रणेकडे शंकेकडे पाहणार असून अशा स्वरूपाचा अनाठाई प्रकार जिल्हा पुनर्वसन विभागात होत असल्याने दौंड तालुक्यामध्ये राज्यातील पहिली मोठी लक्षवेधी होईल असा पुनर्वसन जमीन घोटाळा झालेला आहे अशी चर्चा पुणे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पणाने सुरू झाली आहे.

आवाज लोकशाहीच्या वतीने पुनर्वसन जमिनीच्या या घोटाळेबाज कारभारा पर्यंत कारवाई होई पर्यंत लिखाण करून जनजागृती करावी अशी अपेक्षा सुद्धा या चर्चा करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.