दौंड:आवाज लोकशाहीचा
फुकटचे घावले आणि बाप लेक धावले ही मराठी भाषेतील प्रचलित वाक्य रचना दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनी लाभार्थ्यान बाबत दिसून येत आहे.
धरणात जमीन गेलेली नसताना काहींनी बोगस आदेश करून दौंड तालुक्यात जमीन मिळवलेली आहे आणि ती सुद्धा बायका पोरांसह आई बहिण व सुनेच्या ही नावावर हा प्रकार फारच भयानक असला तरी यांना जमीन देणाऱ्या सरकारी बाबूनी डोळे झाकून दिली का ? हा प्रश्न शोध मोहिमेचा भाग आहे.
सरकारच्या पगारावर कुटुंब जगवत असलेल्या बाबूनी वर कमाई साठी आर्थिक शेंनच खाल्ले म्हणावे का ? असा प्रश्न लाभार्थींच्या यादीकडे पाहून नागरिकांना पडला आहे.या यादीत जवळपास २६९ कारभारी बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभार्थी झालेली यादीच तयार केलेली आहे.
सिंधुबाई दिनकर कडू,वाघू भागू पवार,आशाबाई भगवान पवार,एकनाथ लक्ष्मण पासलकर,नकाबाई मुलाजी कोकरे,नानू कोंडीबा मरगळे,आबा कोंडीबा मरगळे,भिकाजी तुकाराम दबडे,लक्ष्मण केसू सांगळे,गणपत हरी पवार,नथू गणपत पवार,प्रकाश पांडुरंग मोरे,राणू गेनू दबडे,शकुंतला विठ्ठल गरुड,जिजाबाई सखाराम शेडगे,साधू वाघू पवार,अनिल धोंडीबा पासलकर,अनु गेनू पासलकर,मनोज ज्ञानोबा पासलकर,ज्ञानू बाबुराव पासलकर,मालनबाई दामोदर कांबळे,महादू रंगू कडू,अर्चना संजय पासलकर,दत्तू सखाराम सपकाळ,नथू सखाराम सपकाळ, आलका विठ्ठल गरुड,विकास विठ्ठल गरुड,आणि दगडू शेडगे,तानाजी दगडू शेडगे, रामा राघू कडू, भिका राग कडू,शिवराम तुकाराम साबळे,विष्णू अर्जुन कोळेकर,भीमराव तुकाराम साबळे,द्रौपदीबाई रामचंद्र जांबळे, विष्णू नावजी शेडगे,मंगला दामोदर साबळे,बाळू रामभाऊ पासलकर,सखाराम विठ्ठल सपकाळ,सीताबाई कोंडीराम साबळे,बाळू रावजी दोन्हे,बापू हरिभाऊ पासलकर,अलका पुंडलिक पिवळे,धोंडीबा कोंडीबा पायगुडे,जयश्री विलास शितोळे,जयवंती राजेंद्र पासलकर,गजानन वामन सुतार,लक्ष्मण नामदेव सुतार,बारकू विठू शेडगे,नारायण गोविंद पवार, बबईबाई नारायण पासलकर,महादेव नारायण पासलकर,अनु गेणू पासलकर,
राजेंद्र ज्ञानोबा पासलकर,चिंतामणी मारुती पासलकर,संगीता ज्ञानोबा शेलार,अनु बाबू दबडे,गोपाळा दबडे, राजेंद्र किसन दबडे,शिवाजी चंदू मोरे, सखुबाई नातू दबडे,विष्णू आंबू दबडे,श्याम दगडू दगडे, दगडू लक्ष्मण दबडे,जनाबाई विष्णू मोरे,जिजाबाई भिकू मोरे,विद्या अंकुश दबडे,जयश्री उत्तम जगदाळे,दगडू रामजी दबडे,अंकुश दगडू दगडे,सखाराम विठू दबडे,मारुती तुकाराम दबडे,सीताबाई सखाराम धिंडले,नंदाहरी जगदाळे,गणपती तुकाराम पडवळ,ज्ञानोबा गणपत पडवळ,मंगल नारायण तनपुरे,सोमा भिवा शिरसागर,अनंता लक्ष्मण पडवळ,रुक्मिणी विठ्ठल चव्हाण,नथू खंडू वरघडे,ज्ञानदेव सोमा गेढले,तालुका बबन उभे,भवन गोविंद कोळेकर,मायावती बबन कोळेकर,विठ्ठल बाळा बेलूसे,मंगल वसंत मरळ,कोंडू अबू कोकरे,कोंडाबाई गंगाराम डेबे,गणू श्रीपती कडू,सुभद्रा धोंडीबा पासलकर,ज्ञानोबा सोनबा पासलकर, कृष्णा खुशाबा पासलकर,दामू रामदास साबळे या लाभार्थींनी बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनी मिळवलेल्या आहेत अशी तपासणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी करून त्याचा अहवाल बनवलेला आहे.
सरकारी कागदपत्रे खोटी बनवणे सरकारी कागदपत्रांवर खाडाखोड करणे खोट्या सह्या करणे खोटे आदेश आणि खोटे शिक्का असणारी कागदपत्रांच्या आधारे जमिनी मिळवलेली ही धक्कादायक परिस्थिती शासनाचा लक्षात आल्यावर सुद्धा अशा लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल का केले नाहीत हा प्रश्न मोठा शंकास्पद आहे.
दौंड तालुक्यामध्ये हा सर्व प्रकार मोठ्या प्रमाणात घडला असून यामध्ये किती एकर जमीन ही बोगस वाटलेली आहे याचा तपास सुरू असून लवकरच या सर्व घडामोडींची माहिती आवाज लोकशाहीचा मधून वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल.
मात्र सरकारी जमीन लाटण्यासाठी या सर्व लाभार्थ्यांनी एवढी मोठी धाडसी मोहीम का राबवली हा खरा प्रश्न प्रशासनाच्या कार्यप्रणालीला गालबोट लावणारा असून या प्रशासनाने या लाभार्थी कडून काहीतरी घेतल्या शिवाय हा प्रकार घडला नाही म्हणून त्यांनी आर्थिक शेन खाल्लेच असावे असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही.
लाभार्थ्यांना फायदा होतोय म्हणल्या वर त्यांनी काय फुकटचं घावलं आणि बाप लेक धावलं अशा स्वरूपाची भूमिका बजावलेली आहे.
असे म्हणले तरी बिघडले कुठे
हा सर्व प्रकार जिल्हा पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात घडलेला आहे सध्याही घडत आहे अशा स्वरूपाचे टीका टिपणी केल्यास चुकीचे ठरणार नाही या सर्व लाभार्थींना प्रशासनाने असेच का?सोडून दिले हा प्रश्न शोध मोहिमेचा भाग बनलेला आहे.
दौंड मध्ये अश्याच एका बाप लेकाने पुनर्वसन जमिनी जमवण्यासाठी मोठा खटाटोप केलेला आहे त्यांना साठी देण्यासाठी दलाल आणि स्टॅम्प विक्रेता आणि त्यांच्या टोळीने साठी दिलेली आहे
> *टिप* – पुढील भागात उर्वरित लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली जाईल.



